Get it on Google Play
Download on the App Store

संग्रह ५४

१.

तुझ्या जिवासाठी जीव माझा ईकीन

नेनत्या बंदु तुला ताजवा जोखीन ।

माळ्याच्या मळ्यामंदी असा बाई ग कावळा

द्रिस्ट ग लागली माझ्या हरीच्या जावळा ।

चवदा भवनात आंथरली शाल

पोटी जन्मला लाल मन झालं खुशाल ।

सावळ्या सुरतीची नार बघती खालीवर

माझ्या वानीनीच्या बाळाला घोळ माझा डौलदार ।

२.

भरताराचं राज जसा पान्याचा हाऊद

लाडके माझे बाई कर मनाची मऊज ।

लेकीचा जलम नको घालू देवराया

केले कष्ट गेले वाया मायबाईचे माझ्या ।

चिक्‌क्‌न सुपारी रुपयाची पसाभर

सावळ्या भरतारा रानीचा छंद फार ।

चिक्‌क्‌न सुपारी अडकित्यानं कुटना

सावळ्या भरतारला भीड रानीची तुटना ।

सावळ्या सुरतीची नारीला पडली भूल

रस्त्यानं नाग डूल भाईराजा ।

सावळ्या सुरतीची नार रडं घळघळा

जलदी वलांडं पानमळा ।

माईचं माहेर भावाची धर्मपुरी

सांगते बहिनाबाई भाच्याची लंका दूरी ।

लेकीचा जलम जसा गाजराचा वाफा

माय हरने माझे माया लावूनी काय नफा ।

हिरवा कारला वैराळाचे बैलावरी

बंदु हाय पारावरी छंद घेते मी नानापरी ।

वैराळा तू रे दादा भर बीलवरामंदी छंदु

मोल द्यायाचा माझा बंधु ।

जेवनाची पाटी नेता मानेला झालं ओझं

हौशा राजसा शिवेला पानमळ तुझं ।

माहेरला जाते माझ्या जीवाला ईसावा

बापाजी बयाजी सारा संबंध असावा ।

बापाजी बयाजी दोन अमृताची कुंडं

त्यात जलमाला आला माझा पिंड ।

सासू नि सासरा दोन सोनियाच्या तारा

त्येंच्या सावलीला मला लागला ऊनवारा ।

सासूरवास एवढा नका करू सासूबाई

चांदी आली सोन्यापाई ।

सुनेला सासुरवास सासू तू ग बाई केला

लेक देशील परायाला अनुभव येईल तुला ।

लेकुरवाळीची ग निंदा करु नये भलत्यांनी

आडवा बाळ तान्हा गेला पदर वारयानी ।

सक्या गाडयायाला पोटी नाही फळ येक

पुतण्या केला लेक दिवा जळतो अंदुक ।

लेकीचा रे जलम कसा घातिला येडयानं

परायाच्या घरी गाय राबते भाडयानं ।

हात मी जोडते तुला येते काकूळती

अस्तुरीचा जन्म नको घालू रघुपती ।

जातीसाठी माती खाते मी परोपरी

सासरी माहेरी नाव करावं दुहेरी ।

जातीसाठी माती खडे खाते मी चाऊन

माझ्या घराण्याच्या बट्‌टा कुळीला नसायची ।

उभ्या गल्लीतून जाते पदर कपाळ भरुन

नाकासमोरची वाट जाते वाडाच्या म्होरून ।

उभ्या रस्त्यानं जाते पदर घेते पुडी

सासर माहेरचा नावलौकीक दुहीकडी ।

वाटच्या वाटसरा तुला वाढीते मी जेवू

माज्या पित्यायाचं नाव घेशील गांवागांवू ।

बारीक गळा बाई वार्‍यानं ऐकूं गेला

वाटच्या वाटसरानं घोडा मैदानी उभा केला ।

वाटचा वाटसर मला बघून झाला दूर

शेतात हाईती वाघासारखे माझे दीर ।

सरलं दळन उरले पाच गहू

औक्षवंत व्हावे एका जोडीचे सहा भाऊ ।

सरलं द्ळन सूपं झाडूनी उभी केली

माझ्या रामराया चित्तं तुझ्या गावा गेली ।

दळण सरलं हात खुटयाचे सुटले ग

जाऊबाईसंगं ववी गाऊन उठले ।

शंभर माझं गोत गोताची परवा थोडी

भाऊराया माझ्या तुम्हासाठी झाली येडी ।

गोरीचं गोरपन हळदीला मागं सारी

बाई माझ्या नेनंतीला दिस्ट लावून गेल्या नारी ।

हौस मला मोठी तुझ्या गर्व्हारपणाची

घालीन मी तुला चोळी अंजारी खणाची ।

हौस मला मोठी दानं मुठीनं नासावं

घराच्या अंगणी बाळ खेळत असावं ।

हौस मला मोठी बन्धुच्या बाळाची

घालीन बाळाला कुंची निर्‍याच्या घोळाची ।

लाल पिंजरीचं कुंकू पैशाला धडाधडा

लेकी सुनांनी माझ्या भरला चौकोनी वाडा ।

लाल पिंजरीचं कुंकू मी एकली कशी लेऊ

आणा बोलावूनी सोप्यां बसली माझी जाऊ ।

साळू सासर्‍याला जाती कवतिकाची सिता

सासरी धाळविती पुढं बंधू मागं पिता ।

साळू जाती सासर्‍याला तिच्या वटीला पान

गाडीत बसला संगं मुराळी पैलवान ।

लाडकी माझी लेक लाडाची होऊ नको

जाशील परघरा येडी माया लावू नको ।

दुबळ्यापनाचं नार सांगती गार्‍हानं

पुनवच्या दिवशी चंद्रा लागलं गिर्‍हान ।

दुबळ्यापनायाची लाज वाटती मला

नारी जलमाच्या काय करावं नशीबाला ।

दिवस मावळला माळाच्या खाली ऊन

भाऊराया माझा करडी घोडी पिवळा जीन ।

साळीच्या भातावरी साखर किती वाढुं

लिंबाजी बाळ माझ्या नको भाताची आळ काढू ।

माळ्याच्या मळ्यामंदी चाक वाजतं किरी किरी

बघत्या थराला केळ्या झाल्या बाळांतिनी ।

सांगून धाडीते आल्या गेल्याला गाठून

भाई राजस माझ्या लईंदी झालया भेटून ।

लावनीचा आंबा याला पारंबी फुटली

भाई रायाला पाहुनी जीवा संतोषी वाटली ।

गावा आल्या कळवातिनी जागा पुसती राहायाला

माझ्या भाऊरायाची रानी बसली नाह्याला ।

माझ्या घरी दूध शेजीनं दिलं ताक

सख्याच्यापरिस मला मालन अधिक ।

मालन कुंकू लावी बारीक गव्हावानी

भाई राजसा माझ्या रुप तुझं देवावानी ।

बहिनीच्या गावा भाऊ चालले तरत

असे जरीचे पटके बांधू लागले वाटत ।

रस्त्यावरी वाडा बारीक बांधनीचा

मधी उजेड चांदनीचा बहिनाबाईचा ।

सासूचा सासूरवास कडू लिंबाचा पाला

भरताराच्या जीवासाठी अमृत मानून गोड केला ।

लेकीची ग जात भिंतीवरला ग चुना

गावा गेली करमना बाई नेनंती माझी मैना ।

मी माझ्या घरी भाग्याची नांदते

भाई राजाची माझ्या भूषणानं चोळी लेते ।

ओवी गीते : इतर

स्तोत्रे
Chapters
संग्रह १ संग्रह २ संग्रह ३ संग्रह ४ संग्रह ५ संग्रह ६ संग्रह ७ संग्रह ८ संग्रह ९ संग्रह १० संग्रह ११ संग्रह १२ संग्रह १३ संग्रह १४ संग्रह १५ संग्रह १६ संग्रह १७ संग्रह १८ संग्रह १९ संग्रह २० संग्रह २१ संग्रह २२ संग्रह २३ संग्रह २४ संग्रह २५ संग्रह २६ संग्रह २७ संग्रह २८ संग्रह २९ संग्रह ३० संग्रह ३१ संग्रह ३२ संग्रह ३३ संग्रह ३४ संग्रह ३५ संग्रह ३६ संग्रह ३७ संग्रह ३८ संग्रह ३९ संग्रह ४० संग्रह ४१ संग्रह ४२ संग्रह ४३ संग्रह ४४ संग्रह ४५ संग्रह ४६ संग्रह ४७ संग्रह ४८ संग्रह ४९ संग्रह ५० संग्रह ५१ संग्रह ५२ संग्रह ५३ संग्रह ५४ संग्रह ५५ संग्रह ५६ संग्रह ५७ संग्रह ५८ संग्रह ५९ संग्रह ६० संग्रह ६१ संग्रह ६२ संग्रह ६३ संग्रह ६४ संग्रह ६५ संग्रह ६६ संग्रह ६७ संग्रह ६८ संग्रह ६९ संग्रह ७० संग्रह ७१ संग्रह ७२ संग्रह ७३ संग्रह ७४ संग्रह ७५ संग्रह ७६ संग्रह ७७ संग्रह ७८ संग्रह ७९ संग्रह ८० संग्रह ८१ संग्रह ८२ संग्रह ८३ संग्रह ८४ संग्रह ८५ संग्रह ८६ संग्रह ८७ संग्रह ८८ संग्रह ८९ संग्रह ९० संग्रह ९१ संग्रह ९२ संग्रह ९३ संग्रह ९४