Get it on Google Play
Download on the App Store

संध्या 122

“भाईजी, कपडे काढा ना.” संध्या म्हणाली.

भाईजींनीं कपडे वगैरे काढले. शौचमुखमार्चन त्यांनीं केलें. संध्येनें कपभर दूध दिलें.

“दूध कशाला मला ?” ते म्हणाले.

“घ्या हो. हल्लीं विश्वासला दूध येतं.”

“कोण पाठवतं ?”

“त्याच्या घरीं डेअरी आहे.”

“परंतु दूध कोण पाठवणार ?”

“भाईजी, माझी आई सावत्र असली, तरी सख्ख्या आईहून माझ्यावर तिची माया आहे. ती पाठवते दूध. त्या दिवशीं वडिलांच्या नकळत मला आंबेहि तिनं पाठवले. गोड गोड आंबे. मी एक आंबा एक तासभर खात होतों. आईचं प्रेम पाहून मी उचंबळलों होतों.”

“तुझ्या कोमल भावना तूं मारून ना टाकल्या आहेस ?”

“आजारीपणांत त्यांना पुन्हां पल्लव फुटले आहेत.”

विश्वासला खालीं शौचाला जायचें होतें. तो उठला तों एकदम झोंक गेला.

“विश्वास, थांब; मी तुला घरून नेतों.” भाईजी म्हणाले.

“मी जाईन हळूहळू. मला नाहीं धरलेलं आवडत.” तो म्हणाला.

“इथं आवडनावड कसली आहे, विश्वास ? तूं अगदीं हट्टी आहेस;   थांब.” भाईजी म्हणाले.

परंतु विश्वास निश्चयी स्वरांत नको म्हणाला. तो एकटाच गेला. भाईजी खिन्न होऊन तेथें बसले. थोडया वेळानें ते संध्येला म्हणाले:

“संध्ये, कल्याण, बाळ वगैरे सारे कुठं गेले आहेत ?”

“ते त्या कामासाठीं गेले आहेत. तुम्हींहि त्यांना पैसे दिलेत. होय ना ? भाईजी, पुढं काय काय होईल ?”
“संध्ये, तूं कल्याणला जाऊं कसं दिलंस ? त्याला धरून कां ठेवलं नाहींस ? तुझ्या अश्रूंनीं त्याला खेंचून ठेवलं असतं. तुझे अश्रूहि का दुबळे ठरले ?”

“भाईजी, मीं शांतपणें निरोप दिला. माझ्या मोहांत का मी त्यांना अडकवूं ? त्यांच्या ध्येयाकडे त्यांना जाऊं दे. घरीं त्यांचा रोज कोंडमारा होतो. जवळ पैसे नाहींत. क्रान्तीचं काम वाढत नाहीं. कुठून आणायचे पैसे ? माझ्या अश्रूंचीं माणिकमोतीं झालीं असतीं, तर कल्याण जाता ना. परंतु अश्रु ते अश्रु. गरीब बिचारे अश्रु. ते कल्याणलां कसे रोखूं शकणार ? जाऊं दे कल्याणला. भाईजी, तुम्ही वाईट नका वाटून घेऊं. जें जें होईल तें तें मीं सारं समाधानानं सहन केलं पाहिजे. मीं वाईट वाटून घ्यायचं सोडून दिलं आहे. मग तुम्ही कां वाईट वाटून घेतां ? तुम्ही आतां इथंच राहा. पोटांत बाळ वाढत आहे. मला कधीं भीति वाटते. कसं होईल असं वाटतं. आशानिराशांचा खेळ सुरू आहे. तुम्ही इथं राहा. तुम्ही जाऊं नका. माझं बाळ पाहून मगच तुम्ही जा. तुमच्या हातांनीं त्याला पाळण्यांत घाला. तुम्हीच त्याचं नांव ठेवा. हें काय भाईजी, तुम्ही कांहींच कां बरं बोलत नाहीं ? तुम्हीहि संध्येवर रागावलेत ?”

“संध्ये, तूं आपण होऊन कल्याणला जायला परवानगी दिलीस ?”

“होय भाईजी; मीं खरंच परवानगी दिली. संध्येशीं लग्न लागण्यापूर्वीच कल्याणचं क्रान्तीशीं लग्न लागलेलं आहे. मी कल्याणची आवडती असलें, तरी पट्टराणीचा मान माझा नसून क्रान्तिदेवाचा आहे.”

संध्या

पांडुरंग सदाशिव साने
Chapters
संध्या 1 संध्या 2 संध्या 3 संध्या 4 संध्या 5 संध्या 6 संध्या 7 संध्या 8 संध्या 9 संध्या 10 संध्या 11 संध्या 12 संध्या 13 संध्या 14 संध्या 15 संध्या 16 संध्या 17 संध्या 18 संध्या 19 संध्या 20 संध्या 21 संध्या 22 संध्या 23 संध्या 24 संध्या 25 संध्या 26 संध्या 27 संध्या 28 संध्या 29 संध्या 30 संध्या 31 संध्या 32 संध्या 33 संध्या 34 संध्या 35 संध्या 36 संध्या 37 संध्या 38 संध्या 39 संध्या 40 संध्या 41 संध्या 42 संध्या 43 संध्या 44 संध्या 45 संध्या 46 संध्या 47 संध्या 48 संध्या 49 संध्या 50 संध्या 51 संध्या 52 संध्या 53 संध्या 54 संध्या 55 संध्या 56 संध्या 57 संध्या 58 संध्या 59 संध्या 60 संध्या 61 संध्या 62 संध्या 63 संध्या 64 संध्या 65 संध्या 66 संध्या 67 संध्या 68 संध्या 69 संध्या 70 संध्या 71 संध्या 72 संध्या 73 संध्या 74 संध्या 75 संध्या 76 संध्या 77 संध्या 78 संध्या 79 संध्या 80 संध्या 81 संध्या 82 संध्या 83 संध्या 84 संध्या 85 संध्या 86 संध्या 87 संध्या 88 संध्या 89 संध्या 90 संध्या 91 संध्या 92 संध्या 93 संध्या 94 संध्या 95 संध्या 96 संध्या 97 संध्या 98 संध्या 99 संध्या 100 संध्या 101 संध्या 102 संध्या 103 संध्या 104 संध्या 105 संध्या 106 संध्या 107 संध्या 108 संध्या 109 संध्या 110 संध्या 111 संध्या 112 संध्या 113 संध्या 114 संध्या 115 संध्या 116 संध्या 117 संध्या 118 संध्या 119 संध्या 120 संध्या 121 संध्या 122 संध्या 123 संध्या 124 संध्या 125 संध्या 126 संध्या 127 संध्या 128 संध्या 129 संध्या 130 संध्या 131 संध्या 132 संध्या 133 संध्या 134 संध्या 135 संध्या 136 संध्या 137 संध्या 138 संध्या 139 संध्या 140 संध्या 141 संध्या 142 संध्या 143 संध्या 144 संध्या 145 संध्या 146 संध्या 147 संध्या 148 संध्या 149 संध्या 150 संध्या 151 संध्या 152 संध्या 153 संध्या 154 संध्या 155 संध्या 156 संध्या 157 संध्या 158 संध्या 159 संध्या 160 संध्या 161 संध्या 162 संध्या 163 संध्या 164 संध्या 165 संध्या 166 संध्या 167 संध्या 168 संध्या 169 संध्या 170 संध्या 171 संध्या 172 संध्या 173 संध्या 174 संध्या 175 संध्या 176 संध्या 177 संध्या 178 संध्या 179 संध्या 180