श्लोक ३९ वा
सम्मार्जनोपलेपाभ्यां सेकमण्डलवर्तनैः ।
गृहशुश्रूषणं मह्यं दासवद् यदमायया ॥३९॥
असतां शिष्य सेवकजन । ते प्रतिष्ठा सांडूनि सन्मान ।
स्वयें करी सडासंमार्जन । देवालयीं जाण निर्दंभ ॥९९॥
रंगमाळा घाली कुसरीं । नाना यंत्रे नानाकारीं ।
नाना परीचे रंग भरी । आवडी भारी मद्भजनीं ॥१३००॥
जैसे कां नीच रंक । तैसी सेवा करी देख ।
नीच सेवेचें अतिसुख । निर्मायिक मद्भजनीं ॥१॥