Get it on Google Play
Download on the App Store

संग्रह १४

बहिण सासर्‍याला जाते बंधु बसला वाटेवरी

आल्या गेल्याला विच्यारितो बहिणा गेलीया कुठवरी ।

बाळ सासर्‍याला जाते, दोघे बंधुजी दोहीकडे

मध्ये चांदणी तुझं घोडे ।

बाळ सासर्‍याला जाते रुसला मुराळी वाटेत

शिंगी सोडून बसला, लाडू ओटीचा वाटीत ।

आषाढ श्रावण दोन्ही महिने खडावाचे

पिता दौलत जया बाई दोन्ही दागिने जडावाचे ।

बंधुजी पाव्हणा यावा आंब्याच्या सुगींत

तूप वाढीन रसात ।

बंधुजी पाव्हणा माझ्या तुळशीला देतो तक्क्या

गुज बोलूया माझ्या सख्या ।

फाटली माझी चोळी देते ठिगाळ जायबंदी

शिंपी बयाच्या गावामंदी ।

मोकळा माझा हात, हात बंधूजी पाहिला

वैराळाचा नंदी त्यानं वाडयाला आणिला ।

सासुरवास ज्यानं करु नये त्यानं केला

माझी गुजर मायाभैन नाही शालूचा रंग गेला ।

सासरवसामधी नणंद कामिनी धाक भारी

कांता कारणं सोसणारी ।

सासूचा सासूरवास नंदा बायांनो उभी बसा

जीव रमेल माझा कसा ।

माय बापाच्या जीवावर लेकी खावावं साखर खोबरं

आपला मायबाप धनी कोटीचा जबर ।

माझ्या त्या एवढया बहिणी कशा गेल्यात देशोदेशी

त्यांची माझी भेट झाली गौरीच्या ग सणादिशी ।

जोवरी मायबाप लेकी येऊ द्या जाऊ द्या

आंब्यांची आंबराई एवढी बाळाला घेऊ द्या ।

जोवरी मायबाप लेकी माहेराची हवा

भाऊ भावजयांचं राज्य मग अम्मल आला नवा ।

म्हायार मला केलं केलं म्हायार ईरसर

लुगडं थोरल्या बंदुजीचं दुसर्‍या बंधूचा गळीसर ।

तिसर्‍या बंदूजीनं केला पैठणीवर खण

पिता दौलत माजा म्हनी झालं म्हायार मनहर ।

बया मालन माजी म्हनी जेव बाळाई पोटभर

चुलती मालन माजी म्हनं भेट बाळाई आमाबर ।

भावजा गुजरी म्हनयीती मोत्या पवळ्यानं ओटी भरा

भैना मालन म्हनयीती राकडी केवडा भांग भरा ।

चुलता पंडित म्हनयीती बाळ आवर लवकर

सावल्या आल्यात जोत्यावर ।

भाचबाळ म्हनयीती बस लौकरी घोडयावर

आडव आल्याती भरतार रथ सुटला शिवेवर ।

ओवी गीते : इतर

स्तोत्रे
Chapters
संग्रह १ संग्रह २ संग्रह ३ संग्रह ४ संग्रह ५ संग्रह ६ संग्रह ७ संग्रह ८ संग्रह ९ संग्रह १० संग्रह ११ संग्रह १२ संग्रह १३ संग्रह १४ संग्रह १५ संग्रह १६ संग्रह १७ संग्रह १८ संग्रह १९ संग्रह २० संग्रह २१ संग्रह २२ संग्रह २३ संग्रह २४ संग्रह २५ संग्रह २६ संग्रह २७ संग्रह २८ संग्रह २९ संग्रह ३० संग्रह ३१ संग्रह ३२ संग्रह ३३ संग्रह ३४ संग्रह ३५ संग्रह ३६ संग्रह ३७ संग्रह ३८ संग्रह ३९ संग्रह ४० संग्रह ४१ संग्रह ४२ संग्रह ४३ संग्रह ४४ संग्रह ४५ संग्रह ४६ संग्रह ४७ संग्रह ४८ संग्रह ४९ संग्रह ५० संग्रह ५१ संग्रह ५२ संग्रह ५३ संग्रह ५४ संग्रह ५५ संग्रह ५६ संग्रह ५७ संग्रह ५८ संग्रह ५९ संग्रह ६० संग्रह ६१ संग्रह ६२ संग्रह ६३ संग्रह ६४ संग्रह ६५ संग्रह ६६ संग्रह ६७ संग्रह ६८ संग्रह ६९ संग्रह ७० संग्रह ७१ संग्रह ७२ संग्रह ७३ संग्रह ७४ संग्रह ७५ संग्रह ७६ संग्रह ७७ संग्रह ७८ संग्रह ७९ संग्रह ८० संग्रह ८१ संग्रह ८२ संग्रह ८३ संग्रह ८४ संग्रह ८५ संग्रह ८६ संग्रह ८७ संग्रह ८८ संग्रह ८९ संग्रह ९० संग्रह ९१ संग्रह ९२ संग्रह ९३ संग्रह ९४