Get it on Google Play
Download on the App Store

संध्या 78

“कल्याण, ते भाईजी मला इकडेच राहा असं सांगत होते. किती त्यांचा आग्रह. मीं तुझीहि सारी हकीगत त्यांना सांगितली. आपले कल्हईचे प्रयोग सांगितले. त्यांना वाईट वाटलं. ते म्हणाले, “असे उपाशी नका राहात जाऊं. मला कळवीत जा. माझीं मतं तुमच्याशीं एकरूप नसलीं, तरी आपण मित्र होऊं या. मी जणूं तुमचा वडील भाऊ.” कल्याण, ते प्रेमळ आहेत. परंतु दु:खी आहेत. त्यांना एकटं एकटं वाटतं. ते श्रमजीवींची अधिक उत्कटतेनं बाजू घेतात व आपणांसारख्यांना बहिष्कृत मानीत नाहींत, म्हणून संकुचित गांधीवादी जे आहेत व जे ठिकठिकाणीं आज सूत्रधार आहेत त्यांचा त्यांच्यावर रोष. आणि ते अहिंसा मानतात, देवाला हांक मारून रडतात, म्हणून भाईलोकहि त्यांना हंसतात. ते मला म्हणाले, “मी एकटा आहें. माझा दिवा घेऊन मी जात आहें. थोडाफार जीवनाचा उपयोग झाला तर पुष्कळ झालं.” कल्याण, तूं सुटलास म्हणजे आपण त्यांना बोलावूं.”

“विश्वास, मी आजारी आहें हें संध्येला कळवूं नकोस. उगीच ती चिंता करीत बसेल. मी बरा आहें असंच तिला कळव. समजलं ना ?”

“कल्याण, मी का खोटं लिहूं ?”

“मोठया सत्याचा पुजारी कीं नाहीं तूं ! “

“बरं, तें पाहीन मी. कल्याण, आपण सत्याचे पुजारी नसलों तरी असत्याचेहि नाहीं. सत्याची मर्यादा आपणहि पाळतों. सत्य पाळणं हाच आपलाहि कायदा; असत्य हा अपवाद.”

इतक्यांत वेळ संपत आल्याची सूचना मिळाली.

“विश्वास, मला काय आणलं आहेस !”

“प्रेम. दुसरं काय आणूं, कल्याण ? भाईजींसारख्या नवीन मित्रांच्या प्रेमाची जोड. तूं बरा हो. क्रान्तीसाठीं, संध्येसाठीं, आम्हां सर्वांसाठी प्रकृति सांभाळ.”

“माझी काळजी करूं नको.”

दोघे मित्र हातांत हात घेऊन क्षणभर उभे राहिले. विश्वास गेला. कल्याण पुन्हां दवाखान्यांतील खाटेवर पडला. डोळे मिटून पडला. त्याच्या डोळयांसमोर शतचित्रें येत होतीं. “हे भाईजी कोण ? आपण बाहेर असतों तर त्यांना पाहिलं असतं. आणि विश्वास संध्येला माझ्या आजारीपणाविषयीं कळवील कीं काय ? तिला कळलं तर ती येईल. ती आली तर तिला माझी प्रकृति पाहून वाईट वाटेल. मला लौकर बरं झालं पाहिजे. परंतु तें का माझ्या हातीं आहे ?” अशा विचारांत तो होता.

आणि विश्वासनें खरेंच संध्येला पत्र लिहिलें. काय लिहिलें ?

“प्रिय संध्याताई,

तुम्ही आतां मला ओळखीत असाल. मी कल्याणला भेटायेला गेलों होतों. तो जरा आजारी होता. आतां त्याची प्रकृति सुधारत आहे. काळजी करू नये. तुम्ही आनंदांत राहा. कल्याणनं तुम्हांला आनंदी राहावयास, हंसाखेळावयास सांगितलें आहे.

विश्वास”

संध्येला तें पत्र मिळालें. कल्याण आजारी होता. कितपत आजारी होता ? विश्वास खरें कशाला लिहील ? मी काळजी करूं नये म्हणून मोघम त्यानें लिहिलें असेल. विश्वास भेटून आला आणि मी ? मी जाऊं का भेटायला ? आई देईल का पैसे, देईल का परवानगी ? मी भेटायला गेलें तर कल्याणला बरें वाटेल कीं वाईट ? तो मला विसरूं पाहात असेल का ? कीं माझें स्मरण करीत असेल ? काय करावें ?

तिन्ही सांजा झाल्या. आई बाहेर गेली होती. संध्येनें केरवारा केला व घागरकळशी घेऊन ती विहिरीवर गेली. परंतु घागर विहिरींत सोडून तेथें एका दगडावर ती बसली. समोर एक पक्षी नाचत होता. टुणटुण उडया मारीत होता. तिला त्या पक्ष्याचा आनंद पाहवला नाहीं. तिनें त्याला दगड मारला. तो उडून गेला. तिला त्या वेळेस कोणी जवळ नको होतें. मनुष्य नको. पशुपक्षी नको. कोणी नको. आणि समोर आकाशांत संध्या फुलली. तिनें डोळे मिटून घेतले. कशाला ही संध्या रोज मला लाजवते ? तिला रोज पतिदर्शन आहे. दिवसभर कर्तव्यसेवा करून दुनियेसाठीं जळून सायंकाळीं थकला भागलेला सूर्यनारायण पश्चिम संध्येजवळ येतो; परंतु या संध्येला तिचा सूर्यनारायण भेटत नाही. फुकट माझा जन्म. संध्या डोळे मिटून बसली. ती एक गाणें म्हणूं लागली. कानडी गाणें काय होतें त्या गाण्यांत ? संध्येनें डोळे उघडले. पुन्हा मिटले.

संध्या

पांडुरंग सदाशिव साने
Chapters
संध्या 1 संध्या 2 संध्या 3 संध्या 4 संध्या 5 संध्या 6 संध्या 7 संध्या 8 संध्या 9 संध्या 10 संध्या 11 संध्या 12 संध्या 13 संध्या 14 संध्या 15 संध्या 16 संध्या 17 संध्या 18 संध्या 19 संध्या 20 संध्या 21 संध्या 22 संध्या 23 संध्या 24 संध्या 25 संध्या 26 संध्या 27 संध्या 28 संध्या 29 संध्या 30 संध्या 31 संध्या 32 संध्या 33 संध्या 34 संध्या 35 संध्या 36 संध्या 37 संध्या 38 संध्या 39 संध्या 40 संध्या 41 संध्या 42 संध्या 43 संध्या 44 संध्या 45 संध्या 46 संध्या 47 संध्या 48 संध्या 49 संध्या 50 संध्या 51 संध्या 52 संध्या 53 संध्या 54 संध्या 55 संध्या 56 संध्या 57 संध्या 58 संध्या 59 संध्या 60 संध्या 61 संध्या 62 संध्या 63 संध्या 64 संध्या 65 संध्या 66 संध्या 67 संध्या 68 संध्या 69 संध्या 70 संध्या 71 संध्या 72 संध्या 73 संध्या 74 संध्या 75 संध्या 76 संध्या 77 संध्या 78 संध्या 79 संध्या 80 संध्या 81 संध्या 82 संध्या 83 संध्या 84 संध्या 85 संध्या 86 संध्या 87 संध्या 88 संध्या 89 संध्या 90 संध्या 91 संध्या 92 संध्या 93 संध्या 94 संध्या 95 संध्या 96 संध्या 97 संध्या 98 संध्या 99 संध्या 100 संध्या 101 संध्या 102 संध्या 103 संध्या 104 संध्या 105 संध्या 106 संध्या 107 संध्या 108 संध्या 109 संध्या 110 संध्या 111 संध्या 112 संध्या 113 संध्या 114 संध्या 115 संध्या 116 संध्या 117 संध्या 118 संध्या 119 संध्या 120 संध्या 121 संध्या 122 संध्या 123 संध्या 124 संध्या 125 संध्या 126 संध्या 127 संध्या 128 संध्या 129 संध्या 130 संध्या 131 संध्या 132 संध्या 133 संध्या 134 संध्या 135 संध्या 136 संध्या 137 संध्या 138 संध्या 139 संध्या 140 संध्या 141 संध्या 142 संध्या 143 संध्या 144 संध्या 145 संध्या 146 संध्या 147 संध्या 148 संध्या 149 संध्या 150 संध्या 151 संध्या 152 संध्या 153 संध्या 154 संध्या 155 संध्या 156 संध्या 157 संध्या 158 संध्या 159 संध्या 160 संध्या 161 संध्या 162 संध्या 163 संध्या 164 संध्या 165 संध्या 166 संध्या 167 संध्या 168 संध्या 169 संध्या 170 संध्या 171 संध्या 172 संध्या 173 संध्या 174 संध्या 175 संध्या 176 संध्या 177 संध्या 178 संध्या 179 संध्या 180