बापूजींच्या गोड गोष्टी 88
९०
दिल्लीचे ते शेवटचे दिवस. आता शेवटचे म्हणून म्हणायचे. त्या वेळेस हे दिवस शेवटचे अशी कोणालाच कल्पना नव्हती. एके दिवशी महात्माजींचे पुत्र देवदास, हे गांधीजींकडे आले होते. देवदास दिल्लीलाच असत. हिंदुस्थान टाइम्सचे संपादक. बहुधा रात्री थोडा वेळ ते येऊन जात.
बोलणे वगैरे झाले. नंतर देवदास म्हणाले : ‘बापू, आज मी प्यारेलालजींना घरी जेवायला नेणार आहे. नेऊ ना?’
‘ने, ने. खरचं ने. परंतु काय रे, मला जेवायला बोलवायचं कधी नाही ना मनात येत?’ बापू बालले आणि नंतर मोकळेपणाने हसले, पितापुत्रांचा गोड विनोद!