Get it on Google Play
Download on the App Store

श्याम 31

परीक्षक :- मग मनुष्याचा खरा दागिना कोणता ?

मी :- चांगले वागणे.

परीक्षक
:- बरोबर ! हात दुस-याच्या उपयोगी पडण्याने शोभतो. कान चांगल्या गोष्टी ऐकल्याने शोभतो. तुझ्या या भिकबाळीने कान काही शोभणार नाही. हात कडीतोडयाने शोभणार नाहीत. कडीतोडे म्हणजे एक प्रकारची बेडीच ती.

हेडमास्तर :- बेडी म्हणजे काय श्याम ?

मी :- चोराच्या हातात शिपाई घालतात ती.

परीक्षक :- मग अशा बेडया घालणे तुला आवडते का ?

मी
:- नाही.

परीक्षक :- तर मग ह्या बेडया काढून टाक. खरोखरच जर तुला आवडत नसतील तरच काढ. अशी प्रश्नोत्तरे झाली. आम्हाला  सुट्टी देण्यात आली. उरलेली परीक्षा दुस-या दिवशी होणार होती.

मुले माझी थट्टा करीत होती, 'श्याम बायको रे बायको !' असे मला हिणवीत होती. मी रडवेला झालो व घरी आलो. मी आईला म्हटले, 'आई ! मी आता जातो बाळशेटकडे व कडीतोडे काढून टाकतो. ही भिकबाळीही काढून टाकतो. मला का ग घातलेस दागिने ?'

आई म्हणाली, 'तुलाच तर हवे होते. भिकबाळीसाठी तूच नव्हता का श्याम हट्ट धरलास ? जा. नको असतील तर काढून घे.'

मी बाळशेटाकडे गेलो. ते घरात नव्हते. त्यांचा मुलगा सीताराम घरी होता. त्याने मला विचारले, 'श्याम काय पाहिजे ?'

मी म्हटले, 'माझे कडीतोडे काढा. ही भिकबाळीही काढा.' त्याने काढून दिली. मी घरी आलो. मला खरोखरच आनंद झाला. माझे हात अगदी हलके वाटू लागले. मित्रांनो, दागिने घालणे म्हणजे केवळ रानटीपणा आहे, हे आज मला पूर्णपणे समजत आहे. एकाला घरात खावयास नाही तर दुसरा सोन्या-मोत्यांनी नटत आहे, हे मला तरी पहावत नाही. ज्या राष्ट्राला स्वातंत्र्य नाही त्या राष्ट्रातील दासांनी अलंकारांनी नटावे, यासारखी लाजिरवाणी दुसरी कोणती गोष्ट आहे ? कुत्र्याच्या कानात भिकबाळी घातली तरी कुत्री ती कुत्रीच ! त्यांना सिंहाचा मान थोडाच मिळणार आहे !

स्वातंत्र्यासाठी सर्व दागदागिने अर्पण केले पाहिजेत. देशातील दारिद्रय दूर करावयास ते दिले पाहिजेत. न्यायमूर्ती रानडे गळयातील ताईत लहानपणी सद-याच्या आत लपवून ठेवीत. ते म्हणत, 'गरीब विद्यार्थ्याने पाहिले तर त्याला नाही का वाईट वाटणार ?'

जे सर्वांना मिळेल तेच घ्यावे. जे सर्वांना उपभोगता येईल तेच उपभोगावे. म्हणजे द्वेष, मत्सर समाजात फार वाढणार नाहीत. गोपाळकृष्णाचे चरित्र पहा. गोपाळकृष्ण नंद राजाचा मुलगा होता; परंतु गोपाळकृष्णाने हिरेमाणके अंगावर घातली नाहीत. गोपाळकृष्णाचा एकच दागिना होता. तो म्हणजे मोराची पिसे आणि वनमाळा. कृष्ण सोन्यामोत्यांनी नटू शकला असता; परंतु गरीब पेंद्याला कोणी दिली असती हिरेमाणके ? कृष्ण ख-या समानतेचा भोक्ता होता. रानातील देवाघरची फुले सर्वांना मिळू शकतील. कृष्ण व त्याचे सोबती वनातील वन-फुलांनी सजत आणि रानात मोराची गळून पडलेली पिसे गोळा करुन त्यांचे मुकुट, कृष्ण व त्यांचे सवंगडी डोक्यांवर घालीत. सर्वांच्या शिदो-या एका ठिकाणी करुन सारे जण खात. वाजवावयास बांबूची बासरी, साधी व सुलभ. ती सर्वांना मिळे. असा हा ऐक्याचा, प्रेमाचा, समानतेचा आनंद कृष्णाने निर्माण केला. म्हणून तर म्हणतात,

श्याम

पांडुरंग सदाशिव साने
Chapters
श्याम 1 श्याम 2 श्याम 3 श्याम 4 श्याम 5 श्याम 6 श्याम 7 श्याम 8 श्याम 9 श्याम 10 श्याम 11 श्याम 12 श्याम 13 श्याम 14 श्याम 15 श्याम 16 श्याम 17 श्याम 18 श्याम 19 श्याम 20 श्याम 21 श्याम 22 श्याम 23 श्याम 24 श्याम 25 श्याम 26 श्याम 27 श्याम 28 श्याम 29 श्याम 30 श्याम 31 श्याम 32 श्याम 33 श्याम 34 श्याम 35 श्याम 36 श्याम 38 श्याम 39 श्याम 40 श्याम 41 श्याम 42 श्याम 43 श्याम 44 श्याम 45 श्याम 46 श्याम 47 श्याम 48 श्याम 49 श्याम 50 श्याम 51 श्याम 52 श्याम 53 श्याम 54 श्याम 55 श्याम 56 श्याम 57 श्याम 58 श्याम 59 श्याम 60 श्याम 61 श्याम 62 श्याम 63 श्याम 64 श्याम 65 श्याम 66 श्याम 67 श्याम 68 श्याम 69 श्याम 70 श्याम 71 श्याम 72 श्याम 73 श्याम 74 श्याम 75 श्याम 76 श्याम 77 श्याम 78 श्याम 79 श्याम 80 श्याम 81 श्याम 82 श्याम 83 श्याम 84 श्याम 85 श्याम 86 श्याम 87 श्याम 88 श्याम 89 श्याम 90 श्याम 91 श्याम 92 श्याम 93 श्याम 94 श्याम 95 श्याम 96 श्याम 97 श्याम 98 श्याम 99 श्याम 100 श्याम 101 श्याम 102 श्याम 103 श्याम 104 श्याम 105 श्याम 106 श्याम 107 श्याम 108 श्याम 109 श्याम 110 श्याम 111 श्याम 112 श्याम 113 श्याम 114 श्याम 115 श्याम 116 श्याम 117 श्याम 118 श्याम 119 श्याम 120 श्याम 121 श्याम 122 श्याम 123 श्याम 124 श्याम 125 श्याम 126 श्याम 127 श्याम 128 श्याम 129 श्याम 130 श्याम 131 श्याम 132 श्याम 133 श्याम 134 श्याम 135 श्याम 136 श्याम 137 श्याम 138 श्याम 139 श्याम 140 श्याम 141 श्याम 142 श्याम 143 श्याम 144 श्याम 145 श्याम 146 श्याम 147 श्याम 148