श्लोक ३९ वा
सन्तुष्टा श्रद्दधत्येतद्यथालाभेन जीवती ।
विहराम्यमुनैवाहमात्मना रमणेन वै ॥३९॥
शरण गेलियापाठीं । सहज संतुष्ट मी ये सृष्टीं ।
स्वभावें सत्श्रध्दा पोटीं । जीविका गांठी अदृष्ट ॥६९॥
मुनीश्वर भोगिती निजात्मा । त्या मी भोगीन आत्मयारामा ।
जो का पुरवी निष्कामकामा । तो परमात्मा वल्लभू ॥२७०॥
ब्रह्मादिक समर्थ असती । ते सांडूनियां निश्चितीं ।
भगवद्भजनाची स्थिती । अतिप्रीती कां म्हणसी ॥७१॥
मजसारिखिया दुराचारी । जड जीवांतें उद्धरी ।
तारकु तोचि भवसागरीं । स्वामी श्रीहरि कृपाळु ॥७२॥