Android app on Google Play iPhone app Download from Windows Store

 

जो नामात इतका रंगला, की त्याला स्वत:चा विसर पडला

१९०३
जो नामात इतका रंगला, की त्याला स्वत:चा विसर पडला; त्यालाच माझे चरित्र कळेल. नुसत्या तर्काने ते कळणार नाही.
श्री पुण्याला आले असताना अनेक स्त्री-पुरुष त्यांच्या दर्शनाला येत असत. त्यावेळी गोपाळराव गोखले हे शिवभक्त मोठे तालीमबाजअसून अनेक भोंदू साधू, लोभी संन्यासी, वाह्यात पुराणिक यांची परीक्षा घेऊन त्यांना पिटाळून लावीत. एरव्ही जो कोणी साधू आपली शिवभक्ती प्रकट करुन सांगेल त्याला आपण गुरु करावा असे त्यांनी ठरविले होते. एकदा ते श्रींना भेटायला आले असता नमस्कार करुन बाजूला बसले; तेवढ्यात श्रींनी त्यांच्याकडे पाहिले व म्हणाले, "मी रामाचा उपासक आहे, पण मला शंकराचा भक्त फार आवडतो." असे म्हणताच गोपाळराव एकदम "महाराज!" असे म्हणून श्रींच्या पाया पडले व नंतर श्रींच्या अंतरंगातील शिष्य म्हणून ओळखले जाऊ लागले; ते म्हणायचे, " मी श्रींचा परीक्षक म्हणून गेलो, पण श्री जणू काय आपली लहानपणापासूनची ओळख आहे इतक्या आपलेपणाने माझ्याशी वागू लागले.
पुण्याचा मुक्काम संपवून श्री गोंदवल्यास आले, तेव्हा तेथे कडाक्याचा उन्हाळा चालू होता, एक अशक्त, रोगाने थकलेले गाढव राममंदिरासमोर आले व तेथेच पडले. कोणीतरी ही गोष्ट श्रींना सांगितली. त्यावेळी ते विश्रांती घेत होते. श्री चटकन उठले व बाहेर गाढवापाशी आले, ते तडफडत होते. त्याची ती प्राणांतिक अवस्था पाहून श्रींनी ताबडतोब गंगा घेऊन येण्यास सांगितले व स्वत:त्याच्या अंगावर हात फिरवीत बसले. अनेक मंडळी जमा झाली. सर्वांना मोठ्याने नाम घेण्यास सांगून श्रींनी स्वत: गाढवाच्या तोंडात गंगा घातली. गाढवाने श्रींच्याकडे पाहिले व प्राण सोडला. त्यावर श्री एकदम म्हणाले, " रामाने त्याचे कल्याण केले, त्याला चांगला अंतकाळी मदत झाली तर सर्व जीवप्राणी पुढे जातात. मग गाढव झाले तरी काय हरकत आहे!"
जंगलखात्यातील एक गृहस्थ ज्यांना "भाऊसाहेब फॉरेस्ट" असे म्हणत; पेन्शन घेतल्यावर गोंदवल्यास श्रींच्याजवळ येऊन राहिले. त्यांना लिहिण्याचा व वाचण्याचा खूप नाद होता. सहा महिने गोंदवल्यास राहिल्यावर श्रींचे विलक्षण चरित्र बघून आपण त्यांचे चरित्र लिहावे असे त्यांच्या मनात आले. श्रींविषयी ते माहिती गोळा करीत व रोज जे घडले त्याची नोंद करुन ठेवीत. एकदा ते श्रींना म्हणाले,"महाराज, आपली जन्मतिथी कोणती ती सांगाल का ?" त्यावर श्री हसून म्हणाले, " घ्या लिहून असे म्हणून श्रींनी आपली जन्मवेळ, तिथी आणि महिना सांगितला व शेवटी संवत्सर सांगितले, त्यावर भाउसाहेब एकदम आनंदाने म्हणाले, "महाराज, तुम्ही आणि आम्ही अगदी बरोबरचे आहेत. माझी जन्मवेळ, तिथी, महिना अगदी बरोबर तुमचीच आहे" त्यावेळी तेथे जमलेली मंडळी हसू लागली, भाऊसाहेबांना मग खरा प्रकार लक्षात आला. भाऊसाहेबांनी श्रींचे चरित्र लिहिले व कौतुकाने ते बाड श्रींच्या हातात दिले. श्रींनी ते कौतुकाने ते चाळले व नंतर एकदम फाडून टाकले. त्यावर भाऊसाहेब म्हणाले,"हे काय महाराज!" श्री म्हणाले, भाऊसाहेब, संतांचा चरित्रकार जन्मास यावा लागतो. जो नामात इतका रंगला की त्याला स्वत:चा विसर पडला, त्यालाच माझे चरित्र कळेल, नुसत्या तर्काने ते कळणार नाही." सत्पुरुषाचे चरित्र हे जास्त मानसिक असते, त्याच्या चरित्रामध्ये देहाच्या        हालचालींना दुय्यम महत्व असते आणि चमत्कारांना तर फारच कमी महत्त्व द्यायला पाहिजे. देहाच्या वाटेल त्या अवस्थेमध्ये भगवंताचे अखंड अनुसंधान असणे हेच संतांच्या चरित्राचे खरे मर्म आहे. आपण स्वत: भगवंताला चिकटल्याशिवाय दुसरा तसा चिकटलेला आहे किंवा नाही हे कळत नाही. म्हणून संताच्या चरित्रकाराने स्वत: नामामध्ये रंगून जावे आणि नंतर त्याची आज्ञा घेऊन चरित्र लिहावे."
भाऊसाहेबांनी श्रींचे एकदम पाय धरले व क्षमा मागितली.

श्रीब्रह्मचैतन्य महाराज चरित्र

संकलित
Chapters
श्रीशुक परिक्षितीला ब्रह्मदेवाची कथा सांगतात
"शुद्ध बीजापोटी । फळे रसाळ गोमटी"
तुला आईचा सहवास नेहमी पाहिजे काय ?
श्रींचे चरित्र दैवी संपत्तीच्या गुणांनी भारलेले
तैशी दशेची वाट न पाहता । वयसेचिया गांवा न येता ।
माझ्या राज्यात भिकारी असा कुणी राहू देणार नाही.
नदीकाठी अगदी एकांत असतो, तेथे मन नामात लवकर रंगून जाते.
अजून तरी त्याचे नाम घ्या. तो दयाळू आहे, तुमचे कल्याण करील.
मी अगदी चांगली वागेन, पण तू नामाची लाखोली मात्र खरीच वाहिली पाहिजेस.
सदगुरुवाचून जिवाची तळमळ शांत होत नाही.
"याचे लग्न करून द्यावे म्हणजे हा घरी रमू लागेल."
"तुझे काम माझ्याकडे नाही."
"तू स्वतःचा खून कर, तू स्वतःला मारून टाक "
"पूर्वी वसिष्ठांनी रामचंद्राला जे दिले, ते मी तुला या क्षणी देतो."
"तुमच्या अंतकाळी मी हजर राहीन, हे माझे वचन घ्या."
"रामनामाने भवरोग नाहीसा होतो, तर देहाचा रोग बरा होणार नाही का !"
"तुम्ही सर्व मंडळींनी भगवंताला कधीही विसरू नये व आनंदात रहावे म्हणजे मला सर्व पोचले."
"महाराज, आपण माझे बाप आहात, मला क्षमा करा. मी आपल्याला शरण आहे."
त्याच्या तीन खुणा आहेत. तो दिसायला मोठा सुंदर आहे
"तू नामस्मरण करीत रहा. रामेश्र्वराच्या दर्शनाला आम्ही तुला घेऊन जाऊ."
"पंतांचा नातू मोठा साधू होऊन गोंदवल्यास परत आला आहे."
"आई, या कामाचा आता मला कंटाळा आला आहे. शिवाय सदगुरूंना भेटूनही फार दिवस झाले."
"गीतेचा नववा अध्याय वाचीत जा "
"चल, तू आता तुकामाईंच्या दर्शनाला खरी लायक आहेस."
वनवासात असताना पंचवटीत श्रीरामचंद्रांच्या संगतीत सीतेने आनंदात दिवस घालवले
"तुम्ही रामदास आहात, मी शिवाजी बनतो."
"आई, नवीन सून तुझ्याकडे डोळा वर करून कधी पहाणार नाही."
इतक्या लोकांना कामावर लावून पोसणारा हा कोण राजा आहे ?"
"माय, मला फार भूक लागली आहे, माझे पोट भरेल एवढे दूध दे."
"मला सांभाळणारा राम समर्थ आहे, पण मी न मरता हे सर्प मेले तर तुमच्या मंत्राची व तुमची हानी होईल."
"ज्या रामरायाने तुमच्या मुलाचे प्राण वाचविले, त्याचे नाम कधी विसरू नका. राम मुलाचे कल्याण करील."
"मोठमोठया तपस्व्यांना कधी साधणार नाही, असा अंतकाळ त्याने साधला.
सरकार जेव्हा राज्य करते तेव्हा सरकारांचा सरकार जो भगवंत त्याला विसरते
ज्या ज्या माणसांचा श्रींशी संबंध आला त्या प्रत्येकाला त्यांनी रामनामाचा छंद लावला.
विकल्प न बाळगता त्याला दत्तक जा. त्याची जहागीर तुला मिळेल.
भारतभूमी ही अध्यात्मभूमी आहे.
"भोग भोगून संपविला आहे, आता मऊ भात करून घाला."
जगतामध्ये घडणारी प्रत्येक गोष्ट श्रीरामरायाच्या इच्छेनेच घडत असते.
"आपण ज्याचे मंदिर बांधीत आहोत तो आपणहून येईल."
एवढया मोठया समारंभात आणि जनसमुदायात सर्व लोकांच्या चित्ताचे केंद्र
मुक्या जनावरांचेसुद्धा श्रींवर अकृत्रिम प्रेम होते.
"महाराज ! आपण समर्थ आहात, या व्यसनापासून मला आता सोडवा."
रामाचे देणेच तेवढे हिताचे असते.
प्रापंचिक माणसाने घरातले सर्व देऊन टाकू नये.
गादीखाली खूप पैसे ठेवले आहेत, वाटेल तेवढे तू दे."
राम व शिव असा भेद मानू नये. स्नान करून झाल्यावर शिवमंत्र जपावा
"महाराज ! राम, सीता, लक्ष्मण यांच्या डोळ्यांतून सारख्या अश्रुधारा वाहत आहेत."
सामान्य माणसाने भगवंताला शरण जाऊन त्याच्या नामाचा आधार घट्ट धरावा
अक्रोध, निर्लोभ चित्तात वृत्ती लीन करून उपासनेरूप जग पाहावे.
"हरवलेल्या मुलाला आई भेटल्यावर जसे होते, तसे मला झाले."
"ज्ञान श्रेष्ठ खरेच, पण ते भक्तीशिवाय जगू शकत नाही. भगवंतापासून जो विभक्त नसतो तो भक्त."
जो नामात इतका रंगला, की त्याला स्वत:चा विसर पडला
"घरदार, पैसा अडका, भांडीकुंडी आणि आपला देह देखील भगवंताला अर्पन करावा. यामुळे अपमृत्यू टळू शकतो."
आपला देह आणि आपला प्रपंच भगवंताच्या सत्तेने चालतो
शंका फार चिवट असतात. नाम सतत घेत गेल्याने मन स्वच्छ होत जाते व सर्व शंका आपोआप विरुन जातात.
मंदिरामध्ये उभा असणारा श्रीराम केवळ मूर्ती नसून प्रत्यक्ष परमात्मा आहे अशा भानेने श्री वागत.
नाम सांगता जनासी। विष देऊ येती त्यासी । दास म्हणे काळगती । पहा युगाची प्रचिती ॥
‘गुरुची आज्ञा पाळणे हाच खरा परमार्थ होय’
विश्वविद्यालय हे लौकिक विद्येचे केन्द्र असते
"खर्‍या भजनाला ताल, सूर लागत नाही. त्याला प्रेम व भाव लागतो. प्रत्यक्ष परमात्मा समोर आहे ह्या भावनेने भजन म्हणावे."
"कली फार माजेल तेव्हा नामाला सोडू नका. जो नाम घेईल त्याला मा भय नाही."
भजनाचा शेवट आला । एक वेळ राम बोला । दीनदास सांगे निका । रामनाम स्वामी शिक्का ॥
श्रीब्रह्यचैतन्य महाराजांनी स्वतः सांगितलेली