Get it on Google Play
Download on the App Store

संग्रह ५

नवरीचा बाप मांडव घालीतो मोडयितो

नवर्‍याचा भाऊ आला चौघडा झोडीयीत ।

पहिल्या पंगतीला व्याही गायकवाड मानायाचे

लाडूच्या परायाती भजी येऊद्या लोण्यायाची ।

दुसर्‍या पंगतीला व्याही गुंजाळ जेऊयीन

पराती साखरीच्या चरव्या तुपाच्या घेऊयीन ।

सूनमुख पहाता कस मांडवी आल ऊन

सांगती चुडीयांना तुमी शेल्यांनी झाका सून ।

व्याही मी करु गेले मंडईचा दलाल

भांग मी भरीयीला संगमनेरीचा गुलाल ।

व्याही मी करु गेले जावा नंदाच्या मेळ्यामदी

सोन्याची मोहनमाळ सून राधाच्या गळ्यामदी ।

व्याही मी करु गेले जात जमात पाहूयींनी

आम्ही x x x च्या सुना आल्या हिल्लाळ लावूयींनी ।

आम्ही x x x च्या सुना एका रंगाच्या साडया नेसू

सासर पाटलांच्या शिलेदाराच्या सुना दिसू ।

सासू सासरे दोघे देव्हार्‍याचे देवू

बसलो पूजेला आम्ही जोडयांनी फूल वाहू ।

सासू सासरे आहेत घराला राखयान

सोन्याच्या उतरंडी चांदीची झाकायान ।

आईला म्हनू आई चुलतीला म्हनू काकू

भैना माझी इंदिरा माझ्या शब्दाचा मान राखू ।

गहू दळते पोळीला डाळ दळते भजायाला

बाळ माझ्यालं भोजन वाढते राजायाला ।

वैराळ दादा नको भरु तू कालाकीता

जोवर माझा पिता राजवर्खीची काय कथा ।

वैराळ दादा इथं कशाला दिलं पाल

चुडयाची लेनारीन मैना सासरी गेली काल ।

सरल दळण सरली आरती कापूराची

कपाळीच्या कुंकवासाठी सेवा करीते शंकराची ।

सासरी जाती लेक तिच्या डोळ्यात आलं पाणी

बाप म्हणतो माझी तान्ही ।

सासरी जाती लेक तिच्या डोळ्यात आल्या गंगा

एक महिन्याची बोली सांगा ।

सांगून पाठविते लखोटया पोटी चिठ्‌ठी

कथासहित यावे भेटी ।

सांगून धाडीयीते माझ्या सांगाव्या सर्सी यावं

भेट देऊनी मला जावं ।

साखरेचा लाडू मुंग्यांनी वेढीयला

तुझ्या मामानं धाडीयेला ।

ओवी गीते : इतर

स्तोत्रे
Chapters
संग्रह १ संग्रह २ संग्रह ३ संग्रह ४ संग्रह ५ संग्रह ६ संग्रह ७ संग्रह ८ संग्रह ९ संग्रह १० संग्रह ११ संग्रह १२ संग्रह १३ संग्रह १४ संग्रह १५ संग्रह १६ संग्रह १७ संग्रह १८ संग्रह १९ संग्रह २० संग्रह २१ संग्रह २२ संग्रह २३ संग्रह २४ संग्रह २५ संग्रह २६ संग्रह २७ संग्रह २८ संग्रह २९ संग्रह ३० संग्रह ३१ संग्रह ३२ संग्रह ३३ संग्रह ३४ संग्रह ३५ संग्रह ३६ संग्रह ३७ संग्रह ३८ संग्रह ३९ संग्रह ४० संग्रह ४१ संग्रह ४२ संग्रह ४३ संग्रह ४४ संग्रह ४५ संग्रह ४६ संग्रह ४७ संग्रह ४८ संग्रह ४९ संग्रह ५० संग्रह ५१ संग्रह ५२ संग्रह ५३ संग्रह ५४ संग्रह ५५ संग्रह ५६ संग्रह ५७ संग्रह ५८ संग्रह ५९ संग्रह ६० संग्रह ६१ संग्रह ६२ संग्रह ६३ संग्रह ६४ संग्रह ६५ संग्रह ६६ संग्रह ६७ संग्रह ६८ संग्रह ६९ संग्रह ७० संग्रह ७१ संग्रह ७२ संग्रह ७३ संग्रह ७४ संग्रह ७५ संग्रह ७६ संग्रह ७७ संग्रह ७८ संग्रह ७९ संग्रह ८० संग्रह ८१ संग्रह ८२ संग्रह ८३ संग्रह ८४ संग्रह ८५ संग्रह ८६ संग्रह ८७ संग्रह ८८ संग्रह ८९ संग्रह ९० संग्रह ९१ संग्रह ९२ संग्रह ९३ संग्रह ९४