कला म्हणजे काय? 108
ह्या वेळी अशाच मताची एक तत्वज्ञानविषयक विचारसरणीही पुढे आली. या अनीतीचे देव्हारे माजविण्याच्या सत्कार्यात तत्वज्ञानही पुढे आले. कला व सौंदर्यमीमांसा आणि ही तत्त्वज्ञानांतील विचारसरणी एकदमच जणू जन्मल्या. अमेरिकेतून (Survival of the Fittest) बळी तो कान पिळी - हे पुस्तक मला मिळाले. त्याचप्रमाणे सामर्थ्याचे तत्त्वज्ञान किंवा बळाची मीमांसा ह रॅग्नर रेडबिअर्ड याचही पुस्तक नुकतेच माझ्या हातात पडले. या पुस्तकाला संपादकांनी लिहिलेल्या प्रस्तावनेत पुस्तकाचा मतितार्थ पुढीलप्रमाणे देण्यात आलेला आहे : ''हिब्रू धर्मोपदेशकांचे तत्त्वज्ञान रडके होते. ते तत्त्वज्ञान खुळे व पुळवट होते. अययार्थ व अवास्तविक असे होते.'' सदैव रडणारे हे जे जगतारक त्यांची विचारसरणी खोटी आहे. त्यांच्या वचनांवरून सत्य धय व न्याय काय हे मानणे म्हणजे मूर्खपणा आहे. तत्त्वज्ञान किंवा धार्मिक उपदेश यांतून न्याय काय ते समजत नसते. न्याय हे सत्तेचे अपत्य आहे, ''जे दुस-याने तुला करू नये असे तुला वाटते, ते तू दुस-याच्या बाबतीत करू नकोस'' अशा प्रकारची तत्त्वे व वचने, ह्या अशा व हे कायदे ह्याच्यांत उपजत स्वयंभू शक्ती आहे का? ही तत्त्वे पंगू आहेत; स्वत: ती टिकाव धरू शकत नाहीत. तत्त्वांना तलवारीची जोड लागते. तरच ती तत्त्वे तग धरतात, नाहीतर त्यांना कोणीही विचारीत नाही. संघटनेचा, दंडाचा, पांसाचा, तत्त्वांना पाठिंबा पाहिजे. अमुक एका आज्ञेप्रमाणे, अमुक एका तत्त्वाप्रमाणे मी न वागेन तर तो पांस समोर आहे असे जेंव्हा मनुष्याला वाटते तेंव्हाच तो तद्नुसार वागतो. सत्तेशिवाय सत्याला अर्थ नाही, सत्तेशिवाय कशालाच अर्थ नाही. जो खरोखर स्वतंत्र आहे त्याला कोरताही मानवी वा अतिमानवी हुकूम पाळण्याची जरूर नाही. आज्ञाधारकपणा, शरणशक्ती ही अध:पाताची लक्षणे आहेत, की गुलामगिरीची लक्षणे आहेत. आज्ञाभंग हे वीरांचे लक्षण आहे, वर चढणा-या शूराचे लक्षण आहे, स्वतंत्र होऊ पाहणा-या मर्दाचे लक्षण आहे. आपल्या शत्रूंनी शोधून काढलेले जे नीतिनियम त्यांनी माणसाने बध्द होता कामा नये. हे सारे जग म्हणजे रणांगण आहे. येथे सदैव झुंज आहे. येथे अनेक पडत आहेत, अनेक चढत आहेत; येथे एकाचे पाय घसरत आहेत, अनेकांचे लटपटत आहेत. येथे कोणावर विश्वास ठेवावा? कोणाला मानू नकोस, कोणापुढे नमू नकोस, या जगात गळे कापणे हेच तर सतत चालले आहे. कसली दया नी कसली माया! जे जीत आहेत, पराभूत आहेत, त्यांना लुटावे, दुबळे करावे, त्यांना तुच्छ मानावे, हीन-दीन करावे, त्यांना रडवावे व ते रडू लागले म्हणजे किहे कोठले असे म्हणून वर आणखी लाथ त्यांना हाणावी यातच पौरूष आहे, यातच खरा न्याय आहे. दुबळयाची पूजा करणे हा कोठला न्याय? वाळलेल्या पानावर झंजावतात का दया करतो? ज्याची जी लायकी तीच त्याला मिळाली पाहिजे. अंतिम व ध्येयभूत न्याय हीच गोष्ट दाखवीत आहे, हीच गोष्ट सांगत आहे, हेच आपणापासून मागत आहे. जो स्वतंत्र आहे, जो शूर आहे, त्याने सर्व जग काबिज करावे, सा-या दुनियेला दीन करावे. झिंज्या धरून त्याने सर्वांना ओढावे व स्वत:चे चरण चुंबावयास लावाव. जगात म्हणून तर सारखी चढाई चालली आहे. जमिनीसाठी, सोन्यासाठी, सत्तेसाठी, साम्राज्यासाठी, प्रेमासाठी, रमणीसाठी सारखे रणकंदन सुरूच आहे; सुरू राहिलेच पाहिजे. जो छातीचा आहे, जो शौर्याचा आहे, त्याची ही सारी वित्तपूर्ण व सौंदर्यपूर्ण वसुंधरा. (अशाच प्रकारचे विचार थोडया वर्षांपूर्वी डी व्होरा याने प्रकट केले होते.)
हा ग्रंथकार स्वत:च्या बुध्दीने व स्वत:च्या विचारसरणीनेच (अनुकरणाने नव्हे) निद्रशेच्या प्रबलाचे तत्त्वज्ञान-पुरूषोत्तमाचे तत्त्वज्ञान याकडे आला आहे; तसेच नवीन कलावान नीतीसंबंधी जे विचार मांडतात, जे सिध्दांत मांडतात, त्याच बाजूला हाही आला आहे.