Get it on Google Play
Download on the App Store

संध्या 76

११

संध्येची चलबिचल

संध्या दु:खी झाली होती. तिच्या डोळयांत नाचणारी आशा कोठें उडून गेली ती परत येईचना. तिचें हास्य कुठें पळून गेलें तें तिला पुन्हां भेटायला येईना. ती खिन्न, अति खिन्न असे. सायंकाळीं संध्येचे सुरम्य रंग दिसतात. परंतु ते रंग जातात व भीषण रात्र पसरते. अंधार पृथ्वीला घेरतो. चंद्रमा असला तर बरें. नाहीं तर ता-यांची ती नुसती चकमक अंधाराला तेजस्वी करूं शकत नाहीं. उलट ते थरथरणारे तारे पाहून अंधारांत जीव अधिकच थरथरू लागतो. संध्येची मन:स्थिति अशीच झाली होती. क्षणभर तिला आशा वाटे, परंतु ती आशाच अधिक उदास करी. भयाण अंधारांत मिणमिण दिवा भीतिदायक वाटतो. संध्येला ध्यानींमनीं कल्याण दिसे. स्त्रिया देतात तेव्हां सर्वस्व देतात. स्त्रिया म्हणजे धो धो वाहात येणा-या सरिता. एकदां एखाद्या गोष्टीकडे त्या निघाल्या, म्हणजे त्यांना अन्य दिसत नाहीं, अन्य सुचत नाहीं. स्त्रियांना सर्वस्वसमर्पणांत पूर्णता वाटते. प्रिय वस्तूशीं सायुज्य मोक्ष त्यांना पाहिजे असतो. लहानसें ध्येयहि त्यांना परिपूर्णतेच्या परमेश्वराचें दर्शन घडवूं शकतें. संध्या प्रेम देत होती. रात्रंदिवस दोन्ही डोळयांतून प्रेमाचें अर्ध्य सोडीत होती. परंतु तिचा प्रेम-देव कोठें होता ? सूर्य दूर असला, दिसत नसला तरी भक्त त्याला अर्ध्य अर्पितोच कीं नाहीं ? संध्येचा सूर्यनारायण तुरुंगांतील भिंतीआड होता. ती त्याला दुरून पूजा पाठवींत होती.

“संध्ये, तूं हा मृगजळाचा नाद सोडून दे” एके दिवशीं आई म्हणाली.

“आई, मला जगवणा-या जीवनाला तूं का मृगजळ म्हणतेस ? हें मृगजळ नाहीं, हें अमृतवर्षण आहे. हा अमृतसिंधु आहे.”

“अग, तो कल्याण सदोदित तुरुंगांत राहणार. एखाद्या दिवशीं बाहेर येईल. परंतु पुन्हां तुरुंग. तुरुंग हेंच त्याचं घर. तुला कुठला आनंद, कुठलं सुख ? माझं ऐक.”

“आई, यांतच माझा आनंद आहे, सर्व सुख आहे. ज्याला मीं मनानं वरलं, तो असा त्यागी तरुण आहे हेच माझं भाग्य. तो केवळ भोगासक्त जीव नाहीं हेंच माझं भाग्य. आई, सावित्रीनं अल्पायुषां होणारा परंतु सद्गुणसागर असा सत्यवान् वरला. खरं ना ? ज्याला मीं मन दिलं, त्याला दिलं. आई, संध्या रडतांना दिसली तरी ती त्यांतहि आनंद मानते हो. मी का मला सुख नाहीं म्हणून रडतें ? कल्याणचे हाल डोळयांसमोर येऊन मी रडतें.”

“बरं बाई. मी तरी काय सांगूं ?” असें म्हणून आई कामाला गेली.

संध्येनें कल्याण फोटो आपल्या उशाशीं ठेवला होता. त्याची ती पूजा करी. रात्रीं सारीं झोंपत. संध्या हळूच उठे. तो फोटो घेऊन ती अंगणांत जाई. सायंकाळीं आणून ठेवलेली फुलें त्याला वाही. ती तो फोटो हृदयार्शी धरी. त्याच्याजवळ बोले, हंसे, रडे. वर आकाशाकडे तोंड करून ती देवाची प्रार्थना करी. माझ्या जीवनाचा राणा सुखरूप परत आण असें ती देवाला विनवी.

कल्याण तुरुंगांत होता. तुरुंग आतां जरा सुधारले होते. निर्जीव यंत्रांत थोडी माणुसकी आली होती. शिवीगाळ, मारहाण जरा प्रमाणांत झाली होती. कैदी जरा आनंदले होते. जुन्या शिस्तींत वाढलेले व सतरा जेलांचें पाणी पिऊन आलेले कैदी म्हणत, “अब तो जेल नहीं । सब ताबुत थंडे हो गये ।”

“काय हो, पुन्हां काँग्रेसची चळवळ कधीं सुरू होईल ? गांधीबाप्पा चळवळ कधीं करील ?” कैदी कल्याणला उत्सुकतेनें विचारीत. मागें ३०-३२ सालीं चळवळ झाली तेव्हां सत्याग्रहींना जागा व्हावी म्हणून सरकारनें इतर कैदी सोडून दिले होते. पुन्हां अशी चळवळ झाली तर आपण सुटूं अशी त्यांना आशा वाटे. म्हणून ते कल्याणला आशेनें विचारीत.

“काँग्रेसची चळवळ सध्यां तर नाहीं. पुढं कदाचित् होईल.” कल्याण सांगे.

“तुम्ही काँग्रेसचेच ना ?”

“मी काँग्रेसचाच. परंतु थोडा पुढं गेलेला. आमचं म्हणणं असं कीं, सत्ता श्रमणा-यांच्या हातीं असावी. शेतक-या-कामगारांचं राज्य व्हावं. श्रमावं यांनीं व सत्ता गादीवाल्यांच्या हातीं, हें आम्हांला पसंत नाहीं.”

“खरं आहे दादा तुमचं म्हणणं.” कैदी म्हणत.

त्या तुरुंगांत कल्याण एकटाच राजकीय कैदी होता.

त्याची प्रकृति खालावली. त्याला रक्ती आमांश सुरू झाला. तो दवाखान्यांत पडून होता. त्याचें वजन घटलें. तो दुबळा झाला. परंतु शांतपणें तो पडून राही. त्यानें घरीं कोणाला कळविलें नाहीं कीं मी आजारी आहें म्हणून. आणि भेटायला तरी इतक्या लांब कोण येणार ?

परंतु एके दिवशीं अकस्मात् भेट आली. कोण आलें होतें भेटावयाला ? विश्वास आला होता. बरेच दिवस विश्वास खानदेशांतील शेतक-यांत हिंडत होता. तिकडे त्याला नवीन मित्र भेटले. त्यांच्याशीं त्यानें नवीन स्नेहाचें नातें जोडलें. विश्वासला आनंद झाला होता. खानदेशी मित्रांतील एकाचें त्याच्यावर प्रेम जडलें. या खानदेशी मित्राचें नाव भाईजी. भाईजी खानदेशांतील शेतक-यांत नवचैतन्य निर्मू पाहात होते. दुष्काळ पडला होता. भाईजी सर्वत्र हिंडत होते. त्यांच्या प्रयत्नांची माहिती कळूनच विश्वास तिकडे गेला होता. भाईजींबरोबर तो सर्वत्र हिंडला. जणूं भाईजींचा तो लहान भाऊ झाला. भाईजींचा निरोप घेऊन विश्वास परत निघाला, तेव्हां त्यांना किती तरी वाईट वाटलें.

संध्या

पांडुरंग सदाशिव साने
Chapters
संध्या 1 संध्या 2 संध्या 3 संध्या 4 संध्या 5 संध्या 6 संध्या 7 संध्या 8 संध्या 9 संध्या 10 संध्या 11 संध्या 12 संध्या 13 संध्या 14 संध्या 15 संध्या 16 संध्या 17 संध्या 18 संध्या 19 संध्या 20 संध्या 21 संध्या 22 संध्या 23 संध्या 24 संध्या 25 संध्या 26 संध्या 27 संध्या 28 संध्या 29 संध्या 30 संध्या 31 संध्या 32 संध्या 33 संध्या 34 संध्या 35 संध्या 36 संध्या 37 संध्या 38 संध्या 39 संध्या 40 संध्या 41 संध्या 42 संध्या 43 संध्या 44 संध्या 45 संध्या 46 संध्या 47 संध्या 48 संध्या 49 संध्या 50 संध्या 51 संध्या 52 संध्या 53 संध्या 54 संध्या 55 संध्या 56 संध्या 57 संध्या 58 संध्या 59 संध्या 60 संध्या 61 संध्या 62 संध्या 63 संध्या 64 संध्या 65 संध्या 66 संध्या 67 संध्या 68 संध्या 69 संध्या 70 संध्या 71 संध्या 72 संध्या 73 संध्या 74 संध्या 75 संध्या 76 संध्या 77 संध्या 78 संध्या 79 संध्या 80 संध्या 81 संध्या 82 संध्या 83 संध्या 84 संध्या 85 संध्या 86 संध्या 87 संध्या 88 संध्या 89 संध्या 90 संध्या 91 संध्या 92 संध्या 93 संध्या 94 संध्या 95 संध्या 96 संध्या 97 संध्या 98 संध्या 99 संध्या 100 संध्या 101 संध्या 102 संध्या 103 संध्या 104 संध्या 105 संध्या 106 संध्या 107 संध्या 108 संध्या 109 संध्या 110 संध्या 111 संध्या 112 संध्या 113 संध्या 114 संध्या 115 संध्या 116 संध्या 117 संध्या 118 संध्या 119 संध्या 120 संध्या 121 संध्या 122 संध्या 123 संध्या 124 संध्या 125 संध्या 126 संध्या 127 संध्या 128 संध्या 129 संध्या 130 संध्या 131 संध्या 132 संध्या 133 संध्या 134 संध्या 135 संध्या 136 संध्या 137 संध्या 138 संध्या 139 संध्या 140 संध्या 141 संध्या 142 संध्या 143 संध्या 144 संध्या 145 संध्या 146 संध्या 147 संध्या 148 संध्या 149 संध्या 150 संध्या 151 संध्या 152 संध्या 153 संध्या 154 संध्या 155 संध्या 156 संध्या 157 संध्या 158 संध्या 159 संध्या 160 संध्या 161 संध्या 162 संध्या 163 संध्या 164 संध्या 165 संध्या 166 संध्या 167 संध्या 168 संध्या 169 संध्या 170 संध्या 171 संध्या 172 संध्या 173 संध्या 174 संध्या 175 संध्या 176 संध्या 177 संध्या 178 संध्या 179 संध्या 180