Get it on Google Play
Download on the App Store

संध्या 75

“कल्याण, तूं लग्न कर.”

“विश्वास, लग्न करून कुठं राहूं ? इथं पाहिलंस ना लोक कसे राहतात ? एकजण कुठं तरी नोकरी करतो व ठिणगींत काम करणा-या दोघां मित्रांना पोसतो. भाई लोक म्हणजे कमालीचा त्याग. कोणी चहाचे चार पेले घेऊनच दिवस मारून नेतात. कोणी विडीच्या धुरावरच मस्त राहतात. तर कोणी एक पानपट्टी चघळून उपासमार विसरतात. आपण कोणावर भार घालायचा, विश्वास ?”

“कल्याण, हजारोंचं होतं तसं तुझं होईल.”

“पाहूं. आतांच काय त्याचं ?”

“मग झोंप आतां.”

पुन्हां दोघे मित्र झोंपीं गेले. परंतु दुस-या दिवशीं आणखी धरपकड झाली, आणि तीत कल्याणहि पकडला गेला. तें भाषण त्याला भोंवलें. कामगारांत असंतोष पसरला. प्रचंड सभा होऊन “पगारवाढ न मिळाली तर अमक्या तारखेला संप पुकारूं” असा निर्णय घोषविण्यांत आला. संपसमिति स्थापली गेली. परंतु कामगारांना १२ ॥ टक्के पगारवाढ देण्याचें जाहीर झालें. संपूर्ण नाहीं, तर निदान निम्मी मागणी मिळाली. कामगारांचा जय झाला. ऐक्याची शक्ति त्यांच्या अनुभवाला आली. परंतु पुढारी अद्याप तुरुंगांतच होते. त्यांच्यावर खटले भरण्यांत आले. अनेकांना शिक्षा झाल्या कल्याणलाहि एक वर्षाची सक्तमजुरी मिळाली.

विश्वास मुंबई सोडून गेला. तो नगर जिल्ह्यांत एका कार्यकर्त्याबरोबर शेतक-यांत हिंडूंफिरूं लागला. मधून मधून तो पुण्यालाहि येई. विद्यार्थ्यांच्या संघटनेंतहि काम करी. परंतु कल्याणची त्याला आठवण येई. अभ्यास, प्रचार, संघटना तो करीत होता. परंतु त्या सर्व कार्यांत कल्याण नसल्यामुळें त्याला राम वाटेना.

आणि संध्या ? ती का रडत बसली असेल ? किती दिवस ती आशेवर अशी राहणार ? कल्याणनें तुरुंगांतून तिला पत्र लिहिलें असेल का ? विश्वासच्या मनांत संध्येला जाऊन भेटावें असें आलें. परंतु पैसे कोठून आणावयाचे ? त्यानें वा-याबरोबर तिला सहानुभूति पाठविली.

कल्याणनें तुरुंगांतून घरीं पहिलें पत्र लिहिलें. त्यानें तें रंगाला लिहिलें.

“प्रिय रंगास सप्रेम आशीर्वाद.

मी तुरुंगांत आहें. वर्ष लौकरच जाईल. आला दिवस जातो. हां हां म्हणतां दिवस जातील. रंगा, मी स्वत:ला लहान समजत होतों. परंतु २२। २३ वर्षांचा झालों. किती पटकन् मोठा झालों. रंगा, तुम्ही सारीं धीरानें राहा. बाबा नीट वागत असतील अशी आशा आहे. आईला म्हणावें काळजी नको करूं. मी येथें आनंदांत आहें. आणि संध्येकडे जा. तिला हें पत्र दाखव. पुढील पत्र तिला पाठवीन. तिला सांग कीं आशा सोडू नको:

मला तुमची सर्वांची आठवण येते. तूं पुण्याला येऊं म्हणत होतास. आतां सुटल्यावर पुढील बेत करूं. परंतु पुढें काय काय वाढलेलें आहे तें कोणाला ठाऊक ? येथें फारसा त्रास नाहीं. पूर्वीचे दिवस नाहींत. कामाचा तितकासा ससेमिरा नसतो. पुस्तकें वाचायला व वही लिहायला मिळाली आहे. मी कविता करीत बसतों. क्रांतीचीं गीतें. तुरुंगांत शरीर अडकते, परंतु मन अधिकच मुक्त होतें. तुरुंगांत प्रतिभेला नवपल्लव फुटतात. एका इंग्रज कवीनें म्हटले आहे कीं, “अत्यंत गोड गाणीं अत्यंत करुण व दु:खमय असतात.” मी म्हणतों कीं, “अत्यंत दु:खद असा जो तुरुंगवास तो थोर विचारांना व भावनांना जन्म देतो.” इंग्रजी भाषेंतील अमर पुस्तक “यात्रेकरूची यात्रा” तुरुंगांतच लिहिलें गेलें. थॉमस पेनचें “मानवी हक्क” तुरुंगांतच लिहिले गेलें. आणि लोकमान्याचें कर्तव्यस्फूर्ति देणारें “गीतारहस्य” तुरुंगांतच जन्मलें. मी असा महापुरुष नाहीं. परंतु माझीहि प्रतिभा-चिमणी भुरभुर उडत असते. संध्येला म्हणावें कल्याण पुन्हां कवि झाला आहे. अश्रु व हास्यें काव्यांत गुंफीत आहे. कामगारांचे अश्रुबिंदु व रक्तबिंदु शब्दांत गुंफीत आहे. आशानिराशांना पंख देत आहे. किसान-कामगारांचा तो कवि होत आहे. हें ऐकून संध्या हंसेल व आनंदेल. सर्वांना सप्रेम प्रणाम. गांवांतील मित्रांसहि.

तुझा,

कल्याण”

संध्या

पांडुरंग सदाशिव साने
Chapters
संध्या 1 संध्या 2 संध्या 3 संध्या 4 संध्या 5 संध्या 6 संध्या 7 संध्या 8 संध्या 9 संध्या 10 संध्या 11 संध्या 12 संध्या 13 संध्या 14 संध्या 15 संध्या 16 संध्या 17 संध्या 18 संध्या 19 संध्या 20 संध्या 21 संध्या 22 संध्या 23 संध्या 24 संध्या 25 संध्या 26 संध्या 27 संध्या 28 संध्या 29 संध्या 30 संध्या 31 संध्या 32 संध्या 33 संध्या 34 संध्या 35 संध्या 36 संध्या 37 संध्या 38 संध्या 39 संध्या 40 संध्या 41 संध्या 42 संध्या 43 संध्या 44 संध्या 45 संध्या 46 संध्या 47 संध्या 48 संध्या 49 संध्या 50 संध्या 51 संध्या 52 संध्या 53 संध्या 54 संध्या 55 संध्या 56 संध्या 57 संध्या 58 संध्या 59 संध्या 60 संध्या 61 संध्या 62 संध्या 63 संध्या 64 संध्या 65 संध्या 66 संध्या 67 संध्या 68 संध्या 69 संध्या 70 संध्या 71 संध्या 72 संध्या 73 संध्या 74 संध्या 75 संध्या 76 संध्या 77 संध्या 78 संध्या 79 संध्या 80 संध्या 81 संध्या 82 संध्या 83 संध्या 84 संध्या 85 संध्या 86 संध्या 87 संध्या 88 संध्या 89 संध्या 90 संध्या 91 संध्या 92 संध्या 93 संध्या 94 संध्या 95 संध्या 96 संध्या 97 संध्या 98 संध्या 99 संध्या 100 संध्या 101 संध्या 102 संध्या 103 संध्या 104 संध्या 105 संध्या 106 संध्या 107 संध्या 108 संध्या 109 संध्या 110 संध्या 111 संध्या 112 संध्या 113 संध्या 114 संध्या 115 संध्या 116 संध्या 117 संध्या 118 संध्या 119 संध्या 120 संध्या 121 संध्या 122 संध्या 123 संध्या 124 संध्या 125 संध्या 126 संध्या 127 संध्या 128 संध्या 129 संध्या 130 संध्या 131 संध्या 132 संध्या 133 संध्या 134 संध्या 135 संध्या 136 संध्या 137 संध्या 138 संध्या 139 संध्या 140 संध्या 141 संध्या 142 संध्या 143 संध्या 144 संध्या 145 संध्या 146 संध्या 147 संध्या 148 संध्या 149 संध्या 150 संध्या 151 संध्या 152 संध्या 153 संध्या 154 संध्या 155 संध्या 156 संध्या 157 संध्या 158 संध्या 159 संध्या 160 संध्या 161 संध्या 162 संध्या 163 संध्या 164 संध्या 165 संध्या 166 संध्या 167 संध्या 168 संध्या 169 संध्या 170 संध्या 171 संध्या 172 संध्या 173 संध्या 174 संध्या 175 संध्या 176 संध्या 177 संध्या 178 संध्या 179 संध्या 180