Get it on Google Play
Download on the App Store

तीन मुले 10

‘मी दोघांची लहानशी बायको. म्हणजे हे भांडणार नाहीत.’ मधुरी म्हणाली.
‘लटापटीच्या खेळात सारे चालते. मुले आहात अजून.’ म्हातारी म्हणाली.
‘मधुरी पाया पड आजीबाईच्या.’ मंगा म्हणाला.

मधुरी म्हातारीच्या पाया पडली. म्हातारीने तिला कुरवाळले, पोटाशी धरले.
‘आजी, तू दोघांची छोटी राणी हो असा मधुरीला आशीर्वाद दे ना.’ बुधा म्हणाला.
‘असे कसे म्हणू?’ म्हातारी म्हणाली.

‘लटोपटीच्या खेळात सारे चालते. तू नाही का आमच्या खेळात सामील?’ तू सुध्दा आमच्या खेळातीलच जणू. म्हण ना ग आजी, नाही तर आम्ही तुझ्याकडे येणार नाही.’ मंगा म्हणाला.
‘मधुरी, दोघांची छोटी राणी हो, छोटी नवरी हो.’ म्हातारी हसून म्हणाली.

‘आजी, आता नवरावरीचे तोंड गोड कर ना.’ मंगा म्हणाला.
‘अरे लबाडा!’ म्हातारी म्हणाली.
म्हातारीने त्यांना केळी व गूळ दिला. मुलांना आनंद झाला. लग्नाची मेजवानी झाली.

‘आजी, मेजवानी झाली लग्नाची.’ बुधा म्हणाला.
‘परंतु वाजंत्री कोठे आहेत?’ मंगा म्हणाला.
‘समुद्राच्या लाटांची वाजंत्री.’ म्हातारी म्हणाली.
‘खरेच की.’ मधुरी हसून म्हणाली.

तिघे घरी जायला निघाली. हसत खेळत जात होती. आधी बुधाच्या घराजवळ ती आज सारी आली. ‘मधुरी, तू माझीही आहेस हो.’ बुधा हळूच म्हणाला.
‘मी दोघांची, जा आता.’ मधुरी म्हणाली.
आता मंगाचे घर आले.

‘मधुरी, तू माझी आहेस. आधी माझा हक्क. होय ना!’ मंगाने विचारले.
‘होय, पण मी दोघांची छोटी राणी. भांडू नका.’ मधुरी म्हणाली.

मधुरी घरी आली. जेवून ती झोपी गेली. त्या माळा तिच्याजवळ होत्या. ती माळा पहात होती. ती स्वप्नात दोघांना सांगत होती, भांडू नका. मंगा, बुधा, मी तुमची दोघांची चिमुकली नवरी, दोघांची छोटी राणी.

तीन मुले

पांडुरंग सदाशिव साने
Chapters
तीन मुले 1 तीन मुले 2 तीन मुले 3 तीन मुले 4 तीन मुले 5 तीन मुले 6 तीन मुले 7 तीन मुले 8 तीन मुले 9 तीन मुले 10 तीन मुले 11 तीन मुले 12 तीन मुले 13 तीन मुले 14 तीन मुले 15 तीन मुले 16 तीन मुले 17 तीन मुले 18 तीन मुले 19 तीन मुले 20 तीन मुले 21 तीन मुले 22 तीन मुले 23 तीन मुले 24 तीन मुले 25 तीन मुले 26 तीन मुले 27 तीन मुले 28 तीन मुले 29 तीन मुले 30 तीन मुले 31 तीन मुले 32 तीन मुले 33 तीन मुले 34 तीन मुले 35 तीन मुले 36 तीन मुले 37 तीन मुले 38 तीन मुले 39 तीन मुले 40 तीन मुले 41 तीन मुले 42 तीन मुले 43 तीन मुले 44 तीन मुले 45 तीन मुले 46 तीन मुले 47 तीन मुले 48 तीन मुले 49 तीन मुले 50 तीन मुले 51 तीन मुले 52 तीन मुले 53 तीन मुले 54 तीन मुले 55 तीन मुले 56 तीन मुले 57 तीन मुले 58 तीन मुले 59 तीन मुले 60 तीन मुले 61 तीन मुले 62 तीन मुले 63 तीन मुले 64 तीन मुले 65 तीन मुले 66 तीन मुले 67 तीन मुले 68 तीन मुले 69 तीन मुले 70 तीन मुले 71 तीन मुले 72 तीन मुले 73 तीन मुले 74 तीन मुले 75 तीन मुले 76 तीन मुले 77 तीन मुले 78 तीन मुले 79 तीन मुले 80 तीन मुले 81 तीन मुले 82 तीन मुले 83 तीन मुले 84 तीन मुले 85 तीन मुले 86 तीन मुले 87 तीन मुले 88 तीन मुले 89 तीन मुले 90 तीन मुले 91 तीन मुले 92 तीन मुले 93 तीन मुले 94 तीन मुले 95 तीन मुले 96 तीन मुले 97 तीन मुले 98 तीन मुले 99 तीन मुले 100 तीन मुले 101 तीन मुले 102 तीन मुले 103 तीन मुले 104 तीन मुले 105 तीन मुले 106 तीन मुले 107 तीन मुले 108 तीन मुले 109 तीन मुले 110 तीन मुले 111 तीन मुले 112 तीन मुले 113 तीन मुले 114 तीन मुले 115 तीन मुले 116 तीन मुले 117 तीन मुले 118 तीन मुले 119 तीन मुले 120 तीन मुले 121 तीन मुले 122 तीन मुले 123 तीन मुले 124 तीन मुले 125 तीन मुले 126 तीन मुले 127 तीन मुले 128 तीन मुले 129 तीन मुले 130 तीन मुले 131 तीन मुले 132 तीन मुले 133 तीन मुले 134 तीन मुले 135 तीन मुले 136 तीन मुले 137 तीन मुले 138 तीन मुले 139 तीन मुले 140 तीन मुले 141 तीन मुले 142 तीन मुले 143 तीन मुले 144 तीन मुले 145 तीन मुले 146 तीन मुले 147 तीन मुले 148 तीन मुले 149 तीन मुले 150 तीन मुले 151 तीन मुले 152 तीन मुले 153 तीन मुले 154 तीन मुले 155 तीन मुले 156 तीन मुले 157 तीन मुले 158 तीन मुले 159 तीन मुले 160 तीन मुले 161 तीन मुले 162 तीन मुले 163