Android app on Google Play

 

संग्रह ३७

 

एकुलता एक नका म्हणू पांडवाला

कारल्याचा येल सारा मांडव झाकला ।

पाऊस पाण्याची झळ लागली वार्‍याची

माय माऊलीची माझी पासोडी निवार्‍याची ।

तांबडया लुगडयाला डाग पडला काजळाचा

नातू कडेला जावळाचा ।

तरवड फुलला सोन्यापरास सवाई

लेकाची सर काय करील जांबाई ।

जोडवी झिनकार तुझ्या बिरुदीवर मोर

सावळी मैना माझी लेक खेळती तालीवार ।

दीरभावजयाचं राज्य जशी काटयांची पांजणी

चुडयाचं माज्या राज्य जहागिरी लाखाची साजणी ।

काळी ती चंद्रकळा धुवूधुवूनी नेसावी

आपल्या जन्माला असावी मायबाई ।

काळी ग चंद्रकळा धुवूधुवूनी झाला बोळा

रुपये दिले साडेसोळा बापाजींनी ।

काळी ग चंद्रकळा नको नेसू अंगणात

पति तुजा बंगल्यात भैनाबाई ।

काळी ग चंद्रकळा पदरी रामसीता

नेसली पतिव्रता मायबाई ।

काळी ग चंद्रकळा खडीनं भरली

संसारी रंगली वैनीबाई ।

भरील्या बाजारात काय किरान्या तुजी दाटी

बंदू हिंडतो बहिणीसाठी ।

लुगडं ग घेतीईलं त्याला रेशमी काडी काडी

नाही नेसत घाला घडी ।

मावबीळनी आत्या तुज्या माहेरी माझी सत्ता

तुजा बंदूजी माझा पिता ।

लुगडं घेतीईलं त्याला रेशमी नाही काही

माऊली ग बया बोल लेकी येवडयानं झालं नाही ।

लुगडं घेतीईलं त्याचा पदर दीडश्याचा

ताईता ग बंदूजीचा त्यांचा मैतर बडोद्याचा ।

सकाबीळच्या पारी वासुदेवाची आली फेरी

बया चांगुना दान करी ।

लुगबीडयाच्या आदी कसा पदर फाटला

पिताःमाज्याच्या जिवावरी नाही गुमान वाढला ।

बंदुजी पावना पडे उजेड वाडयावरी

हाती कंदील घोडयावरी ।

माह्यार माझं केलं एका बिग्याचा वसूल

सया बोलल्याल्या बंदू सम्रत असल ।

 

ओवी गीते : इतर

स्तोत्रे
Chapters
संग्रह १
संग्रह २
संग्रह ३
संग्रह ४
संग्रह ५
संग्रह ६
संग्रह ७
संग्रह ८
संग्रह ९
संग्रह १०
संग्रह ११
संग्रह १२
संग्रह १३
संग्रह १४
संग्रह १५
संग्रह १६
संग्रह १७
संग्रह १८
संग्रह १९
संग्रह २०
संग्रह २१
संग्रह २२
संग्रह २३
संग्रह २४
संग्रह २५
संग्रह २६
संग्रह २७
संग्रह २८
संग्रह २९
संग्रह ३०
संग्रह ३१
संग्रह ३२
संग्रह ३३
संग्रह ३४
संग्रह ३५
संग्रह ३६
संग्रह ३७
संग्रह ३८
संग्रह ३९
संग्रह ४०
संग्रह ४१
संग्रह ४२
संग्रह ४३
संग्रह ४४
संग्रह ४५
संग्रह ४६
संग्रह ४७
संग्रह ४८
संग्रह ४९
संग्रह ५०
संग्रह ५१
संग्रह ५२
संग्रह ५३
संग्रह ५४
संग्रह ५५
संग्रह ५६
संग्रह ५७
संग्रह ५८
संग्रह ५९
संग्रह ६०
संग्रह ६१
संग्रह ६२
संग्रह ६३
संग्रह ६४
संग्रह ६५
संग्रह ६६
संग्रह ६७
संग्रह ६८
संग्रह ६९
संग्रह ७०
संग्रह ७१
संग्रह ७२
संग्रह ७३
संग्रह ७४
संग्रह ७५
संग्रह ७६
संग्रह ७७
संग्रह ७८
संग्रह ७९
संग्रह ८०
संग्रह ८१
संग्रह ८२
संग्रह ८३
संग्रह ८४
संग्रह ८५
संग्रह ८६
संग्रह ८७
संग्रह ८८
संग्रह ८९
संग्रह ९०
संग्रह ९१
संग्रह ९२
संग्रह ९३
संग्रह ९४