Get it on Google Play
Download on the App Store

तीन मुले 106

‘आई, रडू नकोस आई.’ सोन्या आईला बिलगून म्हणाला.
तिने त्याला पोटाशी धरिले. घट्ट धरिले.
‘सोन्या, गेले तुझे बाबा. जाताना तुला उचलून घेतले होते मंगाने, किती तुझ्यावर माझ्या मंगाचे प्रेम सोन्या.’
‘मधुरी, पुरे आत. घरी चल.’

म्हातारीने त्या पाहुण्यास दुसरीकडे जायला सांगितले. सोन्याला व मधुरीला घेऊन ती तिच्या घरी आली. रुपल्या व मनी घरी होती. मधुरी आली व धाडदिशी पडली.

‘आई, आई’ करीत मुले भोवती रडू लागली.
म्हातारीने मधुरीला शुध्दीवर आणिले, दु:ख घरात भरुन राहिले. अंधार भरून राहिला. शेजारीपाजारी आले. समाधान करून गेले. खरे समाधान कोण करणार? तिन्ही मुलांना जवळ घेऊन मधुरी बसली होती. ती मुले आईकडे बघत.

‘आई, नको रडू.’ सोन्या म्हणे.
‘मी पुसू तुझे डोळे?’ रुपल्या म्हणाला.

मधुरीला अधिकच वाईट वाटे. लहान बाळे त्या मातेला धीर देत होती. करुण करुण दृश्य! म्हातारीने स्वयंपाक केला.
‘मधुरी, ऊठ, खा हो दोन घास. या चिमुकल्यांसाठी तरी खा. ऊठ.’

आणि मधुरी उठली. मुलांना घेऊन तिने थोडे जेवण केले. मधुरी शांत झाली. दोन दिवस झाले. म्हातारी परत गेली.
तिसरा दिवस होता. मुलांना झोपवून मधुरी बसली होती. तिच्या डोळयांतून पाणी गळत होते. दार उघडे होते. तिचे दाराकडे तोंड होते. एकदम ती दु:खाने म्हणाली, मंगा, ‘मंगा, ये ना रे. मधुरीसाठी ये रे ये.’ आणि कोणी तरी हाक मारली म्हणून ती एकदम उठली.

‘आला, मंगा आला.’ असे म्हणून तिने त्याला मिठी मारली. परंतु कोण होते ते?
‘मधुरी!’
‘कोण?’
‘मी बुधा.’

‘आणि माझा मंगा कोठे आहे? तू माझा मंगा खाल्लास. तुझ्या वडिलांनी खाल्ला. त्यांचे भूत समुद्राकडे बोट दाखवी. समुद्रात बुडवीन याला असे का ते भूत तुला सांगे? बुधा, माझा मंगा मला दे. आण जा माझा मंगा. मला वाटले माझा मंगाच आला. गोड मधुर मंगा.’

‘मधुरी, मी तुझ्या समाधानासाठी आलो आहे. मंगा व मी तुझे मित्र. बुधा बुडाला व मंगा आहे असेच समज. मी तुला उणे पडू देणार नाही. मधुरी, माझा काय दोष? मी बातमी ऐकली व रडत बसलो. तुझे दु:ख मनात येऊन मला घास गिळवेना. पहिल्या झटक्यात तुझ्याकडे येणार होतो. परंतु आलो नाही. आज तिस-या दिवशी आलो. मधुरी, मी तुझा कोणीच नाही का? तुला दोन धीराचे शब्द सांगण्याचा माझा अधिकार नाही का? माझ्या प्रेमाला काहीच का अधिकार नाही?’

तीन मुले

पांडुरंग सदाशिव साने
Chapters
तीन मुले 1 तीन मुले 2 तीन मुले 3 तीन मुले 4 तीन मुले 5 तीन मुले 6 तीन मुले 7 तीन मुले 8 तीन मुले 9 तीन मुले 10 तीन मुले 11 तीन मुले 12 तीन मुले 13 तीन मुले 14 तीन मुले 15 तीन मुले 16 तीन मुले 17 तीन मुले 18 तीन मुले 19 तीन मुले 20 तीन मुले 21 तीन मुले 22 तीन मुले 23 तीन मुले 24 तीन मुले 25 तीन मुले 26 तीन मुले 27 तीन मुले 28 तीन मुले 29 तीन मुले 30 तीन मुले 31 तीन मुले 32 तीन मुले 33 तीन मुले 34 तीन मुले 35 तीन मुले 36 तीन मुले 37 तीन मुले 38 तीन मुले 39 तीन मुले 40 तीन मुले 41 तीन मुले 42 तीन मुले 43 तीन मुले 44 तीन मुले 45 तीन मुले 46 तीन मुले 47 तीन मुले 48 तीन मुले 49 तीन मुले 50 तीन मुले 51 तीन मुले 52 तीन मुले 53 तीन मुले 54 तीन मुले 55 तीन मुले 56 तीन मुले 57 तीन मुले 58 तीन मुले 59 तीन मुले 60 तीन मुले 61 तीन मुले 62 तीन मुले 63 तीन मुले 64 तीन मुले 65 तीन मुले 66 तीन मुले 67 तीन मुले 68 तीन मुले 69 तीन मुले 70 तीन मुले 71 तीन मुले 72 तीन मुले 73 तीन मुले 74 तीन मुले 75 तीन मुले 76 तीन मुले 77 तीन मुले 78 तीन मुले 79 तीन मुले 80 तीन मुले 81 तीन मुले 82 तीन मुले 83 तीन मुले 84 तीन मुले 85 तीन मुले 86 तीन मुले 87 तीन मुले 88 तीन मुले 89 तीन मुले 90 तीन मुले 91 तीन मुले 92 तीन मुले 93 तीन मुले 94 तीन मुले 95 तीन मुले 96 तीन मुले 97 तीन मुले 98 तीन मुले 99 तीन मुले 100 तीन मुले 101 तीन मुले 102 तीन मुले 103 तीन मुले 104 तीन मुले 105 तीन मुले 106 तीन मुले 107 तीन मुले 108 तीन मुले 109 तीन मुले 110 तीन मुले 111 तीन मुले 112 तीन मुले 113 तीन मुले 114 तीन मुले 115 तीन मुले 116 तीन मुले 117 तीन मुले 118 तीन मुले 119 तीन मुले 120 तीन मुले 121 तीन मुले 122 तीन मुले 123 तीन मुले 124 तीन मुले 125 तीन मुले 126 तीन मुले 127 तीन मुले 128 तीन मुले 129 तीन मुले 130 तीन मुले 131 तीन मुले 132 तीन मुले 133 तीन मुले 134 तीन मुले 135 तीन मुले 136 तीन मुले 137 तीन मुले 138 तीन मुले 139 तीन मुले 140 तीन मुले 141 तीन मुले 142 तीन मुले 143 तीन मुले 144 तीन मुले 145 तीन मुले 146 तीन मुले 147 तीन मुले 148 तीन मुले 149 तीन मुले 150 तीन मुले 151 तीन मुले 152 तीन मुले 153 तीन मुले 154 तीन मुले 155 तीन मुले 156 तीन मुले 157 तीन मुले 158 तीन मुले 159 तीन मुले 160 तीन मुले 161 तीन मुले 162 तीन मुले 163