Get it on Google Play
Download on the App Store

श्याम 137

राम वर्गात रेशीमकाठी धोतर नेसून येऊ लागला. मी त्याच्या त्या धोतराकडे मत्सराने बघत असे. राम बुध्दिमान आहे. कलावान आहे आणि श्रीमंतही आहे. असा हा सर्वसंपन्न राम माझ्यासारख्या करंटयास कोठून मिळणार, असे माझ्या मनात येऊन मी अपार दु:खी होत असे.

या सुमारास माझी मोठी बहीण माहेरी आलेली होती. मी एका शनिवार-रविवारी घरी गेलो होतो. अक्काजवळ एक रेशीमकाठी धोतर होते. ते धोतर जुने होते, मलिन होते. परंतु ते धोतर आपण घेऊन जावे, असे मला वाटले. मी एके दिवशी अक्कास म्हटले, 'अक्का ! मी एक वस्तू तुझ्याजवळ मागणार आहे. देशील का तू ?' अक्का म्हणाली, 'मला देता येण्यासारखी असेल तर देईन. न द्यायला रे काय झाले श्याम !' मी म्हटले, 'तुझ्याजवळ एक रेशीमकाठी धोतर आहे. ते मला देशील ?' अक्का म्हणाली, 'श्याम, ते धोतर मळलेले आहे. ते काही फार दिवस टिकणार नाही. तुला कशाला पाहिजे ? अंथरुणावर का घालावयाला हवे आहे ? अंथरुणावर घालण्यासाठी माझी चादरच ने ना ?' मी म्हटले, 'अक्का तुझे ते मळके धोतरच मला पाहिजे आहे. देतेस का तुझ्या श्यामला ? अक्का म्हणाली, 'घे हो.' मी पुन्हा म्हटले, 'अक्का ! हे आईला सांगू नकोस हो. कोणाजवळही बोलू नकोस.'

ते एक रेशमकाठी धोतर घेऊन मी दापोलीस आत्याकडे आलो. रिटे घालून ते धोतर चुबकून धुतले. घाव घालून नाही. फाटावयाचे एखादे ! धोतर शुभ्र स्वच्छ झाले. ते धोतर नेसून मी शाळेत गेलो. राम रेशीमकाठी धोतर नेसतो, मग श्यामने नको का नेसावयला ? मीही तुझ्याप्रमाणे रेशीमकाठी धोतर नेसलो आहे. तुझा मित्र होण्यास मी लायक आहे. तुझ्याप्रमाणे मी वागत आहे. तुझे अनुकरण मी करीत आहे, असे जणू मुकेपणाने मी रामला कळवीत होतो. माझ्या त्या रेशीमकाठी धोतराच्या मागे मनातील किती भावनांचा इतिहास होता, हे कोणाला माहीत ? बुध्दिमान रामच्या डोक्यात ते आले नसेल. वेडा, मी खरोखरच वेडा होतो. राम का माझ्या रेशीमकाठी धोतरावर भुलणार होता ? अशा बाह्य भपक्यावर का भुलणारा राम होता ? मग तो पै किंमतीचा राम झाला म्हणावयाचे ! मी माझ्या रामची अशा गोष्टींनी अवहेलनाच करीत होतो. दोन उसनी पिसे लावून डोंबकावळा का मोर होईल ? त्याप्रमाणे रेशीमकाठी धोतर रामप्रमाणे नेसल्याने का रामची योग्यता मला येणार होती ? खराब मी बावळा होतो. शाळेतून सायंकाळी घरी आल्यावर ते धोतर मी धुऊन ठेवीत असे व पुन्हा दुस-या दिवशी तेच नेसत असे.

रामला चित्रकला येई म्हणून मीही चित्रकलेचा अभ्यास करु लागलो. एक परीक्षा मी दिली. मी उत्तीर्ण झालो; परंतु पुढील परीक्षेस मी बसलो नाही. राम शेवटच्या परीक्षेस बसला. श्याम रडत मागे राहिला. आपणास यश येणार नाही, असेच मला वाटे. गरुड भरारी मारतो; म्हणून का चिमणीने आकाशाचा अंत पाहावयाची हाव धरावी ? बेडकी कितीही फुगली तरी बैलाची सर तिला कशी येणार ?

आपल्या मित्राप्रमाणे अंतर्बाह्य आपण व्हावे असे मला वाटे. रामप्रमाणे दिसावे, रामप्रमाणे हसावे, रामप्रमाणे बसावे, उठावे, रामप्रमाणे नेसावे, रामला आवडते ते स्वत:लाही आले पाहिजे असे मला वाटे. म्हणजे राम आपल्यावर प्रेम करील, आपल्यापासून दूर जाणार नाही, आपणास तुच्छ लेखीत असेल तर तुच्छ लेखणार नाही, असे मला वाटे. रामप्रमाणे होण्याचा मी प्रयत्न करीत होतो; परंतु यश कसे येणार ?

श्याम

पांडुरंग सदाशिव साने
Chapters
श्याम 1 श्याम 2 श्याम 3 श्याम 4 श्याम 5 श्याम 6 श्याम 7 श्याम 8 श्याम 9 श्याम 10 श्याम 11 श्याम 12 श्याम 13 श्याम 14 श्याम 15 श्याम 16 श्याम 17 श्याम 18 श्याम 19 श्याम 20 श्याम 21 श्याम 22 श्याम 23 श्याम 24 श्याम 25 श्याम 26 श्याम 27 श्याम 28 श्याम 29 श्याम 30 श्याम 31 श्याम 32 श्याम 33 श्याम 34 श्याम 35 श्याम 36 श्याम 38 श्याम 39 श्याम 40 श्याम 41 श्याम 42 श्याम 43 श्याम 44 श्याम 45 श्याम 46 श्याम 47 श्याम 48 श्याम 49 श्याम 50 श्याम 51 श्याम 52 श्याम 53 श्याम 54 श्याम 55 श्याम 56 श्याम 57 श्याम 58 श्याम 59 श्याम 60 श्याम 61 श्याम 62 श्याम 63 श्याम 64 श्याम 65 श्याम 66 श्याम 67 श्याम 68 श्याम 69 श्याम 70 श्याम 71 श्याम 72 श्याम 73 श्याम 74 श्याम 75 श्याम 76 श्याम 77 श्याम 78 श्याम 79 श्याम 80 श्याम 81 श्याम 82 श्याम 83 श्याम 84 श्याम 85 श्याम 86 श्याम 87 श्याम 88 श्याम 89 श्याम 90 श्याम 91 श्याम 92 श्याम 93 श्याम 94 श्याम 95 श्याम 96 श्याम 97 श्याम 98 श्याम 99 श्याम 100 श्याम 101 श्याम 102 श्याम 103 श्याम 104 श्याम 105 श्याम 106 श्याम 107 श्याम 108 श्याम 109 श्याम 110 श्याम 111 श्याम 112 श्याम 113 श्याम 114 श्याम 115 श्याम 116 श्याम 117 श्याम 118 श्याम 119 श्याम 120 श्याम 121 श्याम 122 श्याम 123 श्याम 124 श्याम 125 श्याम 126 श्याम 127 श्याम 128 श्याम 129 श्याम 130 श्याम 131 श्याम 132 श्याम 133 श्याम 134 श्याम 135 श्याम 136 श्याम 137 श्याम 138 श्याम 139 श्याम 140 श्याम 141 श्याम 142 श्याम 143 श्याम 144 श्याम 145 श्याम 146 श्याम 147 श्याम 148