Get it on Google Play
Download on the App Store

संग्रह ४२

गावाला गेला म्हणू सांगूनी मला जावा

फोटो काढून घरी लाव ।

गावाला गेला म्हणू सांगूनी नाही गेला

सांजा न्याहारीचा वाया गेला ।

लाल पैठण म्हणती आणा आणा ग आयाराला

बाळ आलीया माहेराला ।

कृष्णदेव वैराळ, भर बांगडया तारच्या

बहिणी मनसुबादारांच्या ।

माहेर येवढं केलं नारळ पदरावरी

माझ्या त्या बंधुजीला सई माझी लई ।

माहेर येवढं केलं दोन्ही पदार राजा-राणी

माझ्या त्या बंधुजींनी केलं माहेर समृतांनी ।

हिरवी हिरकण शिंपी म्हणतो सव्वादोन

माझ्या बंधुजीच्या तालीवाराची मी भैन ।

माहेर येवढं केलं पाच आगळं शंभराचं

हौसच्या बंधूजीचं नाव लागलं गणीसाचं ।

चाटयाच्या दुकानात गंगासागर लुगडी

बंधु माझ्याला देखीताना चाटी दुकान उघडी ।

चाटयाच्या दुकानात मांडी घालून बैसला

माझा बंधुजी बघीतो रंगारंगाचा मासला ।

चाटयाच्या दुकानात बंधू बसलं दोघं-तिघं

काढा पातल बहिणाजोगं ।

माहेर येवढं केलं त्याचं पदार वाणीवजा

माझी तू बाळाबाई बंधु घेणार आहे तुझा ।

सासर्‍याला जाती लेक बघीती मागपुढं

जीव गुंतला आईकडं ।

सासर्‍याला जाती लेक कृष्णाकडच्या निवार्‍यानं

शालू भिजला दैवारानं ।

सासर्‍याला जाती लेक वाट लागली लवनाची

चांदी झिजली जोडव्याची ।

सासर्‍याला जाती लेक वाट लागली माळाची

बैल अवकाळ चाळांची ।

सासर्‍याला जाते घोडं धरीलं ज्यांनी त्यांनी

पाय झाकलं बंधुजींनी ।

लेकीच्या आईचं डोळ कशानं झालं लाल

बाळ सासर्‍याला गेली काल ।

सासर्‍याला जाती बघीती खालीवर

लहानाची केली थोर सत्ता चालना काडीभर ।

सासू नी सासरा दैवाचे नारी तुला

जाते माहेर भोगायाला ।

ओवी गीते : इतर

स्तोत्रे
Chapters
संग्रह १ संग्रह २ संग्रह ३ संग्रह ४ संग्रह ५ संग्रह ६ संग्रह ७ संग्रह ८ संग्रह ९ संग्रह १० संग्रह ११ संग्रह १२ संग्रह १३ संग्रह १४ संग्रह १५ संग्रह १६ संग्रह १७ संग्रह १८ संग्रह १९ संग्रह २० संग्रह २१ संग्रह २२ संग्रह २३ संग्रह २४ संग्रह २५ संग्रह २६ संग्रह २७ संग्रह २८ संग्रह २९ संग्रह ३० संग्रह ३१ संग्रह ३२ संग्रह ३३ संग्रह ३४ संग्रह ३५ संग्रह ३६ संग्रह ३७ संग्रह ३८ संग्रह ३९ संग्रह ४० संग्रह ४१ संग्रह ४२ संग्रह ४३ संग्रह ४४ संग्रह ४५ संग्रह ४६ संग्रह ४७ संग्रह ४८ संग्रह ४९ संग्रह ५० संग्रह ५१ संग्रह ५२ संग्रह ५३ संग्रह ५४ संग्रह ५५ संग्रह ५६ संग्रह ५७ संग्रह ५८ संग्रह ५९ संग्रह ६० संग्रह ६१ संग्रह ६२ संग्रह ६३ संग्रह ६४ संग्रह ६५ संग्रह ६६ संग्रह ६७ संग्रह ६८ संग्रह ६९ संग्रह ७० संग्रह ७१ संग्रह ७२ संग्रह ७३ संग्रह ७४ संग्रह ७५ संग्रह ७६ संग्रह ७७ संग्रह ७८ संग्रह ७९ संग्रह ८० संग्रह ८१ संग्रह ८२ संग्रह ८३ संग्रह ८४ संग्रह ८५ संग्रह ८६ संग्रह ८७ संग्रह ८८ संग्रह ८९ संग्रह ९० संग्रह ९१ संग्रह ९२ संग्रह ९३ संग्रह ९४