Get it on Google Play
Download on the App Store

बापूजींच्या गोड गोष्टी 84

८६

गोलमेज परिषदेला गांधीजी लंडनला गेले होते. त्या वेळच्या नाना कथा. एके दिवशी गिल्ड हॉलमध्ये सभा होती. ‘स्वेच्छापूर्वक घेतलेला दारिद्र्याचा वसा’ या विषयावर गांधीजी बोलणार होते. मिस् माड रायडन या बाईंनी गांधीजींना आपल्या मोटारीतून सभागृहाकडे नेले. त्या बाईंना डी.डी. पदवी होती.

‘डी.डी. म्हणजे काय?’ बापूंनी मोटारीतून जाताना विचारले.

‘डॉक्टरेट ऑफ डिव्हिनिटी (देवशास्त्रात पारंगत) असा त्याचा अर्थ. ग्लासगो विद्यापीठानं ती पदवी मला दिली आहे.’ रायडनबाई म्हणाल्या.

‘म्हणजे देवाविषयी तुम्हांला सारं माहीत आहे एकूण!’ गांधीजी स्मितपूर्वक म्हणाले. सभागृह आले.

‘सभेनंतर तुमच्याच मोटारीतून मी परत जाईन. बरं का!’ गांधीजी म्हणाले.

त्या बाईंना तो बहुमान वाटला. गांधीजींनी आपल्या मोटारीतून जावं असं अनेकांना वाटे. जगातील एक महापुरुष आपल्या मोटारीतून गेला, ही केवढी थोर आठवण! अशी आठवण मिळावी म्हणून कोण उत्सुक असणार नाही?

सभा संपली. सभागृहाबाहेर तोबा गर्दी, आणि त्यातच पाऊस पडत होता. शेकडो मोटारी तेथे होत्या. त्या बाईंना स्वत:ची मोटार पटकन सापडेना. गांधीजी पावसात उभे होते. सभोवती अनेक मोटारी. महात्माजींना न्यायला मिळेल म्हणून त्या मोटारी उत्सुकतेने वाट पाहत होत्या. हवेत मनस्वी गारवा आला. बापूंच्या अंगावर गरम कपडे नव्हते. त्या बाई ओशाळल्या.

‘गांधीजी, तुम्ही कोणाच्या तरी गाडीतून जा. माझी गाडी काही सापडत नाही. तुम्ही नका थांबू.’ रायडनबाई म्हणाल्या.

‘परंतु तुमची गाडी सापडेपर्यंत मी थांबेन.’ गांधीजी शांतपणे म्हणाले.

त्या भगिनीला राजमुकुट मिळाल्याचा आनंद झाला. गर्दी कमी झाली. मोटर सापडली आणि कबूल केल्याप्रमाणे त्या मोटारीतून बापू गेले! भगिनीला केवढे समाधान वाटले!

बापूजींच्या गोड गोष्टी

पांडुरंग सदाशिव साने
Chapters
बापूजींच्या गोड गोष्टी 1 बापूजींच्या गोड गोष्टी 2 बापूजींच्या गोड गोष्टी 3 बापूजींच्या गोड गोष्टी 4 बापूजींच्या गोड गोष्टी 5 बापूजींच्या गोड गोष्टी 6 बापूजींच्या गोड गोष्टी 7 बापूजींच्या गोड गोष्टी 8 बापूजींच्या गोड गोष्टी 9 बापूजींच्या गोड गोष्टी 10 बापूजींच्या गोड गोष्टी 11 बापूजींच्या गोड गोष्टी 12 बापूजींच्या गोड गोष्टी 13 बापूजींच्या गोड गोष्टी 14 बापूजींच्या गोड गोष्टी 15 बापूजींच्या गोड गोष्टी 16 बापूजींच्या गोड गोष्टी 17 बापूजींच्या गोड गोष्टी 18 बापूजींच्या गोड गोष्टी 19 बापूजींच्या गोड गोष्टी 20 बापूजींच्या गोड गोष्टी 21 बापूजींच्या गोड गोष्टी 22 बापूजींच्या गोड गोष्टी 23 बापूजींच्या गोड गोष्टी 24 बापूजींच्या गोड गोष्टी 25 बापूजींच्या गोड गोष्टी 26 बापूजींच्या गोड गोष्टी 27 बापूजींच्या गोड गोष्टी 28 बापूजींच्या गोड गोष्टी 29 बापूजींच्या गोड गोष्टी 30 बापूजींच्या गोड गोष्टी 31 बापूजींच्या गोड गोष्टी 32 बापूजींच्या गोड गोष्टी 33 बापूजींच्या गोड गोष्टी 34 बापूजींच्या गोड गोष्टी 35 बापूजींच्या गोड गोष्टी 36 बापूजींच्या गोड गोष्टी 37 बापूजींच्या गोड गोष्टी 38 बापूजींच्या गोड गोष्टी 39 बापूजींच्या गोड गोष्टी 40 बापूजींच्या गोड गोष्टी 41 बापूजींच्या गोड गोष्टी 42 बापूजींच्या गोड गोष्टी 43 बापूजींच्या गोड गोष्टी 44 बापूजींच्या गोड गोष्टी 45 बापूजींच्या गोड गोष्टी 46 बापूजींच्या गोड गोष्टी 47 बापूजींच्या गोड गोष्टी 48 बापूजींच्या गोड गोष्टी 49 बापूजींच्या गोड गोष्टी 50 बापूजींच्या गोड गोष्टी 51 बापूजींच्या गोड गोष्टी 53 बापूजींच्या गोड गोष्टी 54 बापूजींच्या गोड गोष्टी 55 बापूजींच्या गोड गोष्टी 56 बापूजींच्या गोड गोष्टी 57 बापूजींच्या गोड गोष्टी 58 बापूजींच्या गोड गोष्टी 59 बापूजींच्या गोड गोष्टी 60 बापूजींच्या गोड गोष्टी 61 बापूजींच्या गोड गोष्टी 62 बापूजींच्या गोड गोष्टी 63 बापूजींच्या गोड गोष्टी 64 बापूजींच्या गोड गोष्टी 65 बापूजींच्या गोड गोष्टी 66 बापूजींच्या गोड गोष्टी 67 बापूजींच्या गोड गोष्टी 68 बापूजींच्या गोड गोष्टी 69 बापूजींच्या गोड गोष्टी 70 बापूजींच्या गोड गोष्टी 71 बापूजींच्या गोड गोष्टी 72 बापूजींच्या गोड गोष्टी 73 बापूजींच्या गोड गोष्टी 74 बापूजींच्या गोड गोष्टी 75 बापूजींच्या गोड गोष्टी 76 बापूजींच्या गोड गोष्टी 77 बापूजींच्या गोड गोष्टी 78 बापूजींच्या गोड गोष्टी 79 बापूजींच्या गोड गोष्टी 80 बापूजींच्या गोड गोष्टी 81 बापूजींच्या गोड गोष्टी 82 बापूजींच्या गोड गोष्टी 83 बापूजींच्या गोड गोष्टी 84 बापूजींच्या गोड गोष्टी 85 बापूजींच्या गोड गोष्टी 86 बापूजींच्या गोड गोष्टी 87 बापूजींच्या गोड गोष्टी 88 बापूजींच्या गोड गोष्टी 89 बापूजींच्या गोड गोष्टी 90 बापूजींच्या गोड गोष्टी 91 बापूजींच्या गोड गोष्टी 92 बापूजींच्या गोड गोष्टी 93 बापूजींच्या गोड गोष्टी 94 बापूजींच्या गोड गोष्टी 95 बापूजींच्या गोड गोष्टी 96 बापूजींच्या गोड गोष्टी 97 बापूजींच्या गोड गोष्टी 98 बापूजींच्या गोड गोष्टी 99 बापूजींच्या गोड गोष्टी 100 बापूजींच्या गोड गोष्टी 101 बापूजींच्या गोड गोष्टी 102 बापूजींच्या गोड गोष्टी 103 बापूजींच्या गोड गोष्टी 104 बापूजींच्या गोड गोष्टी 105 बापूजींच्या गोड गोष्टी 106 बापूजींच्या गोड गोष्टी 107