श्लोक १६ वा
तमाहुर्वासुदेवांशं मोक्षधर्माविवक्षया ।
अवतीर्णं सुतशतं तस्यासीद्वेदपारगम् ॥१६॥
ऋषभ वासुदेवाचा अंशु । ये लोकीं मोक्षधर्मविश्वासु ।
प्रवर्तावया जगदीशु । हा अंशांशु अवतार ॥३४॥
त्याचें पंचमस्कंधीं चरित्र । सांगितलें सविस्तर ।
त्यासी जाहले शत पुत्र । वेदशास्त्रसंपन्न ॥३५॥
त्यांहीमाजीं ज्येष्ठ पुत्र । अतिशयें परम पवित्र ।
ऐक त्याचें चरित्र । अतिविचित्र सांगेन ॥३६॥;