Android app on Google Play

 

संग्रह ६३

 

भाऊ म्हणतो ताई नको धुऊ तू लुगडं

भावजई बोले नाही नदीला दगड ।

भाऊ म्हणतो बहिणीला तुम्ही नित यावं जावं

भावजई पुसे पाव्हनीचं कोन गाव ।

बाप म्हणे लेकी तू त गुलालाची गोणी

सोयर्‍याच्या घरी लोटीली केरावानी ।

नवरी पाहू आले सया म्हणती देऊ देऊ

बोलतो हिचा भाऊ दूर पल्ल्याला केव्हा जाऊ ।

सासरी जाती सया पाहती परसातून

प्राणसई माझी हरीण नेली कळपातून ।

सासरी जाती गुजरी वसरी भरली सयांची

प्राणसई माझी दूर पल्ल्याला जायाची ।

भ्रतार म्हणतो कुठं गेली देवांगना

प्राणसई माझी आली हसत अंगना ।

भ्रताराची खूण चाले खांबाच्या आडून

प्राणसई माझी द्यावी सुपारी फोडून ।

मावशी म्हणून धरीतो माझा घोळ

सांगते सयानो माझ्या बहिणीचा बाळ ।

माझ्या पोटीचा नाही शोभत माझा मला

सांगते बाळा तुला आई म्हण मावशीला ।

भरल्या बाजारी कंबरीचा सोड पसा

मैना माझी भरील चूडा तिच्या मना येईल तसा ।

भावाच्या बरोबरी भाचा बाळ मूळ आला

दारात उभा आत्या माहेराला चला ।

माझ्या ग बाप्पाजीनं बहू माझं बरं केलं

कुंकाचं नारळ रत्‍न माझ्या हाती दिलं ।

शेर सोनीयाचं कोन वागविती ओझं

कुंकू कपाळीचं नाजूक लेणं माझं ।

काय मी पुण्य केलं आईसारख्या सासूबाई

सोन्याच्या संपूष्टात पुजिली अंबाबाई ।

सासू मालनीचा पदर भिंगाचा

त्यांच्या पोटींचा चडा गुलाबी रंगाचा ।

परवा पुरुष माझ्या अंगणीची शिळा

आंघोळीला बस चुडया माझ्या तू घननीळा ।

गावाला गेला कुण्या माझ्या कुंकवाची चिरी

सावळी सुरत हिरव्या बनातीच्या खाली ।

आवूक मागते चुडयामागल्या कंगणीला

माझ्या कुंकवाच्या शिलेदाराच्या बहिणीला ।

काय करायाची दिरा भावांची पालखी

भ्रतारावाचून नार दिसती हलकी ।

नारायणा बाप्पा तुला मागत नाही काही

माझ्या जोडव्या कुंकवाला आऊक घाल लई ।

चांदण टिप्पूर चांदण्या जोगी रात

शेजच्या भरताराची देवा सारखी सोबत ।

स्वर्गीच्या देवा एक अर्ज माझा घ्यावा

माझ्या कपाळीचं कुंकू माझ्या जलमी जाऊ द्यावा ।

पाटानं जातं पाणी ऊसा संगट कर्दळीला

हावशा माझ्या कांतानं जाई लाविली वर्दळीला ।

भ्रताराचं राज्य मी ग लुटीते सोन्यावाटं

आजून पावतर नाही फिर्याद गेली कुठं ।

 

ओवी गीते : इतर

स्तोत्रे
Chapters
संग्रह १
संग्रह २
संग्रह ३
संग्रह ४
संग्रह ५
संग्रह ६
संग्रह ७
संग्रह ८
संग्रह ९
संग्रह १०
संग्रह ११
संग्रह १२
संग्रह १३
संग्रह १४
संग्रह १५
संग्रह १६
संग्रह १७
संग्रह १८
संग्रह १९
संग्रह २०
संग्रह २१
संग्रह २२
संग्रह २३
संग्रह २४
संग्रह २५
संग्रह २६
संग्रह २७
संग्रह २८
संग्रह २९
संग्रह ३०
संग्रह ३१
संग्रह ३२
संग्रह ३३
संग्रह ३४
संग्रह ३५
संग्रह ३६
संग्रह ३७
संग्रह ३८
संग्रह ३९
संग्रह ४०
संग्रह ४१
संग्रह ४२
संग्रह ४३
संग्रह ४४
संग्रह ४५
संग्रह ४६
संग्रह ४७
संग्रह ४८
संग्रह ४९
संग्रह ५०
संग्रह ५१
संग्रह ५२
संग्रह ५३
संग्रह ५४
संग्रह ५५
संग्रह ५६
संग्रह ५७
संग्रह ५८
संग्रह ५९
संग्रह ६०
संग्रह ६१
संग्रह ६२
संग्रह ६३
संग्रह ६४
संग्रह ६५
संग्रह ६६
संग्रह ६७
संग्रह ६८
संग्रह ६९
संग्रह ७०
संग्रह ७१
संग्रह ७२
संग्रह ७३
संग्रह ७४
संग्रह ७५
संग्रह ७६
संग्रह ७७
संग्रह ७८
संग्रह ७९
संग्रह ८०
संग्रह ८१
संग्रह ८२
संग्रह ८३
संग्रह ८४
संग्रह ८५
संग्रह ८६
संग्रह ८७
संग्रह ८८
संग्रह ८९
संग्रह ९०
संग्रह ९१
संग्रह ९२
संग्रह ९३
संग्रह ९४