श्लोक ४३ वा
श्रीनारद उवाच-धर्मान्भागवतानित्थं, श्रुत्वाऽथ मिथिलेश्वरः ।
जायन्तेयान् मुनीन् प्रीतः, सोपाध्यायो ह्यपूजयत् ॥४३॥
नारद इतिहास सांगतु । तेवींच आनंदें डुल्लतु ।
तेणें आनंदें बोलतु । भक्तीचें मथितु वसुदेवाप्रती ॥८८॥
यापरी जयंतीसुतीं । भगवंताची उद्भट भक्ती ।
सांगितली परम प्रीतीं । मिथिलेशाप्रती निजबोधें ॥८९॥
ऐकोनि त्यांचिया वचना । सुख जाहलें विदेहाचिया मना ।
मग अतिप्रीतीं पूजना । जयंतीनंदनां पूजिता झाला ॥४९०॥
श्रवणें जाहली अतिविश्रांती । तेणें पूजेलागीं अतिप्रीती ।
विदेहा उल्हासु चित्तीं । स्वानंदस्थितीं पूजिता झाला ॥९१॥
पूजेचा परम आदरु । जयंतीनंदना केला थोरु ।
उपाध्याय जो अहल्याकुमरु । तेणेंही अत्यादरु पूजेसी केला ॥९२॥