Android app on Google Play

 

संग्रह ६७

 

चांगुल तुझं पण माती लागेना अंगुठ्याला

माझ्या बंधवाच्या रंग कुसूंबी पागुटयाला ।

नका नाव ठेवू काळ्या सावळ्या मनुष्याला

माझ्या बंधवाला जानी दंडती गणेशाला ।

काळ्या सावळ्या मनुष्याला नावं ठेवाया नाही जागा

आखूड याचा बांधा शिलमण्याच्या माळेजोगा ।

सावळ्या सुरतीचा वास सुगंध सुटला

माझा बंधुराया कुठं केवढा भेटला ।

सावळी सुरत कोटाच्या पाकीटात

बंधुला झाली दृष्ट बाई देशीच्या नाटकात ।

सावळ्या सुरतीचा जरी रुमाल शोभा देत

माझ्या बंधुराया वैनी माझ्या गावा येत ।

माळ्याच्या मळ्यात कोण हिंडतो लगोबीगी

सावळा माझा बंधु जाई धुंडतो तुर्‍याजोगी ।

वाटच्या वाटसरा चल घरला देते पाणी

सावळी सुरत माझ्या ताईत बंधुवानी ।

माळ्याच्या मळ्यात कोण हिंडतो केसाचा

ताईत माझा बंधु चाफा धुंडतो वासाचा ।

पानाचा खातावणा रंगल्या दात दाढा

तुझ्या सुरतीचा येईना कुठं तोडा ।

पान खाऊ खाऊ खोलीचं तोंड लाल

माझ्या बंधुचा रंगमहाल ।

पानाचा खातावणा लवंगा देते पसापसा

दात हिरकणीचा ठसा तोंड रुमालानी पुसा ।

तांबूळीणबाई पानं कशी ही शंभर

पान खाणार सुंदर बारा वर्षांची उमर ।

सावळी सुरत ज्याची त्याला बघा प्यारी

माझा बंधुराया गोर्‍याला ग मागं सारी ।

पोटीच्यापरास पाठीच्या वेदना

पाठीचा बंधुराया बाळपणीच्या सजना ।

लुगडं घेतलं पदराला माझ्या भिंग

नारी खेडयाच्या झाल्या दंग ।

दिवस मावळला माळाच्या आडुशानं

हावशा माझा बंध चंद्र निघाला कडुशानं ।

घरात करती धंदा आहे बाहेर माझा काना

हावश्या माझा बंधु माझ्या भडंग्या गाडीवाना ।

फाटलि माझी चोळी धुन्यात धुन धुता

हावश्या बंधवाला सांगा वाडयात जाता जाता ।

बहिण भावंडांचं भांडान किलीबिली

पाठीच्या बंधवानं नाही अजून शिवी दिली ।

सकाळच्या पारी चिमण्या बायांनी काय खावं

मायबापाची आम्रावली लेकी राजूला काय व्हावं ।

साळु जाती सासर्‍याला रडू आलं देवाजीला

पोटीच्या वेदना काय ठाव त्या पांडवाला ।

वार्‍याच्या झोक्यानं पान केळीचं फाटलं

दुष्टाच्या बोलण्यानं मन माझं हे विटलं ।

पहाटेच्या प्रहर रात्री कोण मंजुळ गाणं गातो

राजस भाईराया पानमळ्याला पाणी देतो ।

काळी ग चंद्रकळा दोन्ही पदर गहूं गहूं

राजस भाईराया चला गोकाकी रंग पाहू ।

 

ओवी गीते : इतर

स्तोत्रे
Chapters
संग्रह १
संग्रह २
संग्रह ३
संग्रह ४
संग्रह ५
संग्रह ६
संग्रह ७
संग्रह ८
संग्रह ९
संग्रह १०
संग्रह ११
संग्रह १२
संग्रह १३
संग्रह १४
संग्रह १५
संग्रह १६
संग्रह १७
संग्रह १८
संग्रह १९
संग्रह २०
संग्रह २१
संग्रह २२
संग्रह २३
संग्रह २४
संग्रह २५
संग्रह २६
संग्रह २७
संग्रह २८
संग्रह २९
संग्रह ३०
संग्रह ३१
संग्रह ३२
संग्रह ३३
संग्रह ३४
संग्रह ३५
संग्रह ३६
संग्रह ३७
संग्रह ३८
संग्रह ३९
संग्रह ४०
संग्रह ४१
संग्रह ४२
संग्रह ४३
संग्रह ४४
संग्रह ४५
संग्रह ४६
संग्रह ४७
संग्रह ४८
संग्रह ४९
संग्रह ५०
संग्रह ५१
संग्रह ५२
संग्रह ५३
संग्रह ५४
संग्रह ५५
संग्रह ५६
संग्रह ५७
संग्रह ५८
संग्रह ५९
संग्रह ६०
संग्रह ६१
संग्रह ६२
संग्रह ६३
संग्रह ६४
संग्रह ६५
संग्रह ६६
संग्रह ६७
संग्रह ६८
संग्रह ६९
संग्रह ७०
संग्रह ७१
संग्रह ७२
संग्रह ७३
संग्रह ७४
संग्रह ७५
संग्रह ७६
संग्रह ७७
संग्रह ७८
संग्रह ७९
संग्रह ८०
संग्रह ८१
संग्रह ८२
संग्रह ८३
संग्रह ८४
संग्रह ८५
संग्रह ८६
संग्रह ८७
संग्रह ८८
संग्रह ८९
संग्रह ९०
संग्रह ९१
संग्रह ९२
संग्रह ९३
संग्रह ९४