श्रीएकनाथनमनपंचकस्तोत्र
श्रीएकनाथनमनपंचकस्तोत्र प्रारंभ
मूळावरी उपजतांचि समूळ माया । ग्रासूनियां भव पुढें नुरवी शमाया ॥
नाहीं नियामक तया दुसरा अनाथा । साष्टांग वंदिन दयार्णव एकनाथा ॥१॥
मूळीं गिळोनि भवसागर शुष्क ज्यानें । केला तयासि मग वाढविला अजानें ॥
तो भानुदासकुलभूषण भक्तिपंथा । साष्टांग वंदिन० ॥२॥
ज्याचे घरीं हरि करी उपचार सेवा । विप्रार्चनें करुनि मानत वासुदेवा ॥
तारी अपार जड ठेवुनि हस्त माथा । साष्टांग वंदिन० ॥३॥
भावें जनार्दन जनीं नयनीं निरीक्षी । बोधोनि हें गुज निजांकित भक्त रक्षी ॥
आर्ता समर्थ करितो निरसूनि व्यथा । साष्टांग वंदिन० ॥४॥
श्रीआदिनाथ गुरुदत्त-जनार्दनासी । ते साधिले करुनि सन्निध साधनासी ॥
केली तयावरुनि भागवताख्य गाथा । साष्टांग वंदिन दयार्णव एकनाथा ॥५॥
॥ श्रीमदेकनाथनमनपंचकस्तोत्रं संपूर्णमस्तु ॥