तीन मुले 134
‘होय हो बुधा, मलाही असेच वाटते. मंगाचा तुझ्यात अवतार झाला असे मला वाटते. ज्या दिवशी तू मला विचारलेस त्या दिवशी मंगाच तुझ्यात संचारला असावा. आपल्या मधुरीला व मुलांना दु:ख पडू नये, कष्ट पडू नयेत म्हणून मंगानेच या बुधाला प्रेरणा दिली असावी. नाही तर भित्रा बुधा असे विचारायला धजता ना.’