Android app on Google Play

 

संग्रह ८४

 

जाई सभेतून वाजं दइना जोडवं

सांगते मालनीला दिर लावतील आडवं ।

सोन झालं जुनं जाईना पिवळंपण

मैना तुला लिंबलोण ।

लाडकी माझी लेक रात्रीचं मागे दही

जाशील परघरा तुझा छंद बरा नाही ।

काय पंढरीचं कुंकू म्यांबी एकटी कशी लावूं

काय धाकटी माझी जाऊ तिच्या खोलीला कशी जावूं ।

काय कागल कोल्हा र तेथून कागल किती दूर

सोनं जिंकतो माझा दीर बंधु गांठीतो चंद्रहार ।

माझ्या दारांत लवंगा लागल्या भारोभार

बंधु माझा हौसदार चोळ्या घेतो हिरव्यागार ।

चाट्‌ट्याच्या दुकानात बाप बैसला गादीवर

हिरवी पैठण मांडीवरी ।

काय नदीच्या पलीकडं शाळू आलाया राखणीला

हौवशा बाळ माझं मोती दुहेरी गोफणीला ।

नदीच्या पलीकडं हिरव्या शालूची नार कोण

माझ्या बापाची जेष्ठ सून भावाची पद्‌मीन ।

काय सोन्याची अंगठी बंधु कशानं झिजती

काय हवशा बहिण तुझी रास गव्हाची मोजती ।

काय बारव्या विहीरीवरी कोणी सुंदर धुणी धुती

हौशा बंदूला बोलाविती कवळ्या पानाचा विडा देती ।

ये दिवाळी ग बाई तू बिगी बिगी कर येणं

वाणीचा भाऊ भाचा मला ओवाळाया जाणं ।

दिवाळीच्या दिशी ताटी घालितो रुपाया

आईच्या बाळराजा तुला ओवाळीते शिपाया ।

बाई दिवाळीच्या दिशी ताटी घाली पोवळं सरु

आईचा माझ्या बाळ ओवाळीला सवदागुरु ।

भावा दिवाळीच्या दिशी तुळा बसाया देते पीढा

आईच्या बाळा माझ्या सदाचा भर चुडा ।

बाई दिवाळीच्या दिशी ताटी घातलं ग दही

आईच्या बाळा माझ्या ओवाळीते तान्ही गाई ।

बाई दिवाळीच्या दिशी शाळूची कर ओटी

वाणीनी बाई माझ्या मामाची आई मोठी ।

बाई दिवाळीला चोळी, चोळी फाटूनी जाईल

आंदान दिली गाई तिचा विस्तार होईल ।

बाई दिवाळीची साडी तिच्या फाटूनी झाल्या चिंध्या

आंदन दिली गाई तिच्या पोटी ग झाला नांद्या ।

ये दिवाळी ग बाई तू बिगी बिगी कर येनं

माय बापाच्या ग घरी कधी पासूनचं जाणं ।

माहेराची वाट मायेची ग मोट

सासरी ग कष्ट मायेबाई ।

माझ्या ग सासरी नणंदेची जोरी

बोलायाची चोरी ताईबाई ।

माझ्या ग सासरी सासर्‍याची कटकट

सासूची ती खटखट मायेबाई ।

माझ्या ग माहेरी ढवळी अंगणात

गाय ग गोठयात मायेबाई ।

माझ्या ग माहेरी पारिजातक दाराशी

सुवास ओटीवरी ताईमाई ।

 

ओवी गीते : इतर

स्तोत्रे
Chapters
संग्रह १
संग्रह २
संग्रह ३
संग्रह ४
संग्रह ५
संग्रह ६
संग्रह ७
संग्रह ८
संग्रह ९
संग्रह १०
संग्रह ११
संग्रह १२
संग्रह १३
संग्रह १४
संग्रह १५
संग्रह १६
संग्रह १७
संग्रह १८
संग्रह १९
संग्रह २०
संग्रह २१
संग्रह २२
संग्रह २३
संग्रह २४
संग्रह २५
संग्रह २६
संग्रह २७
संग्रह २८
संग्रह २९
संग्रह ३०
संग्रह ३१
संग्रह ३२
संग्रह ३३
संग्रह ३४
संग्रह ३५
संग्रह ३६
संग्रह ३७
संग्रह ३८
संग्रह ३९
संग्रह ४०
संग्रह ४१
संग्रह ४२
संग्रह ४३
संग्रह ४४
संग्रह ४५
संग्रह ४६
संग्रह ४७
संग्रह ४८
संग्रह ४९
संग्रह ५०
संग्रह ५१
संग्रह ५२
संग्रह ५३
संग्रह ५४
संग्रह ५५
संग्रह ५६
संग्रह ५७
संग्रह ५८
संग्रह ५९
संग्रह ६०
संग्रह ६१
संग्रह ६२
संग्रह ६३
संग्रह ६४
संग्रह ६५
संग्रह ६६
संग्रह ६७
संग्रह ६८
संग्रह ६९
संग्रह ७०
संग्रह ७१
संग्रह ७२
संग्रह ७३
संग्रह ७४
संग्रह ७५
संग्रह ७६
संग्रह ७७
संग्रह ७८
संग्रह ७९
संग्रह ८०
संग्रह ८१
संग्रह ८२
संग्रह ८३
संग्रह ८४
संग्रह ८५
संग्रह ८६
संग्रह ८७
संग्रह ८८
संग्रह ८९
संग्रह ९०
संग्रह ९१
संग्रह ९२
संग्रह ९३
संग्रह ९४