Get it on Google Play
Download on the App Store

संध्या 71

१०

मुंबईस

मुंबईला संपाची वावटळ कधीं उठेल याचा नेम नव्हता. मिलचे मालक वाटेल तेव्हां चावटपणा करीत. किती तरी वर्षांपूर्वीं मंदी म्हणून त्यांनीं पगारकाट केली होती. ती तशीच चालू होती. मंदी संपली होती. तेजी होती; परंतु पगार कमीच. आम्हांला परवडत नाहीं हें मालकांचें तुणतुणें नेहमींचें ठरलेलें. या कारखानदारांचे हिशेब मोठे और असतात. सतराशें फंडांतून रकमा दाखवतील. पुन्हां एजन्ट तेच. एजन्सीचें कमिशन तेच खाणार. तें कमिशन कमी होतां कामा नये. सतरा तोंडांनीं मालक खात असतो व जगाला कारखाना नुकसानींत आहे असें दाखवतो. हातचलाखी हें तर बुध्दीचें लक्षण.

गिरण्यांतील माल उठत नाहीं असें एकीकडे हे मालक म्हणत होते, तर दुसरीकडे रात्रपाळया सुरु होत होत्या ! मालाचा उठाव नसता तर रात्रपाळया सुरू झाल्या असत्या का ? परंतु मालक सामोपचारानें थोडेंच ऐकणार ?

कामगार-युनियनचें रात्रपाळीच्या बाबतींत असें म्हणणें होतें कीं, रात्रपाळीवाल्याला अधिक मजुरी दिली पाहिजे. परंतु मालक तें मान्य करीत नव्हते. कामगार पुढा-यांनीं अर्थशास्त्रावरील पुस्तकांतील उतारे सादर केले. परंतु मालक म्हणाले, “ते उतारे काय करायचे ? रात्रीं काम करणारे का अधिक काम करतात ?”

“रात्रीं काम केल्यानं आयुष्य कमी होतं, असं या पुस्तकांत स्वच्छ आहे. रात्रीं काम करणारा दिवसा झोंप घेतो. परंतु ती झोंप व नीट येत नाही. रात्रीची झोंपच खरी आरोग्यदायी असते. दिवसाचं आठ तास काम व रात्रीचं आठ तास काम यांत फरक आहे. दिवसां काम करण्यांत जो ताण पडतो, यांत त्याच्या दीडपट ताण रात्रीं पडतो.” असें कामगार पुढा-यांनीं पुराव्यानिशीं सिध्द केलें.

परंतु मालकांचा नकार ठेवलेलाच. दुसरेहि अनेक प्रश्न होते. आणि अशा रीतीनें हळूहळू प्रकरण चिघळत चाललें. शेवटीं युनियन संपाचा विचार करूं लागलें. आणि मुख्य संपाची तयारी म्हणून आधीं एकच दिवस सर्वत्र संप करण्याचें निश्चित करण्यांत आलें. त्या एक दिवसाचा संप यशस्वी व्हावा म्हणून सर्वत्र जोरांत प्रचार सुरू झाला. कामगारांचें वर्तमानपत्र “ठिणगी” सर्वत्र तेजाचे झोत सोडूं लागलें. ठिणगीचे हजारों अंक खपूं लागले. कोंप-याकोंप-यावर सायंकाळीं प्रचारसभा होऊं लागल्या. मोटरलॉरीवरून कर्ण्यांतून घोषणा घुमवण्यांत येऊं लागल्या.

अशा परिस्थितींत कल्याण व विश्वास आले. एका मोठया कामगार पुढा-याकडे ते उतरले. तो एक थोर पुढारी होता. दिसायला साधा, परंतु त्याची शक्ति महान होती. त्याचें संघटनाचातुर्य अप्रतिम होतें. कामगार त्याला आपला प्राण मानीत. पूर्वी एका संपांत त्याच्यावर येणारी गोळी एका कामगारानें स्वत:वर घेतली. इतकें कामगाराचें त्या पुढा-यावर प्रेम होतें. अपार कष्ट त्यानें सोसले होते. तुरुंगांत कित्येक वर्षें काढली होतीं. तुरुंगांत खडी फोडून हात रक्तबंबाळ झाले होते. अर्थशास्त्राचा त्यांचा गाढा अभ्यास होता. कल्याण व विश्वास यांना आनंद झाला. त्या घरीं ते एकरूप झाले. ते गेले तेव्हां तो पुढारी आपल्या लहान मुलीला खेळवीत होता. तें दृश्य मोठें विलोभनीय होतें. गिरणी-मालकांना ज्याच्या नांवानें कांपरें भरे, सरकार ज्याला वचके, कामगार ज्याच्या शब्दानें मरायला तयार होत, असा तो उग्र नेता लहान मुलीला खेळवीत होता, तिच्याकडून आपलें केस ओढवून घेत होता. नेपोलियनचें असेंच एक चित्र आहे. युरोपची सिंहासनें मोडणारा व उभारणारा नेपोलियन मांडीवर मुलाला घेऊन बसला आहे असें तें चित्र आहे. वात्सल्य म्हणजे एक अपूर्व चीज आहे. औरंगजेब कोठेंहि नमत नसे. परंतु स्वत:च्या मुलीसमोर नमे. त्याच्या हृदयांतील गोठलेली माणुसकी, गोठलेली कोमलता तेथें प्रकट होई व माणुसकीचा अनुभव त्याला येई.

कल्याण व विश्वास यांना ठिणगी पत्राच्या कचेरींत काम देण्यांत आलें. विश्वासला निरनिराळया वर्तमानपत्रांतील बातम्या थोडक्यांत काढण्याचें काम देण्यांत आलें. तसेंच इतर कांही लेखांचें भाषांतर करण्याचेंहि काम त्याला असे. विश्वास सुंदर लिही. त्याचें लिहिणें तेथील मंडळीला आवडूं लागलें. कल्याण मुद्रितें तपाशी. दोघे मित्र कामांत दंग असत. जणूं तें वर्तमानपत्र त्यांचेंच होतें. त्या दोघांची निष्ठा व कार्यतत्परता पाहून सर्वांना कौतुक वाटे. दिवसभर काम करून सायंकाळीं प्रचार-सभांना ते दोघे पुन्हां जात. अशा रीतीनें वेळ केव्हांच जाई.

संध्या

पांडुरंग सदाशिव साने
Chapters
संध्या 1 संध्या 2 संध्या 3 संध्या 4 संध्या 5 संध्या 6 संध्या 7 संध्या 8 संध्या 9 संध्या 10 संध्या 11 संध्या 12 संध्या 13 संध्या 14 संध्या 15 संध्या 16 संध्या 17 संध्या 18 संध्या 19 संध्या 20 संध्या 21 संध्या 22 संध्या 23 संध्या 24 संध्या 25 संध्या 26 संध्या 27 संध्या 28 संध्या 29 संध्या 30 संध्या 31 संध्या 32 संध्या 33 संध्या 34 संध्या 35 संध्या 36 संध्या 37 संध्या 38 संध्या 39 संध्या 40 संध्या 41 संध्या 42 संध्या 43 संध्या 44 संध्या 45 संध्या 46 संध्या 47 संध्या 48 संध्या 49 संध्या 50 संध्या 51 संध्या 52 संध्या 53 संध्या 54 संध्या 55 संध्या 56 संध्या 57 संध्या 58 संध्या 59 संध्या 60 संध्या 61 संध्या 62 संध्या 63 संध्या 64 संध्या 65 संध्या 66 संध्या 67 संध्या 68 संध्या 69 संध्या 70 संध्या 71 संध्या 72 संध्या 73 संध्या 74 संध्या 75 संध्या 76 संध्या 77 संध्या 78 संध्या 79 संध्या 80 संध्या 81 संध्या 82 संध्या 83 संध्या 84 संध्या 85 संध्या 86 संध्या 87 संध्या 88 संध्या 89 संध्या 90 संध्या 91 संध्या 92 संध्या 93 संध्या 94 संध्या 95 संध्या 96 संध्या 97 संध्या 98 संध्या 99 संध्या 100 संध्या 101 संध्या 102 संध्या 103 संध्या 104 संध्या 105 संध्या 106 संध्या 107 संध्या 108 संध्या 109 संध्या 110 संध्या 111 संध्या 112 संध्या 113 संध्या 114 संध्या 115 संध्या 116 संध्या 117 संध्या 118 संध्या 119 संध्या 120 संध्या 121 संध्या 122 संध्या 123 संध्या 124 संध्या 125 संध्या 126 संध्या 127 संध्या 128 संध्या 129 संध्या 130 संध्या 131 संध्या 132 संध्या 133 संध्या 134 संध्या 135 संध्या 136 संध्या 137 संध्या 138 संध्या 139 संध्या 140 संध्या 141 संध्या 142 संध्या 143 संध्या 144 संध्या 145 संध्या 146 संध्या 147 संध्या 148 संध्या 149 संध्या 150 संध्या 151 संध्या 152 संध्या 153 संध्या 154 संध्या 155 संध्या 156 संध्या 157 संध्या 158 संध्या 159 संध्या 160 संध्या 161 संध्या 162 संध्या 163 संध्या 164 संध्या 165 संध्या 166 संध्या 167 संध्या 168 संध्या 169 संध्या 170 संध्या 171 संध्या 172 संध्या 173 संध्या 174 संध्या 175 संध्या 176 संध्या 177 संध्या 178 संध्या 179 संध्या 180