Get it on Google Play
Download on the App Store

श्याम 97

सलूनचा मालक थोडया वेळाने सलूनमध्ये आला. तो टेबलावर काही तरी शोधीत होता. हजामतीसाठी ज्यांना ज्यांना बोलावावयाचे त्यांची यादी तो शोधीत होता. हजामाने विचारले, 'काय पहाता ?' मालक म्हणाला, 'येथील यादी.' हजाम म्हणाला, 'मी घेतली नाही.' मालकाने विचारले, 'येथे कोणी आले होते का ?' हजाम म्हणाला, 'हो, एक गृहस्थ आला होता. लिहावयाला तो कोरा कागद मागत होता. येथे नाही, असे मी त्याला सांगितले.' मालक म्हणाला, 'त्यानेच चिठ्ठी नेली असावी. असेल कवी कोणी. या कवींना कोठे लिहावयाचे याची काही अक्कल नसते. स्वत:ही येथे हजामत केली नाही आणि माझी यादी नेऊन गि-हाइकी बुडविली.'

ह्यूगोने त्या चिठ्ठीवर लिहिलेली ती कविता अजरामर झाली आहे. ती कविता लिहीपर्यंत त्याला चैन पडले नाही. ती कविता हृदयातून बाहेर पडल्यावर त्याला अपार आनंद झाला. त्या आनंदाने नाचत तो सलूनमधून बाहेर पडला. सलूनमध्ये आपण आहोत, तेथे कशासाठी आलो वगैरे सर्व काही त्याच्या डोक्यातून गेले. एका प्रेमळ भावनेने बाकी सर्व क्षुद्र विचारांची हकालपट्टी केली.

इंग्रजी तिसरीतून मी चौथ्या इयत्तेत गेलो. चौथ्या इयत्तेत सुंदर सुंदर इंग्रजी कविता वर्गात वाचण्यात आल्या. सुंदर कविता व त्या शिकवणारे कविहृदयाचे केशवराव. सारा वर्ग डोलत राही. वर्डस्वर्थ, मिसेस् हीमन्स वगैरे थोर कवि-कवियित्रींच्या सरल मधुर कविता वर्गात घेण्यात आल्या. कॅसाबिआन्का या शूर फ्रेंच मुलावरची ती करुण कविता शिकवीत असताना आम्ही वर्गात रडलो. 'बाबा ! माझ्या जागेवरुन मी आता तरी जाऊ का ? सांगा ना बाबा. बोलाना हो !' असे मराठी भाषांतर केशवरावांच्या करुण मधुर कंठातून ऐकले की हृदय सद्गदीत होई. 'त्या पाहा ज्वाळा आल्या. मुलाचे अंग चाटून गेल्या. त्या पहा, पुन्हा वेगाने ज्वाळा आल्या.' एकेक वाक्य हृदयाला भेदून जाई. तशीच ती वर्डस्वर्थची 'आम्ही आहो सात,' ही भावमनोहर कविता, एके दिवशी केशवरावांनी आम्हाला विचारले, 'वाचलेल्या कवीपैकी तुम्हाला कोणता कवी मोठा वाटतो ?' बहुतेकांनी 'मिसेस् हीमन्स' हे नाव सांगितले. तेव्हा केशवराव म्हणाले, 'मिसेस हीमन्सच्या काव्याचे विषय चांगले आहेत म्हणून ती तुम्हाला थोर वाटते; परंतु वर्डस्वर्थ हा वाचलेल्या कवींत मोठा आहे. त्याचे स्थान उंच आहे. मुलांच्या मनोभावना त्यानेच दाखवाव्या. साध्या विषयातही कसे अभिनव सौंदर्य असते ते पाहण्याची दृष्टी वर्डस्वर्थच देऊ शकतो. त्याची ल्सूसी कविता पाहा, साधे श्लोक; परंतु हृदयाचा ठाव घेतात. वर्डस्वर्थजवळ कृत्रिमता नाही. आदळआपट नाही. झिमझिम पाऊस पडावा व तो पृथ्वीत मुरावा त्याचप्रमाणे वर्डस्वर्थचे शब्द बाहेर पडतात व सरळ हृदयात शिरतात.'

एकदा केशवराव आम्हास पाठ करावयास दिलेल्या इंग्रजी कविता म्हणवून घेत होते. भराभर यंत्राप्रमाणे मुले कविता म्हणत होती. केशवराव म्हणाले, 'अरे अर्थाप्रमाणे जरा स्वर बदलीत जा ना. काव्याचा अपमान नका करु. सारे चरण एकाच आवाजात एकाच वेगाने तुम्ही म्हणता. कोठे शब्द पटकन उच्चारावे लागतील तर कोठे धीरगंभीर त-हेने जरा जड आवाजात म्हणावे लागतील.

श्याम

पांडुरंग सदाशिव साने
Chapters
श्याम 1 श्याम 2 श्याम 3 श्याम 4 श्याम 5 श्याम 6 श्याम 7 श्याम 8 श्याम 9 श्याम 10 श्याम 11 श्याम 12 श्याम 13 श्याम 14 श्याम 15 श्याम 16 श्याम 17 श्याम 18 श्याम 19 श्याम 20 श्याम 21 श्याम 22 श्याम 23 श्याम 24 श्याम 25 श्याम 26 श्याम 27 श्याम 28 श्याम 29 श्याम 30 श्याम 31 श्याम 32 श्याम 33 श्याम 34 श्याम 35 श्याम 36 श्याम 38 श्याम 39 श्याम 40 श्याम 41 श्याम 42 श्याम 43 श्याम 44 श्याम 45 श्याम 46 श्याम 47 श्याम 48 श्याम 49 श्याम 50 श्याम 51 श्याम 52 श्याम 53 श्याम 54 श्याम 55 श्याम 56 श्याम 57 श्याम 58 श्याम 59 श्याम 60 श्याम 61 श्याम 62 श्याम 63 श्याम 64 श्याम 65 श्याम 66 श्याम 67 श्याम 68 श्याम 69 श्याम 70 श्याम 71 श्याम 72 श्याम 73 श्याम 74 श्याम 75 श्याम 76 श्याम 77 श्याम 78 श्याम 79 श्याम 80 श्याम 81 श्याम 82 श्याम 83 श्याम 84 श्याम 85 श्याम 86 श्याम 87 श्याम 88 श्याम 89 श्याम 90 श्याम 91 श्याम 92 श्याम 93 श्याम 94 श्याम 95 श्याम 96 श्याम 97 श्याम 98 श्याम 99 श्याम 100 श्याम 101 श्याम 102 श्याम 103 श्याम 104 श्याम 105 श्याम 106 श्याम 107 श्याम 108 श्याम 109 श्याम 110 श्याम 111 श्याम 112 श्याम 113 श्याम 114 श्याम 115 श्याम 116 श्याम 117 श्याम 118 श्याम 119 श्याम 120 श्याम 121 श्याम 122 श्याम 123 श्याम 124 श्याम 125 श्याम 126 श्याम 127 श्याम 128 श्याम 129 श्याम 130 श्याम 131 श्याम 132 श्याम 133 श्याम 134 श्याम 135 श्याम 136 श्याम 137 श्याम 138 श्याम 139 श्याम 140 श्याम 141 श्याम 142 श्याम 143 श्याम 144 श्याम 145 श्याम 146 श्याम 147 श्याम 148