Get it on Google Play
Download on the App Store

संग्रह २६

सरलं दळान माझी उरली वंजळ

माहेरच्या दारी सोन्याची तुळस न्‌ मोत्यांची माळ ।

सरीलं दळण सरलं म्हणाया लाज वाटं

बंधुच्या वाडयात कणगी बळात सोप्या दाटं ।

दिवस उगवला जसा आगीचा भडका

तेचीया उजेडानं दिसती माहेरच्या सडका ।

सत्य नारायण देवा तुझं सत्त्व सोडूं नको

माझीया बंधुजीला गळ कशात पाडूं नको ।

पाण्याला जाती नार तिचं पाण्यावर नाही चित्त

माझा बंधुजी हिरा झळकतो बारवांत ।

सकाळी उठुनी रांजन धुते मी घाईघाई

माजा ग बंधुजी खांद्या घागर उभा राही ।

जिवाला वाटतं गांवा कुणाच्या जाऊं नाही

बया मालनी शिवाय भेट कुणाला देवूं नाही ।

भरल्या बाजारात ऊंच दुकान अत्ताराचं

लाडके भैनाबाई राज्य अखंड भ्रताराचं ।

सासूचा सासुरवास शीलवंताचे मुली सोस

माझी तूं बाळाबाई हे ग जातील दोन दिस ।

सूनेला सासुरवास सासू कैकयीनं केला

रामासारखा भ्रतार नाही सितेला भोगू दिला ।

भ्रताराची सेवा करावी अदरानं

कुमुदीनी भैनाबाई पाय पुशीती पदरानं ।

सासू सासरा आधी देवाला मागावं

कुमुताई भैनाबाई मग माहेर भोगावं ।

सासू सासरा आहे दैवाच्या जांवायाला

बंधु माझा राजस जातो दिवाळी जेवायाला ।

नार ही लेनं लेती ईस पुतळ्या कवाकवा

कपाबीळीचं कुंकू नित दागिना माझा नवा ।

शजी नेसती ईसाचं माझं तीसाचं दांडीवर

काळी ती चंद्रकळा हौशा कंताच्या मांडीवर ।

माहेरला जाते तुझ्या माहेरी काई काई

देवानं मला दिले भावापरास भाचे लई ।

मावशी म्हणुनी हांक मारिली मला कुणी

सतीश बाळायानं माझ्या बहिणीच्या बाळायानी ।

माडीचा जानवस कोण मागते हावशी

आक्का ती भैनाबाई नवर्‍या बाळाची मावशी ।

जोडीच्या मायाबहिणी मी का जोडील्या देशोदशी

मोहिनी माझ्या गावापाशी ।

जोडीली मायाभैन मैना ती ग परजातीची

हाती पेढयाचा ग पुडा आली मध्यानरात्रीची ।

ओवी गीते : इतर

स्तोत्रे
Chapters
संग्रह १ संग्रह २ संग्रह ३ संग्रह ४ संग्रह ५ संग्रह ६ संग्रह ७ संग्रह ८ संग्रह ९ संग्रह १० संग्रह ११ संग्रह १२ संग्रह १३ संग्रह १४ संग्रह १५ संग्रह १६ संग्रह १७ संग्रह १८ संग्रह १९ संग्रह २० संग्रह २१ संग्रह २२ संग्रह २३ संग्रह २४ संग्रह २५ संग्रह २६ संग्रह २७ संग्रह २८ संग्रह २९ संग्रह ३० संग्रह ३१ संग्रह ३२ संग्रह ३३ संग्रह ३४ संग्रह ३५ संग्रह ३६ संग्रह ३७ संग्रह ३८ संग्रह ३९ संग्रह ४० संग्रह ४१ संग्रह ४२ संग्रह ४३ संग्रह ४४ संग्रह ४५ संग्रह ४६ संग्रह ४७ संग्रह ४८ संग्रह ४९ संग्रह ५० संग्रह ५१ संग्रह ५२ संग्रह ५३ संग्रह ५४ संग्रह ५५ संग्रह ५६ संग्रह ५७ संग्रह ५८ संग्रह ५९ संग्रह ६० संग्रह ६१ संग्रह ६२ संग्रह ६३ संग्रह ६४ संग्रह ६५ संग्रह ६६ संग्रह ६७ संग्रह ६८ संग्रह ६९ संग्रह ७० संग्रह ७१ संग्रह ७२ संग्रह ७३ संग्रह ७४ संग्रह ७५ संग्रह ७६ संग्रह ७७ संग्रह ७८ संग्रह ७९ संग्रह ८० संग्रह ८१ संग्रह ८२ संग्रह ८३ संग्रह ८४ संग्रह ८५ संग्रह ८६ संग्रह ८७ संग्रह ८८ संग्रह ८९ संग्रह ९० संग्रह ९१ संग्रह ९२ संग्रह ९३ संग्रह ९४