Get it on Google Play
Download on the App Store

संग्रह ११

जासूदाच्या मुला तुला सांगीती खाणाखुणा

पित्या माझ्या त्या दौलताचा नवा बुरुज वाडा जुना ।

काळी ग चंद्रकळा, काळी कसाई तिचं नाव

पित्या माझ्या दौलतांनी सारी धुंडीली गाव ।

जिवाला भारी जड माझ्या उशाला येलदोड

पित्या माझ्या दौलताची हिरवी मोटार वाडयापुढं ।

बंधुजी पावणा शेजी सांगत आली रंभा

बंधू माझाच्या भोजनाला घड केळीचा पिवळा आंबा ।

पोटीच पुत्र फळ देवाजी देता झाला

मेव्हणा राजसांनी ओटा शालूचा पसरीला ।

उन्हाच्या रखामधी चिमण्या कोठयाला येतीजाती

सयानू किती सांगू मला बयाची याद हुती ।

शेजारीणबाई बस म्हनाई व्हव तुला

माझ्या बयाची सव मला ।

भरील्या बाजारात काय करावं किराण्याला

सयानू किती सांगू बया असावी परान्याला ।

आईबापांनी दिली लेक आंबा ऊंबर तिच्या शेती

लाडकी एवढी लेक आईबापाला दुवा देती ।

आईबापान दिली लेक लेक देऊनी माग आला

तिच्या ग नशीबाचा धनी जामीन नाही झाला ।

अंबारीचा हत्ती भरल्या पेठत गेला रिता

लेकीच्या बापाला धाडा म्हणाया न्हाई सत्ता ।

बाळ सासर्‍याला जाती मागं फिरुन बघीना

माझा तो बंधुराया संग झडपाचा दागीना ।

काळी ग चंद्रकळा त्याचा पदर राम सिता

नेस म्हणती माझी माता घडी उघडीतो माझा पिता ।

सासू नी सासयिरा मला दिलं गोविंदानं

जाते सासरी आनंदानं ।

सासू नी सासर्‍याचा आशिर्वाद घ्यावा सून

पोटी फळाला काय उणं ।

सासू नी सासरा दोन्ही सोन्याची पाखरं

त्यांच्या हाताखाली आम्ही लोकांची लेकरं ।

आई परायास सासूबाईचा उपकार

सासूबाई मालनीन दिला प्रेमाचा चंद्रहार ।

आईबापाच्या पुण्याईन गाव नाशिक पाहिलं

नारळाच फळ कुशीवर्ताला वाहिलं ।

अंगणी माझ्या फुले गुलाब पानोपानी

सासर्‍याला गेली माझी जिवाची फुलराणी ।

अंगणी माझ्या आला आला मोगरा बहरा

सुकल्या फुलमाळा सई येईना माहेरा ।

ओवी गीते : इतर

स्तोत्रे
Chapters
संग्रह १ संग्रह २ संग्रह ३ संग्रह ४ संग्रह ५ संग्रह ६ संग्रह ७ संग्रह ८ संग्रह ९ संग्रह १० संग्रह ११ संग्रह १२ संग्रह १३ संग्रह १४ संग्रह १५ संग्रह १६ संग्रह १७ संग्रह १८ संग्रह १९ संग्रह २० संग्रह २१ संग्रह २२ संग्रह २३ संग्रह २४ संग्रह २५ संग्रह २६ संग्रह २७ संग्रह २८ संग्रह २९ संग्रह ३० संग्रह ३१ संग्रह ३२ संग्रह ३३ संग्रह ३४ संग्रह ३५ संग्रह ३६ संग्रह ३७ संग्रह ३८ संग्रह ३९ संग्रह ४० संग्रह ४१ संग्रह ४२ संग्रह ४३ संग्रह ४४ संग्रह ४५ संग्रह ४६ संग्रह ४७ संग्रह ४८ संग्रह ४९ संग्रह ५० संग्रह ५१ संग्रह ५२ संग्रह ५३ संग्रह ५४ संग्रह ५५ संग्रह ५६ संग्रह ५७ संग्रह ५८ संग्रह ५९ संग्रह ६० संग्रह ६१ संग्रह ६२ संग्रह ६३ संग्रह ६४ संग्रह ६५ संग्रह ६६ संग्रह ६७ संग्रह ६८ संग्रह ६९ संग्रह ७० संग्रह ७१ संग्रह ७२ संग्रह ७३ संग्रह ७४ संग्रह ७५ संग्रह ७६ संग्रह ७७ संग्रह ७८ संग्रह ७९ संग्रह ८० संग्रह ८१ संग्रह ८२ संग्रह ८३ संग्रह ८४ संग्रह ८५ संग्रह ८६ संग्रह ८७ संग्रह ८८ संग्रह ८९ संग्रह ९० संग्रह ९१ संग्रह ९२ संग्रह ९३ संग्रह ९४