Get it on Google Play
Download on the App Store

संध्या 109

“खादी गरिबांसाठींच नाहीं का काँग्रेसनं निर्माण केली ?”

“गरिबांचं राज्य व्हावं असं तुम्हांला वाटतं का ? गरिबांची नुसती कींव नका करूं ? श्रमणारे शेतकरी व कामकरी यांची सत्ता स्थापन व्हावी असं काँग्रेसचं म्हणणं आहे का ?”

“मला वाद घालायला वेळ नाहीं. तुम्हांला आजपासून काम मिळणार नाहीं. ज्यांचीं मतं आम्हाला मारक, त्यांना काय म्हणून आम्हीं आधार द्यावा ?”

“एक दिवस ते तुमच्या मताचे होतील या आशेनं द्या.”

“तशी आशा आम्हांला नाहीं.”

“ब्रिटिशांचा हृदयपालट होईल ही आशा तुम्हांला आहे वाटतं ? एका गरीब भगिनीला तिचा नवरा केवळ लाल बावटयाचा आहे म्हणून तुम्ही काम द्यायचं नाकारतां ? तुम्हांला हें न्याय्य वाटतं ?”

“आम्हांला बोलायला वेळ नाहीं. उद्यांपासून कामासाठीं कृपा करून येऊं नका.” असें म्हणून तो व्यवस्थापक दुसरें काम करू लागला.

संध्या निघून गेली. ती निराश झाली. किती हें संकुचित जग असें तिला वाटलें. ती खोलींत गेली. तिनें तें खादीचें पातळ सोडलें. त्याला ती काडी लावणार होती. परंतु तिला धैर्य झालें नाहीं. गरिबांनीं विणलेली ही खादी आहे. खेडयांतील दु:खीकष्टी बायांच्या हातचें तींत सूत असेल. त्यांचे अश्रु त्यांत मिसळलेले असतील. तिनें ती खादी पुन्हां हृदयाशीं धरिली. तिला भाईजी आठवले. भाईजींचें खादीवरील प्रेम तिला आठवलें. तिनें त्या खादीची घडी केली. आपल्या ट्रंकेंत खालीं खोल तिनें ती घडी ठेवून दिली.

सायंकाळीं कल्याणची वाट पाहात ती रस्त्यावर घुटमळत होती. तो पाहा कल्याण आला. परंतु त्याच्याबरोबर दोन दुकानदारांचीं दोन माणसें होतीं. तीं त्याला शिव्या देत होतीं. कल्याण ऐकत होता.

“किती दिवस झाले ! पैशांचा पत्ता नाहीं. आमचं दुकान सोडून दुसरीकडे माल घेतो.”

“आणि आमच्याकडे यानं तोच प्रकार केला.”

“मोठे आले लाल बावटेवाले !”

“मला वाटेल तें बोला. लाल बावटयाला बोलाल, तर एकेकाचं थोबाड रंगवीन !” कल्याण त्यांना संतापून म्हणाला.

“अरे, जा रे थोबाड रंगणा-या !” दोघे ओरडले.

कल्याण संतापानें त्यांच्या अंगावर धांवला. संध्येनें त्याला आवरलें.

“उद्यां तुमचे देऊं हो पैसे. या बांगडया विकू व पैसे देऊं.”

“बायकोला सोन्याच्या बांगडया करतो आणि आमचे पैसे द्यायला मात्र टाळाटाळी !”

“आतां जास्त बोलूं नका. जा !” संध्या कल्याणला धरून म्हणाली. ते दोघे नोकर गेले. संध्या व कल्याण घरीं आलीं.

“कल्याण, या बांगडया उद्यां विकून टाक.”

“तुझी आई मला काय म्हणेल ? तुला एखादा दागिना करून द्यायचा पराक्रम माझ्याजवळ तर नाहींच; उलट तुझ्या आईनं दिलेले दागिने का विकूं ? त्यापेक्षां मरण बरं.”

संध्या

पांडुरंग सदाशिव साने
Chapters
संध्या 1 संध्या 2 संध्या 3 संध्या 4 संध्या 5 संध्या 6 संध्या 7 संध्या 8 संध्या 9 संध्या 10 संध्या 11 संध्या 12 संध्या 13 संध्या 14 संध्या 15 संध्या 16 संध्या 17 संध्या 18 संध्या 19 संध्या 20 संध्या 21 संध्या 22 संध्या 23 संध्या 24 संध्या 25 संध्या 26 संध्या 27 संध्या 28 संध्या 29 संध्या 30 संध्या 31 संध्या 32 संध्या 33 संध्या 34 संध्या 35 संध्या 36 संध्या 37 संध्या 38 संध्या 39 संध्या 40 संध्या 41 संध्या 42 संध्या 43 संध्या 44 संध्या 45 संध्या 46 संध्या 47 संध्या 48 संध्या 49 संध्या 50 संध्या 51 संध्या 52 संध्या 53 संध्या 54 संध्या 55 संध्या 56 संध्या 57 संध्या 58 संध्या 59 संध्या 60 संध्या 61 संध्या 62 संध्या 63 संध्या 64 संध्या 65 संध्या 66 संध्या 67 संध्या 68 संध्या 69 संध्या 70 संध्या 71 संध्या 72 संध्या 73 संध्या 74 संध्या 75 संध्या 76 संध्या 77 संध्या 78 संध्या 79 संध्या 80 संध्या 81 संध्या 82 संध्या 83 संध्या 84 संध्या 85 संध्या 86 संध्या 87 संध्या 88 संध्या 89 संध्या 90 संध्या 91 संध्या 92 संध्या 93 संध्या 94 संध्या 95 संध्या 96 संध्या 97 संध्या 98 संध्या 99 संध्या 100 संध्या 101 संध्या 102 संध्या 103 संध्या 104 संध्या 105 संध्या 106 संध्या 107 संध्या 108 संध्या 109 संध्या 110 संध्या 111 संध्या 112 संध्या 113 संध्या 114 संध्या 115 संध्या 116 संध्या 117 संध्या 118 संध्या 119 संध्या 120 संध्या 121 संध्या 122 संध्या 123 संध्या 124 संध्या 125 संध्या 126 संध्या 127 संध्या 128 संध्या 129 संध्या 130 संध्या 131 संध्या 132 संध्या 133 संध्या 134 संध्या 135 संध्या 136 संध्या 137 संध्या 138 संध्या 139 संध्या 140 संध्या 141 संध्या 142 संध्या 143 संध्या 144 संध्या 145 संध्या 146 संध्या 147 संध्या 148 संध्या 149 संध्या 150 संध्या 151 संध्या 152 संध्या 153 संध्या 154 संध्या 155 संध्या 156 संध्या 157 संध्या 158 संध्या 159 संध्या 160 संध्या 161 संध्या 162 संध्या 163 संध्या 164 संध्या 165 संध्या 166 संध्या 167 संध्या 168 संध्या 169 संध्या 170 संध्या 171 संध्या 172 संध्या 173 संध्या 174 संध्या 175 संध्या 176 संध्या 177 संध्या 178 संध्या 179 संध्या 180