कला म्हणजे काय? 25
या जगात एकाचे सुख ते दुस-याचे दुःख, एकाचे दुःख तो दुस-याचा आनंद असे दिसून येते. परंतु याची कारणे कोण सांगणार? असे का होते - हे कोणाला सांगता येणार ? एवं आजचे सारे सौंदर्यशास्त्र शास्त्र या संज्ञेस पात्र नाहीं, शास्त्रीय गोष्टीत ज्या बौध्दिक व्यापाराची आपण अपेक्षा करितो, तो बौध्दिक व्यापार सौंदर्यशास्त्रात दिसून येत नाही. कलेचे गुणधर्म काय, कलेचे नियम कोणते, (आणि जर कला सौंदर्यनिर्माग्री असेल तर) सौंदर्याचे स्वरूप काय, त्याचे नियम कोणते - ह्या गोष्टी ह्या शास्त्राने सांगितल्या पाहिजेत, परंतु ते ह्या गोष्टी सांगत नाही. कला व सौंदर्य यांच्या व्याख्या नीट दिलेल्या नाहीत. (जर कला व तिची योग्यता रुचीवर अवलंबून असतील तर) रुचीचे स्वरूपही कोठें निश्चित केलेले असे या शास्त्रात दिसून येत नाही. नीट व्याख्या देऊन, स्वच्छ सांगून, त्या व्याख्येप्रमाणे व त्या नियमाप्रमाणें असणारी जी कृति ती कलात्मक कृति व त्या व्याख्येप्रमाणे व त्या नियमांप्रमाणे नसणारी जी कृति ती कलाहीन कृति असे कलाशास्त्राने निश्चित साधन दिले पाहिजे. परंतु असे साधन कलाशास्त्राजवळ कोठे आहे ? आजचे सौंदर्यशास्त्र काही कृति आधीच त्या कलात्मक आहेत असे गृहीत धरून चालतें, (कारण त्या कृति किंवा त्या वस्तु सुखवितात) आणि नंतर कलेची अशाप्रकारची व्याख्या करितात, कलेचे असे नियम वनवितात की त्या सुख देणा-या सर्व वस्तूंचा ज्या काही विवक्षित वर्गाच्या लोकांनाच सुख देतात - त्यात सहजच अंतर्भाव होईल ! आपणांपैकी काही विशिष्ट लोकांना जे जे आवडतें ते ते सारे कला म्हणून स्वतःसिध्दच स्वयंसिध्दच जणुं मानले गेले ! उदाहरणार्थ, फिडियस, सोफोक्लीस, होमर, टिशन, रॅफेल, बॅक, वीथोव्हेन, डात्र्नटे, शेक्सपिअर, गटे व असेच काही इरत या सर्वांच्या कृतींचा आपण कलेत निःसंकोचपणे व निःशंकपणे अंतर्भाव करितो सौंदर्यशास्त्राने असे नियम बनविले पाहिजेत की वरील सर्वांच्या कृतीचा त्यात समावेश होईल ! सौंदर्यविषयक साहित्यात कलेचे महत्त्व किंवा कलेची योग्यता याविषयी वारंवार मते प्रदर्शित केलेली असतात. परंतु ही मते कोणत्याही नियमानुसार बनविलेली नसतात. ही मते म्हणजे त्यांच्या लहरी, त्यांच्या आवडीनिवडी, त्यांच्या रुचि ! ज्या नियमांवरून अमुक चांगले, अमुक वाईट, असे ठरवितां येईल, असे निर्णायक व मार्गदर्शक नियम त्यांच्याजवळ नसतात. परंतु आपण जो स्वतःसिध्द असा कलानियम मानिला - ज्याममध्ये वरील सर्व कलावानांच्या कृति घेतात - त्या नियमांशी, म्हणजेच त्या वरच्या कलावानांच्या कृतीशी, ज्या कृतीची मेळ असेल, ज्या कृतीचे साधर्म्य व साम्य असेल, ती कृति चांगली; व जिचा मेळ बसत नसेल ती हीन - असे सांगण्यात येत असते.
फॉल्जेल्ड्ट्रने लिहिलेले एक पुस्तक मी नुकतेच वाचीत होतो. ते पुस्तक ब-यापैकी आहे. कलात्मक कृतीत नीति असावी की नसावी याची चर्चा करताना हा ग्रंथकार स्पष्टपणे सांगतो की ''कलेपासून आपण नीतीची मागणी करता कामा नये.'' आणि याला प्रमाण म्हणून कोणता पुरावा तो पुढे मांडतो? तो म्हणतो ''कलेपासून जर नीतीची अपेक्षा आपण घरू तर शेक्सपिअरच्या रोमिओ व जुलिएट या कलाकृतीला किंवा गटेच्या वुइल्हेम मीस्टर या कृतीला कलाप्रांतांत स्थान मिळणार नाही, कलामंदिरांत त्यांचा प्रवेश होणार नाही; आणि असे होणें म्हणजे तर मोठीच आपत्ति. कारण कलेच्या स्वयंसिध्द नियमाप्रमाणे कलाशास्त्राच्या रूढीप्रमाणे या कृतीना आपण कलात्मक कृति असे मानीत आलो आहोत. यासाठी, ही आपत्ति ओढवू नये म्हणून, नीतीची अपेक्षाच कलेपासून घरू नये हे बरे. कलेनें नीतिभावना पोसल्या पाहिजेत असा नियम करता येणार नाही. आपण कलेची अशी व्याख्या बनविली पाहिजे की या सर्व मान्यकृतींचा कलेंत समावेश होईल.'' फॉल्जेल्इट् कलेनें नीति दिली पाहिजे असे जरी म्हणत नसला, तरी कलेनें महत्त्वाचे असे काही तरी दिलेचं पाहिजे असे तो म्हणतो - असे तो ठरवितो.
आज रूढ असलेल्या सौंदर्याशास्त्रातील प्रमाणे ही अशी आधी कळस मग पाया रे या पध्दतीवर उभारलेली आहे. काही विवक्षित वर्गाना काही विवक्षित कृति रुचतात, एवढयावरूनच त्या कृति कला म्हणून मानावयाच्या; आणि नंतर कलेची अशी व्याख्या करावयाची की त्या सर्व कृतीचा त्यांत समावेश व्हावा. ख-या कलेची आधी व्याख्या करावयाची व मग त्या व्याख्येप्रमाणे ही कृति कलात्मक आहे, किंवा ही नाही असे ठरवावयाचे - असा हा योग्य व त्र्नयाय्य मार्ग सोडून वरील प्रकारचा हम करे सो कायदा कलशास्त्रात रूढ झालेला आहे.