Android app on Google Play

 

संग्रह ८८

 

काळी चंद्रकळा खडीनं भरली

संसारी रंगली मायबाई ।

पालख पाळणा येतां जातां हालवू

आत बाळ निजवू नवसाचा ।

पालख पाळणा मोत्यांनी विणीला

तुझ्या मामांनी धाडिला तान्ह्या बाळा ।

पालखाची दोरी हालत लोंबत

संसारी गंमत तान्हीयाची ।

एक म्हणती नंदाचा एक म्हणंती वसुदेवाचा

जन म्हणे हो कोणाचा कृष्णनाथ ।

माय तो माहेर बाप तो येऊ जाऊ

मग आणतिल भाऊ लोकोपचारा ।

माय तो माहेर बाप तो माझी सत्ता

नको बोलू दशरथा भाईराया ।

माऊलीची माया काय करील चुलती

पाण्याविण ती शेवंती कोमेजली ।

सासरचा चारा माहेरचा वारा

अंगाला लागतो सुखाचा उबारा ।

प्रेमाचें अमृत ह्रुदयाचे पोटीं

ह्याची साक्ष मोठी मायमाऊली ।

सासरी सासुरवास मला नाही केला

कीर्ति मिळाली तुम्हांला सासूबाई ।

आयुष्य मी चिंतिं सासूबाई तुमच्या नीरीं

माझी कुंकवाची चिरी अखंड राहो ।

सूनबाई आली घरा सोन्याच्या पायाने

सासूबाईचा आनंद कसा सांगू मी वाणीने ।

व्रतामध्ये व्रत व्रत करावे सोमवार

पुढल्या गोतामध्ये आईला माया फार ।

सासूबाई सासूबाई आम्ही सूना लाडक्या

आम्हांला मूळ धाडा ह्याच्यापुढे पालख्या ।

दसरा संपला दिवाळी कधी येई

माय ग माऊली माझी वाट पाही ।

सकाळी उठूनी दोन्ही हाती ग धंदा

सासूबाई माझ्या सुखी राहोत सदा ।

एक लिंबाच्या केल्या आठ फोडी

भाई रायावरी बहिणीची माया वेडी ।

वहिनीबाई गोरी आखूड तिचे दंड

हिरव्या चोळीवरी तिला पिवळे बाजूबंद ।

वाटेवरले घर आल्या गेल्याला ताकभात

माझ्या वहिनीबाई बापाजीचे नांव राख ।

वाटेवरले घर आल्या गेल्याला गूळपाणी

माझी ग ताईबाई जातिवंताची लेक शहाणी ।

आयोवणी मरणाची माझ्या आईला आवड

हळदी कुंकवाच्या पुढे गेली ग कावड ।

काळी चंद्रकळा ठेवू ठेवूनी नेसावी

कुंकवाची चीरी वहिनीबाईला असावी ।

आम्ही पाच बहिणी पाच गावचे कळस

माझी ताईबाई मधें नांदते तुळस ।

पाऊस झिम झिम लागून ओसरला

भाईरायाला लेकी झाल्या आम्ही बहिणी विसरला ।

 

ओवी गीते : इतर

स्तोत्रे
Chapters
संग्रह १
संग्रह २
संग्रह ३
संग्रह ४
संग्रह ५
संग्रह ६
संग्रह ७
संग्रह ८
संग्रह ९
संग्रह १०
संग्रह ११
संग्रह १२
संग्रह १३
संग्रह १४
संग्रह १५
संग्रह १६
संग्रह १७
संग्रह १८
संग्रह १९
संग्रह २०
संग्रह २१
संग्रह २२
संग्रह २३
संग्रह २४
संग्रह २५
संग्रह २६
संग्रह २७
संग्रह २८
संग्रह २९
संग्रह ३०
संग्रह ३१
संग्रह ३२
संग्रह ३३
संग्रह ३४
संग्रह ३५
संग्रह ३६
संग्रह ३७
संग्रह ३८
संग्रह ३९
संग्रह ४०
संग्रह ४१
संग्रह ४२
संग्रह ४३
संग्रह ४४
संग्रह ४५
संग्रह ४६
संग्रह ४७
संग्रह ४८
संग्रह ४९
संग्रह ५०
संग्रह ५१
संग्रह ५२
संग्रह ५३
संग्रह ५४
संग्रह ५५
संग्रह ५६
संग्रह ५७
संग्रह ५८
संग्रह ५९
संग्रह ६०
संग्रह ६१
संग्रह ६२
संग्रह ६३
संग्रह ६४
संग्रह ६५
संग्रह ६६
संग्रह ६७
संग्रह ६८
संग्रह ६९
संग्रह ७०
संग्रह ७१
संग्रह ७२
संग्रह ७३
संग्रह ७४
संग्रह ७५
संग्रह ७६
संग्रह ७७
संग्रह ७८
संग्रह ७९
संग्रह ८०
संग्रह ८१
संग्रह ८२
संग्रह ८३
संग्रह ८४
संग्रह ८५
संग्रह ८६
संग्रह ८७
संग्रह ८८
संग्रह ८९
संग्रह ९०
संग्रह ९१
संग्रह ९२
संग्रह ९३
संग्रह ९४