Get it on Google Play
Download on the App Store

मोलकरीण 17

बाळासाहेबांच्या मनात काही तरी चिलबिचल झाली होती खास. त्या ओव्या, तो आवाज ! हृदयाची एक जुनी तार छेडली गेली ! विस्मृत गीत पुनः जिवंत झाले ! बाळासाहेब मुद्दाम खाली गेले, पाळण्याजवळ गेले. राधाबाई दूर उभ्या राहिल्या. गाय वासरापासून दूर उभी राहिली ! बाईसाहेबांनी राधाबाईंकडे नीट पाहिले व त्यांनी विचारले, “तुमचे दुसरे कोणी नाही का ? तुम्ही एकट्याच आहात ? तुम्ही पगार का घेतला नाही !” राधाबाई म्हणाल्या, “पगार घेऊन मला कोणाला पाठवायचा ? मला कोणी नाही. येथे जेवायला तर मिळतेच. काही लागले तर माझे घरच आहे. बाईसाहेब मला कशालाही नाही म्हणत नाहीत. लुगड्याचा किती आग्रह करतात ! परंतु मीच म्हटले, की अजून दोन महिने यावर जातील. पगारीसाठी मी थोडेच करते ? या मुलांचे करताना मला किती आनंद होतो ! हा आनंद मिळतो, आणखी पगार कशाला ? तो पहा उठला दिनेश. थांबा, त्याला काढूनच घेते.” असे म्हणून राधाबाई काढून घेतले.

बाईसाहेब जरा गंभार होऊन दिवाणखान्यात गेले. ते जरा अस्वस्थ दिसू लागले. दिवसेंदिवस ते अधिकच सचिंत व खिन्न दिसू लागले. ते फार हसत ना, बोलत ना. मालतीच्या लक्षात ती गोष्ट आली. शेवटी तिने एके दिवशी विचारले, “तुम्ही  अलीकडे खिन्न का दिसता ? मला सांगा, माझ्यापासून तुम्ही काहीतरी लपवीत आहा. तुम्हाला काही तरी दुःख होत आहे खास.”
बाळासाहेब म्हणाले, “अगं, देशात हा गांधीची चळवळ सुरू होणार, तीत लहान मुले-मुली भाग घेणार, त्यांना शिक्षा देण्याचे आमच्या नशिबी येणार, यामुळे मी संचित होतो.”

मालती गंभीरपणे व प्रेमळपणे म्हणाली, “मग द्या सोडून नोकरी एखाद्या खाजगी संस्थेत राहा, प्रोफेसर व्हा. नाही तर मी करीन कन्याशाळेत किंवा कोठे तरी नोकरी. मनाला फार त्रास होत असेल, तर काय करायची नोकरी ? सारे सुखासाठीच ना करायचे ?”
बाळासाहेब म्हणाले, “नोकरी सोडल्यावर हे भाग्य कसे राहणार ? गाडीघोडे, मोटार, गडीमाणसे, राधाबाईंसारख्या मातेप्रमाणे चाकरी करणा-या बाया- हे सारे कोठे मिळणार ? मग तुझे कसे होईल? तुला स्वतः माझी धोतरे धुवावी लागतील, एक वेळ समज, माझी नाही धुवावी लागली, तरी स्वतःची लुगडी तुला धुवावी लागतील, नरेश-दिनेश यांचे कपडे तुला धुवावे लागतील, स्वयंपाक करावा लागेल, सारे काम करावे लागेल. तुझ्याने हे कसे होईल ? दोन दिवसांत तू कोमेजून जाशील !”

“काही नाही कोमेजून जात. सीतादेवींपेक्षा का मी कोमल न् सुकुमार आहे ?” मालतीने विचारले.

“अगं, सीतेच्या गोष्टी कशाला ? तू सीता नाहीस आणि मी राम नाही. आपण साधी संसारी माणसे!” बाळासाहेब म्हणाले.


विश्राम

पांडुरंग सदाशिव साने
Chapters
विश्राम 1 विश्राम 2 विश्राम 3 विश्राम 4 विश्राम 5 विश्राम 6 विश्राम 7 विश्राम 8 विश्राम 9 विश्राम 10 श्यामची आत्या 1 श्यामची आत्या 2 श्यामची आत्या 3 श्यामची आत्या 4 श्यामची आत्या 5 श्यामची आत्या 6 श्यामची आत्या 7 श्यामची आत्या 8 शशी 1 शशी 2 शशी 3 शशी 4 शशी 5 शशी 6 शशी 7 शशी 8 शशी 9 शशी 10 शशी 11 शशी 12 शशी 13 शशी 14 शशी 15 शशी 16 शशी 17 शशी 18 शशी 19 शशी 20 शशी 21 शशी 22 शशी 23 शशी 24 शशी 25 शशी 26 शशी 27 शशी 28 शशी 29 शशी 30 शशी 31 शशी 32 शशी 33 शशी 34 शशी 35 शशी 36 शशी 37 शशी 38 मोलकरीण 1 मोलकरीण 2 मोलकरीण 3 मोलकरीण 4 मोलकरीण 5 मोलकरीण 6 मोलकरीण 7 मोलकरीण 8 मोलकरीण 9 मोलकरीण 10 मोलकरीण 11 मोलकरीण 12 मोलकरीण 13 मोलकरीण 14 मोलकरीण 15 मोलकरीण 16 मोलकरीण 17 मोलकरीण 18 मोलकरीण 19 मोलकरीण 20 मोलकरीण 21 मोलकरीण 22 मोलकरीण 23 मोलकरीण 24 मोलकरीण 25 मोलकरीण 26 मोलकरीण 27 मोलकरीण 28 मोलकरीण 29