Get it on Google Play
Download on the App Store

संग्रह ३६

बंधुजी पाहुणा माझ्या दाराला होती कडी

चतुर बंधुजीची शिंगी सोप्याला टांचा झाडी ।

शिंगीला खाना दाणा डाळ देते मी वाटाण्याची

चतुर बंधुजीची शिंगी माझ्या ग पठाणाची ।

बंधुजी पाहुणा दुरडी वेळीते शेवायाची

नड सांगते जावायाची ।

पाची पकवान्नाचं ताट करते गुलाबी हलवा

बंधुच्या पंगतीस दीर राजस बोलवा ।

पाची पकवान्नाचं ताट एक विसरलं वांगं

ताईता माझ्या बंधु चुकी झालेली मला सांग ।

नवरी पाहू आले आले पुण्याचे पुणेकर

बिन्दी पट्‌टा अलंकार घालूं केले ।

नवरी पाहू आले बसू घालावे अंगणी

नवरी नक्षत्र चांदणी ।

नवरी पाहू आले सोपा चढूनी माडी गेले

नवरी पाहुनी दंग झाले ।

नवरा पाहू आले काय पहातां घरदार

नवरा आहे वतनदार ।

नवरा पाहू आले काय पाहता वाडाझाडा

नवरा आहे चिमखडा ।

हौस मला मोठी वहिनीबाईला मुलगी व्हावी

खणचोळी कुंची न्यावी बारशाला ।

हौस मला मोठी बिंदल्याला सोनं घ्यावं

हौसेला बाळ व्हावं वहिनीला ।

हौस मला मोठी मोत्यांच्या भोकराची

मुंज तुमच्या तान्हीयाची ।

सासरचे बोल जशा रेशमाच्या गाठी

मी ग सोशीते तुझ्यासाठी मायबाई ।

सासरी जाता बाई डोळ्या माझ्या आलं पाणी

भल्या घरची लेक शाणी ।

भरल्या बाजारात मायलेकींची गंमत

माय बोलते शिंप्याला सांग चोळीची किंमत ।

माझ्या ग अंगणात शेजी नारीची सईना

कशी वळखू यीना तोळबंदाची माझी मैना ।

झाडाची सावली यावी झाडाच्या पुरती

बयाची माझ्या सर काय करील चुलती ।

उन्हाळ्याचं ऊन सये लागतं शेल्यातून

लाडक्या बाळराजा शिंगी काढ पागेतून ।

सावळ्या सुरतीकडे नार बघती कवाची

तान्हा राघू माझा रास दिसती गव्हाची ।

ओवी गीते : इतर

स्तोत्रे
Chapters
संग्रह १ संग्रह २ संग्रह ३ संग्रह ४ संग्रह ५ संग्रह ६ संग्रह ७ संग्रह ८ संग्रह ९ संग्रह १० संग्रह ११ संग्रह १२ संग्रह १३ संग्रह १४ संग्रह १५ संग्रह १६ संग्रह १७ संग्रह १८ संग्रह १९ संग्रह २० संग्रह २१ संग्रह २२ संग्रह २३ संग्रह २४ संग्रह २५ संग्रह २६ संग्रह २७ संग्रह २८ संग्रह २९ संग्रह ३० संग्रह ३१ संग्रह ३२ संग्रह ३३ संग्रह ३४ संग्रह ३५ संग्रह ३६ संग्रह ३७ संग्रह ३८ संग्रह ३९ संग्रह ४० संग्रह ४१ संग्रह ४२ संग्रह ४३ संग्रह ४४ संग्रह ४५ संग्रह ४६ संग्रह ४७ संग्रह ४८ संग्रह ४९ संग्रह ५० संग्रह ५१ संग्रह ५२ संग्रह ५३ संग्रह ५४ संग्रह ५५ संग्रह ५६ संग्रह ५७ संग्रह ५८ संग्रह ५९ संग्रह ६० संग्रह ६१ संग्रह ६२ संग्रह ६३ संग्रह ६४ संग्रह ६५ संग्रह ६६ संग्रह ६७ संग्रह ६८ संग्रह ६९ संग्रह ७० संग्रह ७१ संग्रह ७२ संग्रह ७३ संग्रह ७४ संग्रह ७५ संग्रह ७६ संग्रह ७७ संग्रह ७८ संग्रह ७९ संग्रह ८० संग्रह ८१ संग्रह ८२ संग्रह ८३ संग्रह ८४ संग्रह ८५ संग्रह ८६ संग्रह ८७ संग्रह ८८ संग्रह ८९ संग्रह ९० संग्रह ९१ संग्रह ९२ संग्रह ९३ संग्रह ९४