Get it on Google Play
Download on the App Store

संध्या 108

“तसं मिळतं तर पडतास ना, घेरी येती ना. कल्याण, जें असेल तें दोघं खाऊं. दोघांत अंतर नको. तुझ्या-माझ्यांत अंतर पडणार असेल, तर हें जीवन मला असह्य होईल. मी इतर सारं सहन करीन, परंतु तू कधीं अंतर देऊ नकोस हो, कल्याण.”

“बरं. ये आतां जेवायला माझ्याबरोबर. जें केलं आहेस, तें दोघं मिळून खाऊं.”

एके दिवशीं संध्येच्या मामांकडून पन्नास रुपये आले. भेट म्हणून आले. संध्येनें शिवणकामाचें एक हातमशीन असेंच आडगि-हाइकी घेतलें. तिनें थोडें थोडें काम सुरु केलें. एके दिवशीं संध्या एका खादीभांडारांत गेली. तिनें तेथें शिवायला कांहीं काम देत जाल का म्हणून विचारलें.

“तुमची कोणाची ओळख आहे का ? “

“ओळख कोणाची ? मी कांही फसवणार नाहीं. असुभव घेऊन पाहा. कांहीं काम द्या. उद्यां घेऊन येईन.”

तिला कांहीं काम देण्यांत आलें. संध्येनें तें कल्याणला दाखविलें नाहीं. तिनें तें पुरें करून खादी भांडारांत नेऊन दिलें. सुंदर काम. तिला मजुरी मिळाली. संध्येला परमानंद झाला. चाळींतील बायकांचेंहि कांहीं काम ती करी.

“संध्ये, तूं फार नको हो श्रमत जाऊं ! “

“नाहीं हो कल्याण. अरे, हें बसल्या बसल्या काम.”

परंतु एके दिवशीं निराळाच प्रसंग उभा राहिला. नेहमींप्रमाणें संध्या खादीभांडारांत काम मागायला गेली. परंतु आज तेथें कांहीं वांधा निघाला.

“तुम्ही खादीधारी आहांत का ?”

“नाही; मिलचीं पातळ मी नेसतें.”

“तर मग तुम्हांला काम मिळणार नाहीं.

“असं नका हो करूं.”

“परंतु नियम झाला आहे, त्याला मी काय करूं ?”

“मी खादीचं पातळ नेसूं, तर खाऊं काय ?”

“तें तुम्ही पाहा.”

“बरं, मी विचार करीन.”

संध्या त्या दिवशीं काम घेऊन गेली. तिनें गुजराती पध्दतीचें खादीचें पातळ नेसण्याचें ठरविलें. म्हणजे फार जड झालें नसतें. खादीभांडारांत जाण्यापुरतें नेसावें म्हणजे बरेच दिवस पुरेल असें तिनें ठरविलें. एके दिवशीं तिनें एक तसें लहान पातळ खरेदी केलें. भांडारांत जातांना तें ती नेसे. एके दिवशी भांडाराचे चालक म्हणाले.

“तुम्ही पातळ तर एकच नेलं. इथं येण्यापुरतं नेसतां वाटतं ?”

“थोडे पैसे शिल्लक उरूं देत. मग दुसरं घेईन हो.”

त्या दिवशीं तेवढयावरच निभावलें. परंतु शेवटीं एके दिवशीं हाहि आशेचा धागा तुटला. संध्येचा हाहि आधार नाहींसा झाला.

“तुमचे यजमान का लाल बावटयांत काम करतात ?”

“हो.”

“ते काँग्रेसचे नाहींत ?”

“काँग्रेस गरिबांसाठीं मरेल, तर ते काँग्रेसचे होतील.”

संध्या

पांडुरंग सदाशिव साने
Chapters
संध्या 1 संध्या 2 संध्या 3 संध्या 4 संध्या 5 संध्या 6 संध्या 7 संध्या 8 संध्या 9 संध्या 10 संध्या 11 संध्या 12 संध्या 13 संध्या 14 संध्या 15 संध्या 16 संध्या 17 संध्या 18 संध्या 19 संध्या 20 संध्या 21 संध्या 22 संध्या 23 संध्या 24 संध्या 25 संध्या 26 संध्या 27 संध्या 28 संध्या 29 संध्या 30 संध्या 31 संध्या 32 संध्या 33 संध्या 34 संध्या 35 संध्या 36 संध्या 37 संध्या 38 संध्या 39 संध्या 40 संध्या 41 संध्या 42 संध्या 43 संध्या 44 संध्या 45 संध्या 46 संध्या 47 संध्या 48 संध्या 49 संध्या 50 संध्या 51 संध्या 52 संध्या 53 संध्या 54 संध्या 55 संध्या 56 संध्या 57 संध्या 58 संध्या 59 संध्या 60 संध्या 61 संध्या 62 संध्या 63 संध्या 64 संध्या 65 संध्या 66 संध्या 67 संध्या 68 संध्या 69 संध्या 70 संध्या 71 संध्या 72 संध्या 73 संध्या 74 संध्या 75 संध्या 76 संध्या 77 संध्या 78 संध्या 79 संध्या 80 संध्या 81 संध्या 82 संध्या 83 संध्या 84 संध्या 85 संध्या 86 संध्या 87 संध्या 88 संध्या 89 संध्या 90 संध्या 91 संध्या 92 संध्या 93 संध्या 94 संध्या 95 संध्या 96 संध्या 97 संध्या 98 संध्या 99 संध्या 100 संध्या 101 संध्या 102 संध्या 103 संध्या 104 संध्या 105 संध्या 106 संध्या 107 संध्या 108 संध्या 109 संध्या 110 संध्या 111 संध्या 112 संध्या 113 संध्या 114 संध्या 115 संध्या 116 संध्या 117 संध्या 118 संध्या 119 संध्या 120 संध्या 121 संध्या 122 संध्या 123 संध्या 124 संध्या 125 संध्या 126 संध्या 127 संध्या 128 संध्या 129 संध्या 130 संध्या 131 संध्या 132 संध्या 133 संध्या 134 संध्या 135 संध्या 136 संध्या 137 संध्या 138 संध्या 139 संध्या 140 संध्या 141 संध्या 142 संध्या 143 संध्या 144 संध्या 145 संध्या 146 संध्या 147 संध्या 148 संध्या 149 संध्या 150 संध्या 151 संध्या 152 संध्या 153 संध्या 154 संध्या 155 संध्या 156 संध्या 157 संध्या 158 संध्या 159 संध्या 160 संध्या 161 संध्या 162 संध्या 163 संध्या 164 संध्या 165 संध्या 166 संध्या 167 संध्या 168 संध्या 169 संध्या 170 संध्या 171 संध्या 172 संध्या 173 संध्या 174 संध्या 175 संध्या 176 संध्या 177 संध्या 178 संध्या 179 संध्या 180