Android app on Google Play

 

तीन मुले 68

‘सोन्या, आवडले ना?’ तिने विचारले.
‘छान लागते आई.’ सोन्या म्हणाला.
‘मलाही आवडले.’ रुपल्या म्हणाला.

तिन्हीसांजा झाल्या. चार पणत्या बाहेर लावण्यात आल्या. मनी झोपाळयावर निजली होती. आई दोन मुलांचे हात धरून फिरत होती. इतक्यात मंगा बाहेरून आला.

‘काय आणलेत बाबा? खाऊ?’ मुलांनी विचारले.
‘होय हो बाळ. आणि हे फटाके घ्या. ह्या चंद्रज्योती.’ तो म्हणाला.
‘खरेच बाबा? सोन्याने विचारले.
‘होय, खरेच.’

मंगाने चंद्रज्योती काढून दिल्या. सोन्याने लाविल्या. रुपल्यानेही काडी हाती धरली. मधुरीने फटाके सोडवून दिले. बांबूचा चिमटा तिने त्या मुलांना करून दिला. चिमटयात धरून मुले फटाके वाजवू लागली.

‘आई, मी हातात धरून वाजवू?’ सोन्याने विचारिले.
‘नको. एखादे वेळेस हातावर येईल.’ आई म्हणाली.
‘नाही येणार. मी काही हातात धरून वाजवायला भीत नाही आई.’
‘वाजव हो सोन्या.’ बाप म्हणाला.

सोन्याने हातात धरून फटाका वाजविला. फटाके, चंद्रज्योती! मजा आली. आणि पेढे, बर्फीही मंगा घेऊन आला होता. सोन्याला दोन पेढे मिळाले. रुपल्याला एका पेढयाचे दोन करून देण्यात आले. मुलांना आनंद झाला. रात्री मुले निजली. मधुरी व मंगा जागीच होती.

‘मंगा कोठून आणलेस फटाके? पैसे होते का?’ तिने विचारले.
‘कर्ज काढून आणले सामान.’ तो म्हणाला.
‘नको हो कर्ज.’ ती म्हणाली.

‘मला नाही भिका-यासारखे रहाणे आवडत. मी आता खुशाल कर्ज काढण्याचे ठरविले आहे. सोन्यासारख्या मुलांना साध्या गोष्टीसाठी मार खावा लागावा हे मला सहन होत नाही. तू सोन्याला नाही डागलेस, मला डागलेस. आपण किती दरिद्री या गोष्टीचे तुझ्या मनातील दु:ख त्यामुळे प्रकट झाले. मधुरी, कितीदा तुला विचारले परवानगी देत नाहीस. म्हणतेस मी समाधानी आहे. परंतु तुझ्या मनाची यथार्थ कल्पना आज मला आली. तुझे मन शांत व स्वस्थ नाही. तेथे दरिद्रयाच्या वेदना आहेत. स्वाभिमानाच्या कल्पना आहेत. पोरांना काय बिचा-यांना? छे! मला चैन नाही पडत. कोवळा फुलासारखा हात तू भाजलास. किती तू दुष्ट. आया का इतक्या दुष्ट होऊ शकतात?’

तीन मुले

पांडुरंग सदाशिव साने
Chapters
तीन मुले 1
तीन मुले 2
तीन मुले 3
तीन मुले 4
तीन मुले 5
तीन मुले 6
तीन मुले 7
तीन मुले 8
तीन मुले 9
तीन मुले 10
तीन मुले 11
तीन मुले 12
तीन मुले 13
तीन मुले 14
तीन मुले 15
तीन मुले 16
तीन मुले 17
तीन मुले 18
तीन मुले 19
तीन मुले 20
तीन मुले 21
तीन मुले 22
तीन मुले 23
तीन मुले 24
तीन मुले 25
तीन मुले 26
तीन मुले 27
तीन मुले 28
तीन मुले 29
तीन मुले 30
तीन मुले 31
तीन मुले 32
तीन मुले 33
तीन मुले 34
तीन मुले 35
तीन मुले 36
तीन मुले 37
तीन मुले 38
तीन मुले 39
तीन मुले 40
तीन मुले 41
तीन मुले 42
तीन मुले 43
तीन मुले 44
तीन मुले 45
तीन मुले 46
तीन मुले 47
तीन मुले 48
तीन मुले 49
तीन मुले 50
तीन मुले 51
तीन मुले 52
तीन मुले 53
तीन मुले 54
तीन मुले 55
तीन मुले 56
तीन मुले 57
तीन मुले 58
तीन मुले 59
तीन मुले 60
तीन मुले 61
तीन मुले 62
तीन मुले 63
तीन मुले 64
तीन मुले 65
तीन मुले 66
तीन मुले 67
तीन मुले 68
तीन मुले 69
तीन मुले 70
तीन मुले 71
तीन मुले 72
तीन मुले 73
तीन मुले 74
तीन मुले 75
तीन मुले 76
तीन मुले 77
तीन मुले 78
तीन मुले 79
तीन मुले 80
तीन मुले 81
तीन मुले 82
तीन मुले 83
तीन मुले 84
तीन मुले 85
तीन मुले 86
तीन मुले 87
तीन मुले 88
तीन मुले 89
तीन मुले 90
तीन मुले 91
तीन मुले 92
तीन मुले 93
तीन मुले 94
तीन मुले 95
तीन मुले 96
तीन मुले 97
तीन मुले 98
तीन मुले 99
तीन मुले 100
तीन मुले 101
तीन मुले 102
तीन मुले 103
तीन मुले 104
तीन मुले 105
तीन मुले 106
तीन मुले 107
तीन मुले 108
तीन मुले 109
तीन मुले 110
तीन मुले 111
तीन मुले 112
तीन मुले 113
तीन मुले 114
तीन मुले 115
तीन मुले 116
तीन मुले 117
तीन मुले 118
तीन मुले 119
तीन मुले 120
तीन मुले 121
तीन मुले 122
तीन मुले 123
तीन मुले 124
तीन मुले 125
तीन मुले 126
तीन मुले 127
तीन मुले 128
तीन मुले 129
तीन मुले 130
तीन मुले 131
तीन मुले 132
तीन मुले 133
तीन मुले 134
तीन मुले 135
तीन मुले 136
तीन मुले 137
तीन मुले 138
तीन मुले 139
तीन मुले 140
तीन मुले 141
तीन मुले 142
तीन मुले 143
तीन मुले 144
तीन मुले 145
तीन मुले 146
तीन मुले 147
तीन मुले 148
तीन मुले 149
तीन मुले 150
तीन मुले 151
तीन मुले 152
तीन मुले 153
तीन मुले 154
तीन मुले 155
तीन मुले 156
तीन मुले 157
तीन मुले 158
तीन मुले 159
तीन मुले 160
तीन मुले 161
तीन मुले 162
तीन मुले 163