Android app on Google Play

 

संग्रह ६८

 

सडा सारवन मला अंघोळीची घाई

पाव्हनी काय आली घाटामाथा कमळजबाई ।

स्वप्नात आली हिरव्या पातळाची नार

घाटमाथा कमळजबाई गळा पुतळ्याचा हार ।

सकाळी उठोनी सडा देते अंगणाला

देवाजी शंकराला एकादश ब्राह्मणाला ।

घाटमाथा कमळजबाई आली स्वप्नी बसावया

सोन्याची सुपली मोती दिलेत निसाय ।

शंकराच्या मांडीवर दिवा जळतो लोण्याचा

उजेड काय पडे कमळजबाईच्या रुपाचा ।

झाडी झडाडती गाव निगडाळ्याची राई

थोरल्या हिंदोळ्यात वाघ अडवितो गाई ।

वाजंत्री वाजत्याती गाव निगडाळ्या पासून

आनंदी कमळजबाई आली रथात बसून ।

आई कमळजबाई घाटावर उभी राहे

तुझ्या माहेराची हवा कोकणाची पाहे ।

आई कमळजबाई तुझा सोन्याचा लंगोर

दैत्य मारुनी केला घाटात संहार ।

आई कमळजबाई उभी राहे दाखनीला

पिकलं कोकण सुख लागले कोकणाला ।

पिकला कोकण जिर्‍या मिर्‍याला आले घड

आई कमळजबाई खेपाला बैल धाड ।

भरली शिवरात्र भरल्या झाडीतूनी

आनंदी कमळजबाई हवा पाहे गाडीतूनी ।

आई कमळजबाई गेली साकेरी पाव्हणी

हाती सर्पाचा चाबूक दिल्या वाघाला दावनी ।

आई कमळजबाई तिथीमधी न्हाली

केस वाळवाया चौर्‍या डोंगरावरी गेली ।

भरली शिवरात्र पानं पडली आत्तराची

आनंदी कमळजबाई शाव भोगी शेंदराची ।

निघाली भिमाबाई दुधा तुपाच्या उकळ्या

देवा शंकरानं जटा सोडील्या मोकळ्या ।

आनंदी कमळजबाई गेली वाडया नहयारानं

जरीचा पदर ईचा भिजला दैवरानं ।

भिमाबाई बोल स्थिर स्थिर भिवराई

येणारा तुझा बंधु आजून आला नाही ।

 

ओवी गीते : इतर

स्तोत्रे
Chapters
संग्रह १
संग्रह २
संग्रह ३
संग्रह ४
संग्रह ५
संग्रह ६
संग्रह ७
संग्रह ८
संग्रह ९
संग्रह १०
संग्रह ११
संग्रह १२
संग्रह १३
संग्रह १४
संग्रह १५
संग्रह १६
संग्रह १७
संग्रह १८
संग्रह १९
संग्रह २०
संग्रह २१
संग्रह २२
संग्रह २३
संग्रह २४
संग्रह २५
संग्रह २६
संग्रह २७
संग्रह २८
संग्रह २९
संग्रह ३०
संग्रह ३१
संग्रह ३२
संग्रह ३३
संग्रह ३४
संग्रह ३५
संग्रह ३६
संग्रह ३७
संग्रह ३८
संग्रह ३९
संग्रह ४०
संग्रह ४१
संग्रह ४२
संग्रह ४३
संग्रह ४४
संग्रह ४५
संग्रह ४६
संग्रह ४७
संग्रह ४८
संग्रह ४९
संग्रह ५०
संग्रह ५१
संग्रह ५२
संग्रह ५३
संग्रह ५४
संग्रह ५५
संग्रह ५६
संग्रह ५७
संग्रह ५८
संग्रह ५९
संग्रह ६०
संग्रह ६१
संग्रह ६२
संग्रह ६३
संग्रह ६४
संग्रह ६५
संग्रह ६६
संग्रह ६७
संग्रह ६८
संग्रह ६९
संग्रह ७०
संग्रह ७१
संग्रह ७२
संग्रह ७३
संग्रह ७४
संग्रह ७५
संग्रह ७६
संग्रह ७७
संग्रह ७८
संग्रह ७९
संग्रह ८०
संग्रह ८१
संग्रह ८२
संग्रह ८३
संग्रह ८४
संग्रह ८५
संग्रह ८६
संग्रह ८७
संग्रह ८८
संग्रह ८९
संग्रह ९०
संग्रह ९१
संग्रह ९२
संग्रह ९३
संग्रह ९४