श्लोक १८ व १९ वा
देवकी रोहिणी चैव, वसुदेवस्तथा सुतौ ।
कृष्णरामावपश्यन्तः, शोकार्ता विजहुः स्मृतिम् ॥१८॥
प्राणांश्च विजहुस्तत्र, भगवद्विरहातुराः ।
उपगुह्य पतींस्तात, चितामारुरुहुः स्त्रियाः ॥१९॥
देवकी आणि रोहिणी । वसुदेव उग्रसेन दोनी ।
यादव निमाले रणांगणीं । ते स्थानीं पाहों येती ॥२३॥
दीर्घशयनें युद्धधरणीं । पडिल्या यादववीरश्रेणी ।
तेथें राम कृष्ण पुत्र दोनी । पाहतां नयनीं न देखती ॥२४॥
कृष्णविरहें शोकाकुलित । दुःख न संठेचि अतिअद्भुत ।
चौघें जणें आक्रंदत । पडिलीं मूर्च्छित अतिदुःखें ॥२५॥
निमाल्या रामकृष्णांचें मुख । आम्ही न देखों निःशेख ।
तेणें उथळलें परम दुःख । दुःखासवें देख निमाला प्राण ॥२६॥
प्राणें करावें उत्क्रमण । त्यांसीही श्रीकृष्णदुःख दारुण ।
दुःखें निमाले स्वयें प्राण । वांचवी कोण रडत्यांसी ॥२७॥
न देखतां राम कृष्ण । ते मूर्च्छेसवेंचि जाण ।
चौघीं जणीं त्यजिले प्राण । अर्ध क्षण न लागतां ॥२८॥
समस्त यादवांच्या स्त्रिया । धरुनि आपुलाले प्रिया ।
अग्निप्रवेश करावया । चढल्या लवलाह्यां चितेमाजीं ॥२९॥
यादवांचिया स्त्रिया बहुतीं । कोण प्रवेशल्या कैशा रीतीं ।
तेही अग्निप्रवेशाची स्थिती । परीक्षितीप्रती शुक सांगे ॥२३०॥