कला म्हणजे काय? 118
एखादी राजाराणीची, एखादी काऊचिऊची, एखादी परीची गोष्ट लिहिणे, हृदय हलविणारे एखादे गाणे रचणे, एखादे गोड अंगाई गीत, एखादे रिझवणारे व करमणूक करणारे कोडे, एखादी गंमत, काही निरागस व निर्दोष सहजसुंदर विनोद, अनेक पिडयांपर्यंत लाखो लहानथोरांना आनंदवीत राहील असे एखादे चित्र ही कला - काही श्रीमंतांस क्षणभर आनंद देणारी जी कला - ज्या कलेचा त्या श्रीमंतांस लगेच विसर पडतो अशा कलेपेक्षा किती व्यापक, किती थोर, किती सहृदय आहे, किती महत्त्वाची व फलदायी आहे हे भावी कलावान् ओळखून घेतल्याशिवाय राहणार नाही. वरच्या वर्गाची कला व विश्वजनांची कला या दोन कलांची तुलनाच करता येणार नाही. सर्वांना मिळणा-या ज्या साध्या, सरळ व सहृदय अशा भावना, त्यांचा प्रांत अनंत आहे व त्या प्रांतात अद्याप कोणी शिरलाही नाही. अशा ह्या अपार प्रांताची वरच्या वर्गाच्या टीचभर लांबीरुंदीच्या क्षेत्राशी कशी तुलना करता येणार? कोठे सिंधु व कोठे विड, कोठे पर्वत व कोठे राई.
म्हणून भविष्यकालीन कलेचा विषय क्षुद्र, दरिद्री व तुटपुंजा न राहता तो विपुल व भरपूर असेल, समृध्द व रसमय असेल आणि भविष्यकालीन कलेचे स्वरूपही आजच्या कलेच्या रूपापेक्षा हीन न राहता अनंतपटीने नेष्ठ व सुंदर असेल. हे सौंदर्य, भावी कलेचे तंत्र मोठे आवडंबरयुक्त असेल म्हणून नाही येणार तर कलावानाच्या कला स्वच्छपणे, साधेपणे व संक्षिप्तपणे अंत:करणपूर्वक मांडलेल्या असतील म्हणून ते येईल. हे सौंदर्य पाल्हाळातून, दूर्बोधतेतून, गुंतागुंतीतून निर्माण न होता, संयम, संक्षेप, विशदता व साधेपणा यातून जन्मलेले असेल.
एकदा एका प्रसिध्द ज्योतिष शास्त्रज्ञाजवळ मी बोलत होतो. ''आकाशगंगेतील ता-यांच्या प्रकाशांचे पृथ:करण'' - या विषयावर तो सार्वजनिक व्याख्यानमाला गुंफीत होता. मी त्याला म्हटले, ''तुम्ही विषयप्रतिपादन फारच उत्कृष्ट करता, तुमच्याजवळ ज्ञानही भरपूर आहे; परंतु तुम्ही या आकाशगंगेतील ता-यांच्या प्रकाशावरून त्या ता-यांची घटना कशी असावी, तेथे कोणते दातु जळत असावेत वगैरेवर व्याख्यान देण्याऐवजी, पृथ्वी कशी बनली, तिची गती कशी आहे, दिवसरात्र का होतात, ऋतूंचे बदल, ह्या साध्या साध्या विषयांवरच जर व्याख्याने द्याल तर फार चांगले होईल, कारण तुमच्या श्रोत्यांतील पुष्कळांना-विशेषत: बायकांना-दिवसानंतर रात्र का येते व रात्रीनंतर दिवस का येतो, हिवाळयानंतर उन्हाळा का येतो, उन्हाळयानंतर पावसाळा का येतो, बर्फ का पडते, पाऊस कसा पडतो, इत्यादि साध्या गोष्टीही समजत असतील असे मला वाटत नाही.'' त्या शहाण्या ज्योतिर्विदाने सस्मित उत्तर दिले.'' तुमचे म्हणणे बरोबर आहे. असे व्याख्यान दिले तर चांगले होईल. परंतु साध्या विषयावर बोलणे मला फार जड जाते! ता-यांच्या प्रकाशाचे पृथ:करण या कठीण विषयावर व्याख्यान देणे मला सोपे आहे!''
कलेतही असेच आहे. क्लिओपात्राच्या काळातील विषयावर एखादी सयमक कविता रचणे, रोम शहराला आग लावणा-या नीरीचे चित्र रेखाटणे, ब्रॅहॅम किंवा रिचर्डस्ट्रास यांच्याप्रमाणे एखादे संगीत रचणे, किंवा बॅग्नरप्रमाणे एखादा संगीतयुक्त नाटयप्रवेश लिहिणे-ह्या सर्व गोष्टी, एखादी साधी गोष्ट सांगून सर्वांना तत्र्नमय करणे, एखादे साधे पेत्र्निसलीनेच चित्र रेखाटून पाहणा-यांच्या हृदयाला पाझर फोडणे, किंवा पोट भरभरून ते हंसतील असे करणे, एखादे साधेच गाणे रचून श्रोत्यांच्या मनावर त्याचा कायमचा ठसा उमटवणे-ह्या गोष्टीपेक्षा अधिक सोप्या व सुकर आहेत.
आजचे कलावान् म्हणतात, ''तो पूर्वीचा साधेपणा पुन्हा आज परत मिळणे अशक्य आहे. आजचे जीवनच किती गुंतागुंतीचे आहे. ह्या प्राचीन जीवनात आम्ही पुन्हा कसे जाणार? जोसेफ किंवा ओडेसीससारख्या गोष्टी लिहिणे, व्हीनस ऑफ मिलोप्रमाणे पुतळे तयार करणे, लोकगीतांप्रमाणे संगीत रचणे हे आता आम्हांला अशक्य आहे.''