बापूजींच्या गोड गोष्टी 63
६५
लंडनला होते तेव्हा बापू. दरिद्रीनारायणाचे प्रतिनिधी म्हणून ते गेले होते. ब्रिटिशांचा पाहुणा मानीत.
आणि बकिंगहॅम राजवाड्यातून राजाराणींच्या भेटीसाठी आमंत्रण आले. जावे की न जावे, बापूंसमोर प्रश्न पडला. तिकडे हिंदुस्थानात सरकारने जनतेवर शस्त्र धरले आहे. मी का इकडे बादशहांच्या भेटी घेत बसू? परंतु मी ब्रिटिशांचा पाहुणा आहे. मी व्यक्तिगत नात्याने आलो असतो, तर बादशहांचे आमंत्रण नाकारले असते. परंतु आज मी त्यांचा पाहुणा म्हणून आहे. मला जायला हवे. मनात असा संघर्ष चालला आणि शेवटी बापूंनी जायचा निर्णय घेतला. परंतु त्यांनी ब्रिटिश अधिका-यांना कळविले :
‘मी पोषाखात बदल करणार नाही. मी माझ्या नेहमीच्या पोषाखात येईन. चालत असेल तर कळवा.’
आणि ‘चालेल’असे उत्तर आले. ब्रिटिश सम्राटाला भेटायला भारतीय जनतेचा हृदय-सम्राट पंचा नेसून गेला.
साम्राज्याचा अभिमानी चर्चिल यामुळे संतप्त झाला होता. परंतु त्या पंचाचे अपार वैभव चर्चिलला काय कळे!