Android app on Google Play

 

संग्रह २१

 

सोनसळी ग गहू घंगाळी वलवीलं

माज ते बंदुराज भाऊबीजेला बोलवील ।

सोनसळी ग गहू शेजी काढीती नकुल्याला

बदुं माज्या त्या राजसाला भाऊबीज ग धाकल्याला ।

तांबडया मंदिल्याची वस्तु (उजेड) पडली सान्यावाटं

ताईता बंधू माझा चांद म्हवरीला (उगवला) कुठं ।

न्हवर्‍या परायास माजी नवरी लई गोरी

माजी तू भैनाबाई तिला हळद लाव थोडी ।

वळवाचा पाऊस ग फळी धरुन उठयीला

ताईता बंदु माजा बाळ कुनब्याचा नटयीला ।

सदरी सोप्यामंदी हंडे बिल्वर आराईस

माज्या त्या नातवाचं आज हाई ग बारईसं ।

हावस मला मोठी हौससारखं माझं झालं

सावळं बाळराज माज्या अंगनी पानी न्हालं ।

हावस मला मोठी हिरवं लुगडं भरजरी

राजस बाळ माज्या नातू घेतला कडेवरी ।

सासर येवढा वस माझ्या जलमी ठावं नाही

सासू नव्हती बयाबाई ।

सासर येवढा वस जिर्‍या मिर्‍याला आलं घस

जातीवंताचे लेकी सोस ।

सासर येवढा वस जिनं करुनी तीनं केला

नाही बेगडी रंग गेला मैनाबाई ।

सासर वासिनीला नाही आधार कुणाचा

भैनाबाई कंत देवाच्या गुणाचा ।

सासरवासिनीला पंढरी आठवली

देवा माझ्या विठ्‍ठलानी पत्रं दोन पाठीवली ।

बाळ सासर्‍याला जाती येशीत झाली दाटी

चुलता पंडीत पानं वाटी ।

बाळ सासर्‍याला जाती डोळ्याला यीना पानी

ती का अंतरीची शानी ।

सासरवासिनी बस माझ्या तू ओसरी

तुझ्या शिनची माझी बाळ नांदती सासरी ।

सासर्‍याला जाती लेक कुणाची अनिवार

हाती सोन्याचं बिलवार बाळाबाई ।

सासर्‍याला जाती संगं सिदूरी राजूर्‍याची

लेक मराठी गुजराची ।

सासर्‍याला जाती बहीण भावाच्या आवडीची

तीला घालवाया बाई सभा ऊठली चावडीची ।

सासर्‍याला जाती ती का करिती फुंदूं फुंदूं

संगं मुराळी दोघ बंदू ।

 

ओवी गीते : इतर

स्तोत्रे
Chapters
संग्रह १
संग्रह २
संग्रह ३
संग्रह ४
संग्रह ५
संग्रह ६
संग्रह ७
संग्रह ८
संग्रह ९
संग्रह १०
संग्रह ११
संग्रह १२
संग्रह १३
संग्रह १४
संग्रह १५
संग्रह १६
संग्रह १७
संग्रह १८
संग्रह १९
संग्रह २०
संग्रह २१
संग्रह २२
संग्रह २३
संग्रह २४
संग्रह २५
संग्रह २६
संग्रह २७
संग्रह २८
संग्रह २९
संग्रह ३०
संग्रह ३१
संग्रह ३२
संग्रह ३३
संग्रह ३४
संग्रह ३५
संग्रह ३६
संग्रह ३७
संग्रह ३८
संग्रह ३९
संग्रह ४०
संग्रह ४१
संग्रह ४२
संग्रह ४३
संग्रह ४४
संग्रह ४५
संग्रह ४६
संग्रह ४७
संग्रह ४८
संग्रह ४९
संग्रह ५०
संग्रह ५१
संग्रह ५२
संग्रह ५३
संग्रह ५४
संग्रह ५५
संग्रह ५६
संग्रह ५७
संग्रह ५८
संग्रह ५९
संग्रह ६०
संग्रह ६१
संग्रह ६२
संग्रह ६३
संग्रह ६४
संग्रह ६५
संग्रह ६६
संग्रह ६७
संग्रह ६८
संग्रह ६९
संग्रह ७०
संग्रह ७१
संग्रह ७२
संग्रह ७३
संग्रह ७४
संग्रह ७५
संग्रह ७६
संग्रह ७७
संग्रह ७८
संग्रह ७९
संग्रह ८०
संग्रह ८१
संग्रह ८२
संग्रह ८३
संग्रह ८४
संग्रह ८५
संग्रह ८६
संग्रह ८७
संग्रह ८८
संग्रह ८९
संग्रह ९०
संग्रह ९१
संग्रह ९२
संग्रह ९३
संग्रह ९४