Get it on Google Play
Download on the App Store

तीन मुले 123

‘तू लहानपणी म्हणत असस की, मी तुमची दोघांची छोटी बायको होईन. ते शब्द तू खरे का करीत नाहीस! तू माझी का होत नाहीस? आपण पतिपत्नी म्हणून राहू. चालेल का? रागावलीस तू? मधुरी, जोपर्यंत मंगा होता, तापर्यंत मी कधीतरी बोललो का? तुमचा हेवादावा केला का? उलट तुमचा संसार सुखाचा व्हावा म्हणून मी प्रार्थना करीत असे. मंगा गेल्यावरही मी त्याच्या गैरहजेरीचा फायदा घेतला नाही. तुझ्याकडे आलो नाही. परंतु मंगा आता जिवंत नाही. व्हायला नको होते ते झाले. आता इलाज काय? आणि म्हणून आता हें मी विचारीत आहे. तुझ्या स्मृतीवर मी दहा वर्षे काढिली. तुझ्या चित्रांना पाहून आनंद मानला. जिवाचे बरे वाईट बुधा नको हो करून घेऊ. असे तू सांगितलेस. म्हणून मी जिवंत राहिलो. मधुरी, माझी तपश्चर्या सफल कर. रागावू नकोस. तुझ्या मनाला दुखवावे असे नाही मला वाटत. परंतु आम्ही दोघे तुझ्या जीवनात शिरलेली आहोत. तूच परवा म्हणालीस की, माझ्या मनाची ओढाताण मला माहीत. मधुरी, कधी कधी जगात चमत्कार होतात. लहानपणाचे तुझे ते साधे बोल ईश्वराला कदाचित् खरे करावयाचे असतील! तुला नाही असे वाटत? तुझ्या मुलांचा मला लळा आहे. ये, मुलांसह माझ्याकडे ये. माझ्या जीवनात प्रकाश आण, आनंद आण; मला माणसांत आण. माझा दिवाणखाना सजव. माझे घर गजबजव. माझे सुकलेले बगीचे पुन्हा फुलव. ये माझ्या घरची झाडलोट कर. अवकळा आहे माझ्या घराला. तेथे कळा आण. रंग आण. रांगोळी आण. संगीत आण. माझे जीवन अव्यवस्थित आहे. तेथे तू ये व व्यवस्था लाव. माझ्या जीवनाची तू धनीण हो. मालकीण हो. माझ्या अंतर्बाह्य जीवनाची तू स्वामिनी हो. मधुरी, दुस-याच्या जीवनात आनंद आणणे, दुस-याची निराशा दडवून आशा देणे याहून थोर काय आहे? आणि मी काही पाप नाही करायला सांगत. मंगा होता तोपर्यंत माझ्या ओठांना कुलूप होते. मी मुका होतो. मी घर सोडून कधी फारसा बाहेर गेलो नाही. माझी खोली, तुझी स्मृती, तुझी मूर्ती, रंग कुंचले यात माझी सारी सृष्टी होती. माझे सागर माझ्या खोलीत भरलेले होते. सारे जग माझ्या खोलीत होते. परंतु आता मंगा नाही म्हणून मी आलो. तुझी दया म्हणून नव्हे, तुझी कीव करावी म्हणून नव्हे; तर माझे स्वत:चे जीवन कृतार्थ व्हावे म्हणून. माझे जीवन जीर्णशीर्ण झाले आहे. फाटले आहे. परंतु तू हस. तुझ्या प्रेमाचे हसरे किरण त्यावर फेक म्हणजे या चिंधीचा भरजरी पीतांबर होईल. मधुरी कर माझी इच्छा पूर्ण. मी तुझा आहे. म्हणून तुजजवळ मागत आहे. तू माझ्या जीवनाचा आधार, तूच विसाव.’

बुधा निराधार तुझाचि आधार
अमृताचा धार तुझे नाव
तुझा म्हणूनिया आलो तुझे दारी
मी तव भिकारी भीक घाली
भीक घाल थोडी थोडी तरी दीना
देई जीवदाना अभागीया।।

‘मधुरी, खरेच हो मी निराधार आहे. तुझ्या नावावर मी जगलो. तुझे नाव म्हणजे अमृत. मधुरी, मधुरी असे मी म्हणावे व मिटक्या माराव्या. मधुरी, मधुरी म्हणावे व मी नाचावे. घाल, प्रेम-भीक घाल. तुझ्या दारात आलो आहे. जीवनदान दे. अभाग्याला भाग्य दे. मधुरी, मी तुझा आहे, तुझा आहे. तू माझी हो. होशील का?’

बुधा मधुरीसमोर केविलवाणा बसला होता. उत्कट आर्तीने उत्कट प्रीतीने तिच्याकडे तो बघत होता. आपण काय बोललो तेही त्याला आठवत नव्हते. तो बोलत होता. हृदय ओतीत होता. तो आता जरा लाजला, संकोचला. पहिला उसळी ओसरली.

तीन मुले

पांडुरंग सदाशिव साने
Chapters
तीन मुले 1 तीन मुले 2 तीन मुले 3 तीन मुले 4 तीन मुले 5 तीन मुले 6 तीन मुले 7 तीन मुले 8 तीन मुले 9 तीन मुले 10 तीन मुले 11 तीन मुले 12 तीन मुले 13 तीन मुले 14 तीन मुले 15 तीन मुले 16 तीन मुले 17 तीन मुले 18 तीन मुले 19 तीन मुले 20 तीन मुले 21 तीन मुले 22 तीन मुले 23 तीन मुले 24 तीन मुले 25 तीन मुले 26 तीन मुले 27 तीन मुले 28 तीन मुले 29 तीन मुले 30 तीन मुले 31 तीन मुले 32 तीन मुले 33 तीन मुले 34 तीन मुले 35 तीन मुले 36 तीन मुले 37 तीन मुले 38 तीन मुले 39 तीन मुले 40 तीन मुले 41 तीन मुले 42 तीन मुले 43 तीन मुले 44 तीन मुले 45 तीन मुले 46 तीन मुले 47 तीन मुले 48 तीन मुले 49 तीन मुले 50 तीन मुले 51 तीन मुले 52 तीन मुले 53 तीन मुले 54 तीन मुले 55 तीन मुले 56 तीन मुले 57 तीन मुले 58 तीन मुले 59 तीन मुले 60 तीन मुले 61 तीन मुले 62 तीन मुले 63 तीन मुले 64 तीन मुले 65 तीन मुले 66 तीन मुले 67 तीन मुले 68 तीन मुले 69 तीन मुले 70 तीन मुले 71 तीन मुले 72 तीन मुले 73 तीन मुले 74 तीन मुले 75 तीन मुले 76 तीन मुले 77 तीन मुले 78 तीन मुले 79 तीन मुले 80 तीन मुले 81 तीन मुले 82 तीन मुले 83 तीन मुले 84 तीन मुले 85 तीन मुले 86 तीन मुले 87 तीन मुले 88 तीन मुले 89 तीन मुले 90 तीन मुले 91 तीन मुले 92 तीन मुले 93 तीन मुले 94 तीन मुले 95 तीन मुले 96 तीन मुले 97 तीन मुले 98 तीन मुले 99 तीन मुले 100 तीन मुले 101 तीन मुले 102 तीन मुले 103 तीन मुले 104 तीन मुले 105 तीन मुले 106 तीन मुले 107 तीन मुले 108 तीन मुले 109 तीन मुले 110 तीन मुले 111 तीन मुले 112 तीन मुले 113 तीन मुले 114 तीन मुले 115 तीन मुले 116 तीन मुले 117 तीन मुले 118 तीन मुले 119 तीन मुले 120 तीन मुले 121 तीन मुले 122 तीन मुले 123 तीन मुले 124 तीन मुले 125 तीन मुले 126 तीन मुले 127 तीन मुले 128 तीन मुले 129 तीन मुले 130 तीन मुले 131 तीन मुले 132 तीन मुले 133 तीन मुले 134 तीन मुले 135 तीन मुले 136 तीन मुले 137 तीन मुले 138 तीन मुले 139 तीन मुले 140 तीन मुले 141 तीन मुले 142 तीन मुले 143 तीन मुले 144 तीन मुले 145 तीन मुले 146 तीन मुले 147 तीन मुले 148 तीन मुले 149 तीन मुले 150 तीन मुले 151 तीन मुले 152 तीन मुले 153 तीन मुले 154 तीन मुले 155 तीन मुले 156 तीन मुले 157 तीन मुले 158 तीन मुले 159 तीन मुले 160 तीन मुले 161 तीन मुले 162 तीन मुले 163