Get it on Google Play
Download on the App Store

संग्रह ६५

घाणा ग भरीयला पान कुडवांती

सवासनी पाच येती मानाच्या ।

पिकल्या पानाचा विडा करुनी वाया गेला

पाठीच्या गौळणी भ्रतार रुसला पड पाया ।

जिचा भ्रतार ज्ञानी अंगी विसणीतो पाणी

अवघ्या नगरीत नारीला नाही कोणी ।

हौशा भ्रतार हौस पुरवीत गेला

डोल्याखाली सर घागरीचा केला ।

चांगुल एवढंपण लई नसावं पुरुषाला

माझ्या बंधुसंगं नार निघाली उरुसाला ।

माय माऊलीचा पान्हा प्याले मी सरासरी

कामात सासूबाई आले तुम्हा बरोबरी ।

बत्तीस धारांचा पान्हा प्याले मी हसून

माय मालनी ग तुझ्या मांडीव बसून ।

बत्तीस धारांचा पान्हा प्याले मी कोण्यारंगं

माझ्या मावलीनं केला मांडीचा चवरंग ।

बहिण भावंडांचा नीत झगडा होतो राती

बया जामीन्‌ मला होती ।

दळण दळताना अंग माझं ते घाम्याजलं

माय माऊलीचं दूध तुझं इरजलं ।

पालक पाळयीणा लेकीच्या लेकराचा

झोका टाकीते कौतुकीचा ।

अस्तुरी पुरुष दोहीचा उभा दावा

लक्ष्मीबाई बोले उगीच आले देवा ।

अस्तुरी भ्रतार दोन्ही मेहूणा मेहुणी

लक्ष्मीबाई बोले तेथे जाय पाहुणी ।

अस्तुरी भ्रताराची घरामध्ये किरकीर

लक्ष्मीबाई बोले तेथे धरवेना धीर ।

खावुनी पिवुनी नारीला आले हिंव

हौशा भ्रताराचा घाबरला जीव ।

परनारीसाठी केला घराचा लिलाव

घरांतील अस्तुरी जशी पाण्याचा तलाव ।

परनारीसाठी झाला गल्लीचा कोंबडा

घरातील अस्तुरी जशी किल्ल्याचा झुंबडा ।

घरची अस्तुरी जसं सापाचं वाटोळं

परनारीसाठी केलं घराचं वाटोळं ।

घरातील अस्तुरी जशी साबणाची वडी

परनारीसाठी टाकी संसारात उडी ।

भ्रतार बोले नारी हौस कशाची

मन्याला पानपोत नथ दोहीरी फाशाची ।

नको म्हणू नारी भ्रतार भोळा भोळा

कशानं भोळा केसानं कापी गळा ।

हौस पुरविली माझ्या हौसेच्या धन्यानी

मन्याला पानपोत गळा भरला सोन्यानी ।

आपल्या भ्रताराशी नारी हसून बोलली

कपाळीचं कुंकू जशी डाळींबी फुलली ।

कपाळीचं कुंकू माझं मजला दंडतं

भरल्या सभेत फूल झेंडूचं हिंडतं ।

भ्रतार बोले कुठं गेली वेडी राधा

पाठीची गौळण हसतमुख सदा ।

ओवी गीते : इतर

स्तोत्रे
Chapters
संग्रह १ संग्रह २ संग्रह ३ संग्रह ४ संग्रह ५ संग्रह ६ संग्रह ७ संग्रह ८ संग्रह ९ संग्रह १० संग्रह ११ संग्रह १२ संग्रह १३ संग्रह १४ संग्रह १५ संग्रह १६ संग्रह १७ संग्रह १८ संग्रह १९ संग्रह २० संग्रह २१ संग्रह २२ संग्रह २३ संग्रह २४ संग्रह २५ संग्रह २६ संग्रह २७ संग्रह २८ संग्रह २९ संग्रह ३० संग्रह ३१ संग्रह ३२ संग्रह ३३ संग्रह ३४ संग्रह ३५ संग्रह ३६ संग्रह ३७ संग्रह ३८ संग्रह ३९ संग्रह ४० संग्रह ४१ संग्रह ४२ संग्रह ४३ संग्रह ४४ संग्रह ४५ संग्रह ४६ संग्रह ४७ संग्रह ४८ संग्रह ४९ संग्रह ५० संग्रह ५१ संग्रह ५२ संग्रह ५३ संग्रह ५४ संग्रह ५५ संग्रह ५६ संग्रह ५७ संग्रह ५८ संग्रह ५९ संग्रह ६० संग्रह ६१ संग्रह ६२ संग्रह ६३ संग्रह ६४ संग्रह ६५ संग्रह ६६ संग्रह ६७ संग्रह ६८ संग्रह ६९ संग्रह ७० संग्रह ७१ संग्रह ७२ संग्रह ७३ संग्रह ७४ संग्रह ७५ संग्रह ७६ संग्रह ७७ संग्रह ७८ संग्रह ७९ संग्रह ८० संग्रह ८१ संग्रह ८२ संग्रह ८३ संग्रह ८४ संग्रह ८५ संग्रह ८६ संग्रह ८७ संग्रह ८८ संग्रह ८९ संग्रह ९० संग्रह ९१ संग्रह ९२ संग्रह ९३ संग्रह ९४