Get it on Google Play
Download on the App Store

मित्रांची जोडी 11

“अरे वेड्या, खाऊ व दागिने का सारखेच? खाऊची गोष्ट निराळी दागिन्यांची निराळी. हे दागिने तुझेच आहेत. की कंठी का आणा दोन आण्यांची आहे? अडीचशें रुपयांची आहे. असे दागिने का कोणी कोणाला देतात?

“आई, मित्रासाठीं प्राणहि देतात.”

“अरे तें गोष्टींतून असतें.”

“गोष्टी का खोट्या असतात? आणि माझे दागिने गुणाच्या अंगावर असले म्हणून काय बिघडलें? त्याच्या अंगावर का सोन्याची माती होते? ते का झिजतात? माझ्याच गळ्यांत सारें ओझे वागवण्यांत काय अर्थ आहे? आई, गुणा माझा मित्र. तो आला नाहीं तर मला कसेंसेंच होतें. त्याची आई त्याला आज बाहेर पडूं देत नव्हती. कां, तर नीट सदरा नाहीं घालायला, एखादा दागिना नाहीं घालायला म्हणून. त्याची आई म्हणे, जाऊं नको जगन्नाथाकडे आज. तुला सारीं हंसतील. आई माझ्या मित्राला का कुणीं हंसावे? तो माझ्यासारखा दिसावा म्हणून दिला हा शर्ट, हें धोतर, हे दागिने. बघ आम्ही दोघे सारखे दिसतों कीं नाहीं ते! खरे खरे मित्र. हंसतेस काय आई? आई मी चांगला दिसतों की गुणा?”

“तूंच चांगला दिसतोस. तुला शोभतें सारें.”

“आणि गुणाला का शोभत नाहीं? तो गरीब म्हणून वाटतें? गुणाच माझ्याहून गोड दिसतो. आई, आम्ही दोघे या आरशांत पाहत होतों. तो आले दादाराव व लागले मारायला. आजपासून मी दागिन्यांना शिवणार नाहीं. नकोतच ते मला.”

“जगन्नाथ, मी आतां जातों. माझा सदरा घालून व माझे धोतर नेसून जातों.”

“गुणा, बघ हो. तूं अस्सा घरां जा. आहेस आतां तस्सा. मी तुला पोंचवायला येतों. लोक म्हणतील रामलक्ष्मण जणुं चालले. चल, मी तुला पोंचवायला येतों.

“गुणा, आजच्या दिवस असूं दे हो सारें. नको काढूं ती कंठी, नको सोडूं तें धोतर. नाहीं तर जगन्नाथ नीट जेवणार-खाणार नाहीं. पुन्हा जेवायच्या वेळेस रडारड. असूं दे.”

“आई, आजच्याच दिवस कां? कायमचेंच गुणाला हें घेऊं दे. म्हणजे दिवाळीच्या दिवशींहि तो घालील, नाहीं?”

“दिवाळीच्या दिवशीं गुणा पुन्हा येईल व त्या दिवशीं पुन्हा त्याला दे हो. असें वेड्यासारखें करूं नये. पुढें मोठा झालास म्हणजे कर हो वाटेल तें. व्हा वेगळे व करा आपापल्या इस्टेटीचें काय करायचें तें.”


गोड शेवट

पांडुरंग सदाशिव साने
Chapters
कर्जबाजारी रामराव 1 कर्जबाजारी रामराव 2 कर्जबाजारी रामराव 3 कर्जबाजारी रामराव 4 मित्रांची जोडी 1 मित्रांची जोडी 2 मित्रांची जोडी 3 मित्रांची जोडी 4 मित्रांची जोडी 5 मित्रांची जोडी 6 मित्रांची जोडी 7 मित्रांची जोडी 8 मित्रांची जोडी 9 मित्रांची जोडी 10 मित्रांची जोडी 11 मित्रांची जोडी 12 मित्रांची जोडी 13 कोजागरी 1 कोजागरी 2 कोजागरी 3 कोजागरी 4 कोजागरी 5 कोजागरी 6 कोजागरी 7 कोजागरी 8 कोजागरी 9 कोजागरी 10 कोजागरी 11 कोजागरी 12 आपण दोघे भिकारी होऊन हिंडूं 1 आपण दोघे भिकारी होऊन हिंडूं 2 आपण दोघे भिकारी होऊन हिंडूं 3 आपण दोघे भिकारी होऊन हिंडूं 4 आपण दोघे भिकारी होऊन हिंडूं 5 आपण दोघे भिकारी होऊन हिंडूं 6 आपण दोघे भिकारी होऊन हिंडूं 7 आपण दोघे भिकारी होऊन हिंडूं 8 आपण दोघे भिकारी होऊन हिंडूं 9 आपण दोघे भिकारी होऊन हिंडूं 10 दयाराम भारतींस हद्दपारीची शिक्षा 1 दयाराम भारतींस हद्दपारीची शिक्षा 2 दयाराम भारतींस हद्दपारीची शिक्षा 3 दयाराम भारतींस हद्दपारीची शिक्षा 4 दयाराम भारतींस हद्दपारीची शिक्षा 5 राष्ट्रीय मेळा 1 राष्ट्रीय मेळा 2 राष्ट्रीय मेळा 3 राष्ट्रीय मेळा 4 राष्ट्रीय मेळा 5 राष्ट्रीय मेळा 6 राष्ट्रीय मेळा 7 राष्ट्रीय मेळा 8 जगन्नाथचे लग्न 1 जगन्नाथचे लग्न 2 जगन्नाथचे लग्न 3 जगन्नाथचे लग्न 4 जगन्नाथचे लग्न 5 जगन्नाथचे लग्न 6 जगन्नाथचे लग्न 7 जगन्नाथचे लग्न 8 जगन्नाथचे लग्न 9 जगन्नाथचे लग्न 10 जगन्नाथचे लग्न 11 जगन्नाथचे लग्न 12 येथें नको, दूर जाऊं 1 येथें नको, दूर जाऊं 2 येथें नको, दूर जाऊं 3 येथें नको, दूर जाऊं 4 येथें नको, दूर जाऊं 5 येथें नको, दूर जाऊं 6 येथें नको, दूर जाऊं 7 येथें नको, दूर जाऊं 8 येथें नको, दूर जाऊं 9 येथें नको, दूर जाऊं 10 येथें नको, दूर जाऊं 11 येथें नको, दूर जाऊं 12 येथें नको, दूर जाऊं 13 येथें नको, दूर जाऊं 14 गुणा कोठें गेला गुणा? 1 गुणा कोठें गेला गुणा? 2 गुणा कोठें गेला गुणा? 3 गुणा कोठें गेला गुणा? 4 गुणा कोठें गेला गुणा? 5 गुणा कोठें गेला गुणा? 6 गुणा कोठें गेला गुणा? 7 गुणा कोठें गेला गुणा? 8 आगगाडींत भेटलेला देव 1 आगगाडींत भेटलेला देव 2 आगगाडींत भेटलेला देव 3 आगगाडींत भेटलेला देव 4 आगगाडींत भेटलेला देव 5 आगगाडींत भेटलेला देव 6 आगगाडींत भेटलेला देव 7 आगगाडींत भेटलेला देव 8 आगगाडींत भेटलेला देव 9 दु:खी जगन्नाथ 1 दु:खी जगन्नाथ 2 दु:खी जगन्नाथ 3 दु:खी जगन्नाथ 4 दु:खी जगन्नाथ 5 दु:खी जगन्नाथ 6 दु:खी जगन्नाथ 7 दु:खी जगन्नाथ 8 इंदूर 1 इंदूर 2 इंदूर 3 इंदूर 4 इंदूर 5 इंदूर 6 इंदूर 7 इंदूर 8 इंदूर 9 इंदूर 10 इंदूर 11 इंदूर 12 इंदूर 13 इंदूर 14 इंदूर 15 इंदूर 16 इंदूर 17 इंदूर 18 इंदूर 19 इंदिरा 1 इंदिरा 2 इंदिरा 3 इंदिरा 4 इंदिरा 5 इंदिरा 6 इंदिरा 7 इंदिरा 8 इंदिरा 9 इंदिरा 10 इंदिरा 11 इंदिरा 12 इंदिरा 13 इंदिरा 14 जगन्नाथ 1 जगन्नाथ 2 जगन्नाथ 3 जगन्नाथ 4 जगन्नाथ 5 जगन्नाथ 6 जगन्नाथ 7 जगन्नाथ 8 जगन्नाथ 9 जगन्नाथ 10 जगन्नाथ 11 जगन्नाथ 12 जगन्नाथ 13 जगन्नाथ 14 जगन्नाथ 15 जगन्नाथ 16 जगन्नाथ 17 जगन्नाथ 18 जगन्नाथ 19 जगन्नाथ 20 जगन्नाथ 21 जगन्नाथ 22 जगन्नाथ 23 इंदु 1 इंदु 2 इंदु 3 इंदु 4 इंदु 5 इंदु 6 इंदु 7 इंदु 8 इंदु 9 इंदु 10 इंदु 11 इंदु 12 इंदु 13 इंदु 14 इंदु 15 इंदु 16 इंदु 17 इंदु 18 इंदु 19 इंदु 20 इंदु 21 इंदु 22 इंदु 23 इंदु 24 इंदु 25 इंदु 26 इंदु 27 इंदु 28 इंदु 29 इंदु 30 इंदु 31 इंदु 32 एरंडोलला घरीं 1 एरंडोलला घरीं 2 एरंडोलला घरीं 3 एरंडोलला घरीं 4 एरंडोलला घरीं 5 एरंडोलला घरीं 6 एरंडोलला घरीं 7 एरंडोलला घरीं 8 एरंडोलला घरीं 9 एरंडोलला घरीं 10 एरंडोलला घरीं 11 एरंडोलला घरीं 12 एरंडोलला घरीं 13 एरंडोलला घरीं 14 एरंडोलला घरीं 15 एरंडोलला घरीं 16 एरंडोलला घरीं 17 एरंडोलला घरीं 18 एरंडोलला घरीं 19 ही चंद्रभागा नको,त्या चंद्रभागेंत पवित्र हो 1 ही चंद्रभागा नको,त्या चंद्रभागेंत पवित्र हो 2 ही चंद्रभागा नको,त्या चंद्रभागेंत पवित्र हो 3 ही चंद्रभागा नको,त्या चंद्रभागेंत पवित्र हो 4 ही चंद्रभागा नको,त्या चंद्रभागेंत पवित्र हो 5 ही चंद्रभागा नको,त्या चंद्रभागेंत पवित्र हो 6 शेवटी सारे गोड होतें 1 शेवटी सारे गोड होतें 2 शेवटी सारे गोड होतें 3 शेवटी सारे गोड होतें 4 शेवटी सारे गोड होतें 5 शेवटी सारे गोड होतें 6 शेवटी सारे गोड होतें 7 शेवटी सारे गोड होतें 8 शेवटी सारे गोड होतें 9