श्लोक १० वा
श्रीशुक उवाच-राजन्नेवं कृतप्रश्नो वसुदेवेन धीमता ।
प्रीतस्तमाह देवर्षिर्हरेः संस्मारितो गुणैः ॥१०॥
सांगतां वसुदेवाचा प्रश्न । श्रीशुक जाहला स्वानंदपूर्ण ।
नारदु वोळला चैतयघन । चित्सुखजीवन मुमुक्षां ॥४॥
श्रीशुक म्हणे नरदेवा । भावो मीनला नारदाच्या भावा ।
ऐकोनि प्रश्नसुहावा । तो म्हणे वसुदेवा धन्य वाणी ॥५॥
परिसतां हा तुझा प्रश्न । चित्सुखें प्रगटे नारायण ।
ऐसें बोलतां नारद जाण । स्वानंदें पूर्ण वोसंडला ॥६॥
रोमांच उचलले अंगीं । स्वेद दाटला सर्वांगीं ।
आनंदाश्रु चालिले वेगीं । स्वानंदरंगीं डुल्लतु ॥७॥
सप्रेम मीनलिया श्रोता । जैं पूर्ण सुखावेना वक्ता ।
तैं तो जाणावा अवघा रिता । कथासारामृता चवी नेणे ॥८॥
ऐकतां वसुदेवाचा प्रश्न । नारद सुखावे पूर्ण ।
मग स्वानंदगिरा गर्जोन । काय आपण बोलत ॥९॥;