Get it on Google Play
Download on the App Store

संध्या 138

“दवाखान्यांत ताबडतोब जाणं बरं.” भाईजी म्हणाले.

“आणूं का टांगा ?” विश्वास म्हणाला.

“जरा थांबूं व पाहूं.” संध्या म्हणाली.

ती अंथरुणावर शांतपणें पडली. सामानाच्या बांधाबांधींत दगदग झाली, म्हणून का एकदम पोट दुखूं लागलें ? थोडया वेळानें थांबलें.

“संध्ये, कसं वाटतं ? खरं सांग हो.” कल्याणनें विचारलें.

“बरं वाटतं हो, कल्याण. थांबलं पोट. आतांच नको जायला. आणि आज रात्रीं नका नेऊ सामान. उद्यां न्या. उद्यां मला तुम्ही

इथुनच दवाखान्यांत घेऊन जा. मी बाळाला घेऊन येईन ती मग नव्या घरींच येईन. एकदम नव्या घरांत प्रवेश.”

“संध्ये, उद्यां जायचं दवाखान्यांत, मग आजच गेलेलं काय वाईट ?” भाईजी म्हणाले.

“भाईजी, अगदीं वेळ आली म्हणजे जावं. आधीं नको. तिथं आधींपासून दवाखान्यांत पडून राहायचा मला संकोच वाटतो. कल्याण, आज तूं कुठंहि जाऊं नकोस. तूं माझ्याजवळ बस. दवाखान्यांत गेलं म्हणजे मग तूं थोडाच आहेस जवळ ? नाहीं ना जाणार आज कुठं ? विश्वास त्या घरीं सांगून येईल कीं उद्यां सामान आणूं म्हणून.” संध्या सांगत होती.

“बरं हो संध्ये, आज नाहीं नेत सामान. तसंच बांधलेलं राहील.” कल्याण म्हणाला.

रात्रीचीं जेवणें झाली. गप्पागोष्टी करीत सारीं बसलीं होतीं. भाईजींनीं एक सुंदरशी गोष्ट सांगितली. “हंस रे माझ्या मुला” हें गाणेंहि त्यांनीं म्हटलें.

“कल्याण, बाळाचं नांव काय ठेवायचं ?” संध्येनें एकदम विचारलें.

“काय बरं ठेवावं ?” कल्याणनें प्रश्न केला.

“परंतु नांवाची गर्दी एव्हांपासून कशाला ती !” विश्वास म्हणाला.

“आणि मुलगी होणार कीं मुलगा ?” रंगानें शंका काढली.

“मुलगी झाली तर काय ठेवायचं, मुलगा झाला तर काय ठेवायचं, दोन्ही ठरवून ठेवूं.” कल्याण म्हणाला.

“भाईजी, कोणतं नांव.” संध्येनें विचारलें.

“मुलगी झाली तर विजया ठेवा, मुलगा झाला तर विजय ठेवा. परिस्थितीवर तुम्ही विजय मिळवीत असतां होणारं तें बाळ. म्हणून त्यांतील कोणतं तरी नांव ठेवावं.” भाईजी म्हणाले.

“मला वसंत नांव आवडतं.” विश्वास म्हणाला.

“तें तुझ्या मुलाला पुढं ठेवूं हो !” संध्या हंसून म्हणाली.

“अजून लग्नाला नाहीं पत्ता, तों आमच्या मुलांचीं नांवं कशाला ?” विश्वास खिन्नपणें म्हणाला.

“आज रात्रीं हरणीच्या परीक्षेचा निकाल लागेल.” संध्या म्हणाली.

“विश्वास, उद्यां तूं पेढे दिले पाहिजेस.” कल्याण म्हणाला.

“भाईजी देतील आणून.” विश्वास म्हणाला.

“हरणी पास झाली कीं विश्वास काय करायचं ?” संध्येनें विचारलें.

“काय म्हणजे ?” विश्वास म्हणाला.

“तुमचं दोघांचं लग्न !” संध्या म्हणाली.

संध्या

पांडुरंग सदाशिव साने
Chapters
संध्या 1 संध्या 2 संध्या 3 संध्या 4 संध्या 5 संध्या 6 संध्या 7 संध्या 8 संध्या 9 संध्या 10 संध्या 11 संध्या 12 संध्या 13 संध्या 14 संध्या 15 संध्या 16 संध्या 17 संध्या 18 संध्या 19 संध्या 20 संध्या 21 संध्या 22 संध्या 23 संध्या 24 संध्या 25 संध्या 26 संध्या 27 संध्या 28 संध्या 29 संध्या 30 संध्या 31 संध्या 32 संध्या 33 संध्या 34 संध्या 35 संध्या 36 संध्या 37 संध्या 38 संध्या 39 संध्या 40 संध्या 41 संध्या 42 संध्या 43 संध्या 44 संध्या 45 संध्या 46 संध्या 47 संध्या 48 संध्या 49 संध्या 50 संध्या 51 संध्या 52 संध्या 53 संध्या 54 संध्या 55 संध्या 56 संध्या 57 संध्या 58 संध्या 59 संध्या 60 संध्या 61 संध्या 62 संध्या 63 संध्या 64 संध्या 65 संध्या 66 संध्या 67 संध्या 68 संध्या 69 संध्या 70 संध्या 71 संध्या 72 संध्या 73 संध्या 74 संध्या 75 संध्या 76 संध्या 77 संध्या 78 संध्या 79 संध्या 80 संध्या 81 संध्या 82 संध्या 83 संध्या 84 संध्या 85 संध्या 86 संध्या 87 संध्या 88 संध्या 89 संध्या 90 संध्या 91 संध्या 92 संध्या 93 संध्या 94 संध्या 95 संध्या 96 संध्या 97 संध्या 98 संध्या 99 संध्या 100 संध्या 101 संध्या 102 संध्या 103 संध्या 104 संध्या 105 संध्या 106 संध्या 107 संध्या 108 संध्या 109 संध्या 110 संध्या 111 संध्या 112 संध्या 113 संध्या 114 संध्या 115 संध्या 116 संध्या 117 संध्या 118 संध्या 119 संध्या 120 संध्या 121 संध्या 122 संध्या 123 संध्या 124 संध्या 125 संध्या 126 संध्या 127 संध्या 128 संध्या 129 संध्या 130 संध्या 131 संध्या 132 संध्या 133 संध्या 134 संध्या 135 संध्या 136 संध्या 137 संध्या 138 संध्या 139 संध्या 140 संध्या 141 संध्या 142 संध्या 143 संध्या 144 संध्या 145 संध्या 146 संध्या 147 संध्या 148 संध्या 149 संध्या 150 संध्या 151 संध्या 152 संध्या 153 संध्या 154 संध्या 155 संध्या 156 संध्या 157 संध्या 158 संध्या 159 संध्या 160 संध्या 161 संध्या 162 संध्या 163 संध्या 164 संध्या 165 संध्या 166 संध्या 167 संध्या 168 संध्या 169 संध्या 170 संध्या 171 संध्या 172 संध्या 173 संध्या 174 संध्या 175 संध्या 176 संध्या 177 संध्या 178 संध्या 179 संध्या 180