Get it on Google Play
Download on the App Store

संग्रह ४५

माहेरच्या वाटं कशाची कुजबुज

माझ्या ग मनामधी बंधुरायाचं हितगुज ।

माझा ग बंधुराया नाही पुसून गेला गावा

हुरहुर वाटे मना चैन पडेना माझ्या जिवा ।

पहाटेच्या पार्‍यामंदी वारं सुटलं थंडगार

बंधूच्या आठवणी मनी वाटते हुरहूर ।

बंधुजी घेतो चोळी भावज करीते पुढं पुढं

दोघांच्या विचारानं माझ्या चोळीला रंग चढं ।

आईबापांच्या माघारी लेक माहेराला गेली

भावज गुजरीनं तिला धर्मशाळा दाखविली ।

माहेरचं डोंगर मले दिसे निया निया

डोंगरातून नदी बाई वाहे खय खया ।

नदी काठावर आंबराई तुह्य बन

आंबराईमंधी बाई माहे माहेरधन ।

माह्या माहेराची वाट खारीक खोबर्‍याची वाटी

मह्या बापानं आंदन गाई देल्या मह्यासाठी ।

जाईन माहेरा माहेरचा डौल कसा

भावाआधी बोले भाचा आत्याबाई खाली बसा ।

जाइन माहेरा मले बसाया घोंगडी

पाया पडायाले भावजया चढाओढी ।

जाईन माहेरा माहेर भोगायाले

सर्जेरावाच्या कामिनी हाताखाले राबायाले ।

जाईन माहेरा बसीन पित्यापाशी

गोट ऐकीन हिताची इसवा देते काशी ।

जाईन माहेरा माहेरी मायबाई

डोईची घागर इसवा भावजय देई ।

जाईन माहेरा मले इसवा कशाचा

दारी पाळणा भाच्याचा झोका देईन सायासाचा ।

जन जाते जतराले मीत जाते माहेराले

दोन्ही माजे आईबाप काशी तिरथ पाह्याले ।

गादली मही डोकी केसाच्या झाल्या लटा

डोई इचरे मही माता पानी टाके मह्या पिता ।

माय तुझ्या घरी राज केलं लेकावानी

चरुभर पानी तिनं केलं लोकावानी ।

बापाजीच्या घरी राज केलं रावणाचं

नाही उचललं पुढलं ताट जेवणाचं ।

मायची ग मया शेजी करायाले गेली

लटकी साखर जोंधळ्या पाना आली ।

भूक लागली पोटाले तोंड घालू कोन्या जाळी

आईची माया माज्या करवंद झाली काळी ।

भूक लागली पोटाले धुंडू कोणता डोंगर

आई माजी यशवदा आहे पिकलं उंबर ।

ओवी गीते : इतर

स्तोत्रे
Chapters
संग्रह १ संग्रह २ संग्रह ३ संग्रह ४ संग्रह ५ संग्रह ६ संग्रह ७ संग्रह ८ संग्रह ९ संग्रह १० संग्रह ११ संग्रह १२ संग्रह १३ संग्रह १४ संग्रह १५ संग्रह १६ संग्रह १७ संग्रह १८ संग्रह १९ संग्रह २० संग्रह २१ संग्रह २२ संग्रह २३ संग्रह २४ संग्रह २५ संग्रह २६ संग्रह २७ संग्रह २८ संग्रह २९ संग्रह ३० संग्रह ३१ संग्रह ३२ संग्रह ३३ संग्रह ३४ संग्रह ३५ संग्रह ३६ संग्रह ३७ संग्रह ३८ संग्रह ३९ संग्रह ४० संग्रह ४१ संग्रह ४२ संग्रह ४३ संग्रह ४४ संग्रह ४५ संग्रह ४६ संग्रह ४७ संग्रह ४८ संग्रह ४९ संग्रह ५० संग्रह ५१ संग्रह ५२ संग्रह ५३ संग्रह ५४ संग्रह ५५ संग्रह ५६ संग्रह ५७ संग्रह ५८ संग्रह ५९ संग्रह ६० संग्रह ६१ संग्रह ६२ संग्रह ६३ संग्रह ६४ संग्रह ६५ संग्रह ६६ संग्रह ६७ संग्रह ६८ संग्रह ६९ संग्रह ७० संग्रह ७१ संग्रह ७२ संग्रह ७३ संग्रह ७४ संग्रह ७५ संग्रह ७६ संग्रह ७७ संग्रह ७८ संग्रह ७९ संग्रह ८० संग्रह ८१ संग्रह ८२ संग्रह ८३ संग्रह ८४ संग्रह ८५ संग्रह ८६ संग्रह ८७ संग्रह ८८ संग्रह ८९ संग्रह ९० संग्रह ९१ संग्रह ९२ संग्रह ९३ संग्रह ९४