Android app on Google Play iPhone app Download from Windows Store

 

तीन मुले 40

‘बुधा चांगला आहे नाही? सौम्य व शांत.’
‘मधुरी!’
‘काय मंगा?’

‘तुला मी आवडतो की बुधा?’
‘मी या क्षणी तुझ्याजवळ आहे यावरुन तुला नाही काही समजत?’
‘परंतु माझ्या मांडीवर डोके ठेवून आठवण त्याची करीत आहेस!’

‘मंगा, किती झाले तरी तो आपला लहानपणाचा मित्र. तो घरी एकटा असतो. हसत नाही. बोलत नाही. त्याची आठवण करणेही का पाप? असा दुष्ट नको होऊ गडया.’

‘नाही हो होणार, तू जवळ असलीस म्हणजे दुष्टपणा माझ्याजवळ येणार नाही. मधुरी, प्रेम मत्सरी असते. मी किती झाली तरी मनुष्यच नाही का?’
‘हो, आपण माणसेच.’

‘मधुरी, तू आता दमलीस. आपण अशी किती दिवस भटकणार? हिंडणार? कोठे तरी आपण राहिले पाहिजे. झोपडी केली पाहिजे. परंतु एकसुध्दा दिडकी मजजवळ नाही. काय करावयाचे?’
‘मंगा तुल मी एक विचारु?’
‘विचार.’

‘रागवणार नाहीस ना?’
‘नाही.’
‘मी आज रात्री बुधाकडे जाते, त्याच्याजवळ पैसे मागते व घेऊन येते. तो देईल. जाऊ का?’
‘रात्री जाणार?’

‘हो. मग केव्हा जाऊ? तुला का शंका आली? शंका आली असेल तर मला या समुद्रात शिरु दे. मित्राकडे केव्हाही जायला भय नसावे. बुधा उल्लू नाही.’
‘मी आहे वाटते?’

‘थोडासा आहेस आणि म्हणूनच तू मला आवडतोस. तू रागवतोस; रुसतोस व बेफाम होतोस, म्हणून मला आवडतोस. मला शांत सरोवर नाही आवडत. खवळणारा, हसणारा समुद्र आवडतो.’

तीन मुले

पांडुरंग सदाशिव साने
Chapters
तीन मुले 1
तीन मुले 2
तीन मुले 3
तीन मुले 4
तीन मुले 5
तीन मुले 6
तीन मुले 7
तीन मुले 8
तीन मुले 9
तीन मुले 10
तीन मुले 11
तीन मुले 12
तीन मुले 13
तीन मुले 14
तीन मुले 15
तीन मुले 16
तीन मुले 17
तीन मुले 18
तीन मुले 19
तीन मुले 20
तीन मुले 21
तीन मुले 22
तीन मुले 23
तीन मुले 24
तीन मुले 25
तीन मुले 26
तीन मुले 27
तीन मुले 28
तीन मुले 29
तीन मुले 30
तीन मुले 31
तीन मुले 32
तीन मुले 33
तीन मुले 34
तीन मुले 35
तीन मुले 36
तीन मुले 37
तीन मुले 38
तीन मुले 39
तीन मुले 40
तीन मुले 41
तीन मुले 42
तीन मुले 43
तीन मुले 44
तीन मुले 45
तीन मुले 46
तीन मुले 47
तीन मुले 48
तीन मुले 49
तीन मुले 50
तीन मुले 51
तीन मुले 52
तीन मुले 53
तीन मुले 54
तीन मुले 55
तीन मुले 56
तीन मुले 57
तीन मुले 58
तीन मुले 59
तीन मुले 60
तीन मुले 61
तीन मुले 62
तीन मुले 63
तीन मुले 64
तीन मुले 65
तीन मुले 66
तीन मुले 67
तीन मुले 68
तीन मुले 69
तीन मुले 70
तीन मुले 71
तीन मुले 72
तीन मुले 73
तीन मुले 74
तीन मुले 75
तीन मुले 76
तीन मुले 77
तीन मुले 78
तीन मुले 79
तीन मुले 80
तीन मुले 81
तीन मुले 82
तीन मुले 83
तीन मुले 84
तीन मुले 85
तीन मुले 86
तीन मुले 87
तीन मुले 88
तीन मुले 89
तीन मुले 90
तीन मुले 91
तीन मुले 92
तीन मुले 93
तीन मुले 94
तीन मुले 95
तीन मुले 96
तीन मुले 97
तीन मुले 98
तीन मुले 99
तीन मुले 100
तीन मुले 101
तीन मुले 102
तीन मुले 103
तीन मुले 104
तीन मुले 105
तीन मुले 106
तीन मुले 107
तीन मुले 108
तीन मुले 109
तीन मुले 110
तीन मुले 111
तीन मुले 112
तीन मुले 113
तीन मुले 114
तीन मुले 115
तीन मुले 116
तीन मुले 117
तीन मुले 118
तीन मुले 119
तीन मुले 120
तीन मुले 121
तीन मुले 122
तीन मुले 123
तीन मुले 124
तीन मुले 125
तीन मुले 126
तीन मुले 127
तीन मुले 128
तीन मुले 129
तीन मुले 130
तीन मुले 131
तीन मुले 132
तीन मुले 133
तीन मुले 134
तीन मुले 135
तीन मुले 136
तीन मुले 137
तीन मुले 138
तीन मुले 139
तीन मुले 140
तीन मुले 141
तीन मुले 142
तीन मुले 143
तीन मुले 144
तीन मुले 145
तीन मुले 146
तीन मुले 147
तीन मुले 148
तीन मुले 149
तीन मुले 150
तीन मुले 151
तीन मुले 152
तीन मुले 153
तीन मुले 154
तीन मुले 155
तीन मुले 156
तीन मुले 157
तीन मुले 158
तीन मुले 159
तीन मुले 160
तीन मुले 161
तीन मुले 162
तीन मुले 163