Get it on Google Play
Download on the App Store

संध्या 53

“कुठं जाऊं ? यांना घेतल्याशिवाय कुठं जाऊं ?” मोठा मुलगा म्हणाला.

“प्रेत मिळणार नाही.”

“द्या हो, द्या. जीवंतपणीं माझा धनी नाहीं दिलांत, मेल्यावर तरी द्या. बाहेर या गांवचे चार जातवाले आहेत. ते येतील. मूठमाती नीट देऊं. नाहीं म्हणूं नका.”

“शिपाई जेलरसाहेबांकडे गेला. जेलरसाहेब म्हणाले, “त्याचा दंड म्हणावं भरा, मग प्रेत मिळेल.”

“शिपाई आला.

“देतात का रे दादा !” तिनें विचारलें.

“याचा दंड होता शंभर रुपये तो भरा. मग प्रेत मिळेल.”

“आतां दंड कुठून भरुं, भाऊ ? आम्हांला विका.”

“जा इथून. प्रेत मिळणार नाहीं.”

“आम्ही गरीब माणसं. कोण देणार शंभर रुपये आम्हांला ? माणसापरी माणूस गेलं. आणि वर पैसे मागतां ?”

मृताची पत्नी रडत रडत उठली व जेलरसाहेबांकडे गेली. तिनं पदर पसरला. ती पायां पडली. परंतु काय उपयोग ?
आई, शेवटीं आमच्यांतील एका प्रमुख राजकीय कैद्याची शहरांत ओळख होती. त्यानं गांवांत चिठी पाठवून शंभर रुपये त्या दंडाचे भरले. त्या गरिबांना तो मृत देह मिळाला.

अशा हो आई जेलमधल्या कथा. अशी निर्दयता. आणखी एक गोष्ट सांगूं ? एक म्हातारा क्रिमिनल होता. तो मुसलमान होता. त्याच्यांत त्राण नव्हतं. त्याच्याजवळ एक जपमाळ होती. मुसलमान तिला तसबी म्हणतात. आम्हां राजकीय कैद्यांत एक तरुण मुलगा होता. एके दिवशीं तो म्हातारा आपले कपडे धूत होता. तो आमच्यांतील मुलगा त्या म्हाता-याजवळ गेला व म्हणाला,

“बुढ्ढेबाबा, मी देतों तुमचे कपडे धुऊन; आणा.”

“तूं देतोस धुऊन ? तुम्ही स्वराज्यवाले. आम्ही क्रिमिनल. नको बाळ, तुझे हात नको लावूं. तुम्ही पुण्यात्मी माणसं.”

“गरिबांची सेवा करूं, तरच स्वराज्यवाले होऊं. बुढ्ढेबाबा, नाहीं म्हणूं नका; आणा ते कपडे.”

“त्या मुलानं ते कपडे धुतले. म्हाता-याला आनंद झाला. पुढं त्या मुलाला म्हातारा जिथं काम करी, तिथंच काम मिळालं. सूत गुंडाळण्याचं काम. तो म्हातारा त्या मुलावर प्रेम करूं लागला. त्याला स्वत:चीं घरचीं मुलं आठवलीं. तो म्हातारा पूर्वी मटन घेत असे. परंतु एके रविवारीं त्यानं गूळच मागितला. रविवारीं मटन किंवा गूळ मिळतो.

“म्हाता-या, मटनाचा कंटाला आला वाटतं ?” कोणी म्हणाला.

“मरेपर्यंत का मटन खाऊं ? पैगंबर साधी रोटी खात.”

“आतां पैगंबर आठवले वाटतं.”

“म्हातारा बोलला नाहीं. परंतु भाकरीचा भुगा करून, त्यांत गूळ मिसळून म्हाता-यानं लाडू केले. एक लाडू दुस-या दिवशीं त्या मुलाला त्यानं नेऊन दिला.

“बुढ्ढेबाबा, मला कशाला ?”

“अरे, घे हो. मी तुला काय देऊं ? तुला पाहिलं कीं माझा मुलगा मला आठवतो. परंतु मी तुरुंगांत आलों. वीस वर्षांची सजा. बाहेर सारीं मेलीं. बाहेर आतां माझं कोणी नाहीं. घे हा लाडू.”

“पुढच्या सोमवारीं त्या मुलानंहि त्या म्हाता-याला लाडू नेऊन दिला. ते दोघे जणूं पितापुत्र बनले. त्या म्हाता-याच्या जीवनांत आनंद आला, ओलावा आला. एके दिवशीं जेलर त्या बुढ्ढयाला बोलला व त्याच्या त्यानं थोबाडींत मारली. तो बुढ्ढा त्या अधिका-याच्या वडिलांप्रमाणं होता. त्या म्हाता-याच्यानं भरभर काम नव्हतं होत. काय करील तो ? शिवाय जीवनांत ना आशा, ना उत्साह. बेटयांत कामाची स्फूर्ति येईल तरी कुठून ? त्या मुलाला तें पाहवलं नाहीं. तो ताडकन् उठला व म्हणाला,
“साहेब, जरा माणुसकी दाखवा. या म्हाता-याच्या का तुम्हीं थोबाडींत मारावी ?” साहेब संतापले. सर्व कैद्यांच्या देखत स्वराज्यवाल्यानं त्यांचा अपमान केला. त्या मुलाला अंधारकोठडी मिळाली. तो म्हातारा रडे. माझ्यासाठीं त्या मुलाला त्रास, असं म्हणे.

संध्या

पांडुरंग सदाशिव साने
Chapters
संध्या 1 संध्या 2 संध्या 3 संध्या 4 संध्या 5 संध्या 6 संध्या 7 संध्या 8 संध्या 9 संध्या 10 संध्या 11 संध्या 12 संध्या 13 संध्या 14 संध्या 15 संध्या 16 संध्या 17 संध्या 18 संध्या 19 संध्या 20 संध्या 21 संध्या 22 संध्या 23 संध्या 24 संध्या 25 संध्या 26 संध्या 27 संध्या 28 संध्या 29 संध्या 30 संध्या 31 संध्या 32 संध्या 33 संध्या 34 संध्या 35 संध्या 36 संध्या 37 संध्या 38 संध्या 39 संध्या 40 संध्या 41 संध्या 42 संध्या 43 संध्या 44 संध्या 45 संध्या 46 संध्या 47 संध्या 48 संध्या 49 संध्या 50 संध्या 51 संध्या 52 संध्या 53 संध्या 54 संध्या 55 संध्या 56 संध्या 57 संध्या 58 संध्या 59 संध्या 60 संध्या 61 संध्या 62 संध्या 63 संध्या 64 संध्या 65 संध्या 66 संध्या 67 संध्या 68 संध्या 69 संध्या 70 संध्या 71 संध्या 72 संध्या 73 संध्या 74 संध्या 75 संध्या 76 संध्या 77 संध्या 78 संध्या 79 संध्या 80 संध्या 81 संध्या 82 संध्या 83 संध्या 84 संध्या 85 संध्या 86 संध्या 87 संध्या 88 संध्या 89 संध्या 90 संध्या 91 संध्या 92 संध्या 93 संध्या 94 संध्या 95 संध्या 96 संध्या 97 संध्या 98 संध्या 99 संध्या 100 संध्या 101 संध्या 102 संध्या 103 संध्या 104 संध्या 105 संध्या 106 संध्या 107 संध्या 108 संध्या 109 संध्या 110 संध्या 111 संध्या 112 संध्या 113 संध्या 114 संध्या 115 संध्या 116 संध्या 117 संध्या 118 संध्या 119 संध्या 120 संध्या 121 संध्या 122 संध्या 123 संध्या 124 संध्या 125 संध्या 126 संध्या 127 संध्या 128 संध्या 129 संध्या 130 संध्या 131 संध्या 132 संध्या 133 संध्या 134 संध्या 135 संध्या 136 संध्या 137 संध्या 138 संध्या 139 संध्या 140 संध्या 141 संध्या 142 संध्या 143 संध्या 144 संध्या 145 संध्या 146 संध्या 147 संध्या 148 संध्या 149 संध्या 150 संध्या 151 संध्या 152 संध्या 153 संध्या 154 संध्या 155 संध्या 156 संध्या 157 संध्या 158 संध्या 159 संध्या 160 संध्या 161 संध्या 162 संध्या 163 संध्या 164 संध्या 165 संध्या 166 संध्या 167 संध्या 168 संध्या 169 संध्या 170 संध्या 171 संध्या 172 संध्या 173 संध्या 174 संध्या 175 संध्या 176 संध्या 177 संध्या 178 संध्या 179 संध्या 180